Monday 30 September 2024

शिवसेना ( उबाठा) प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा आणि सामाजिक कार्यकर्ते संस्थापक अध्यक्ष यशवंत खोपकर राज्यस्तरीय समाजभूष पुरस्कार -२०२४, आदर्श संस्था पुरस्कारने सन्मानित !!

शिवसेना ( उबाठा) प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा आणि सामाजिक कार्यकर्ते संस्थापक अध्यक्ष यशवंत खोपकर राज्यस्तरीय समाजभूष पुरस्कार -२०२४, आदर्श संस्था पुरस्कारने सन्मानित !!

  मुंबई (शांताराम गुडेकर) :
                  
            आर्दश रायगड वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनीच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त यांच्या वतीने अंबरनाथ येथील स्वामी समर्थ मंगल कार्यालय येथील वीर बाजीप्रभू देशपांडे रोड येथे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती मंडळ, संस्था यांच्यासाठी राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार सन्मान सोहळा -२०२४ थाटामाटात संपन्न झाला. हा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा संस्थापक आदर्श रायगड संपादक रमेश सणस, कार्यकारणी सदस्य शैलेश सणस आणि पदाधिकारी यांनी आयोजित केला होता. यावेळी सामाजिक शैक्षणिक, पर्यावरण, वैद्यकीय कार्यात अग्रेसर असलेल्या मुंबई मधील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा आणि सामाजिक कार्यात मदतीचा हात देणारे संस्थापक अध्यक्ष यशवंत खोपकर व त्यांच्या सहकाऱ्यांना प्रमुख पाहुणे  रवींद्र मालुसरे (अध्यक्ष मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई), उमेश गुंजाळ (नगरसेवक शिवसेना उपजिल्हाप्रमुख जळगाव), कृष्णा कदम शिवसेना पोलादपूर तालुका सहसंपर्कप्रमुख, तुळशीराम चौधरी ( नगरसेवक), गुरुवर्ये उमेश महाराज शेंडगे, आदी मान्यवर उपस्थितीत सन्मान चिन्ह, सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला. उत्कृष्ट संस्था पुरस्कार-२०२४ हा पुरस्कार मायेची सावली एक हात कर्तव्याचा संस्थापक अध्यक्ष यशवंत खोपकर, कमेटी मेंबर सचिव संदीप चादीवडे, संचालक दौलत बेल्हेकर, कार्यालय प्रमुख वसंत घडशी, किशोर भिलारे, राजेंद्र पेडणेकर, निर्मला आवटे, स्वरा पवार, आदी मान्यवर यांनी स्वीकारला. यशवंत खोपकर आणि त्यांची संस्था यांना पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल मायेची सावली एक हात कर्तव्याचा संस्थापक अध्यक्ष यशवंत खोपकर आणि पदाधिकारी यांना अनेकांकडून अभिनंदनसह शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

No comments:

Post a Comment

*"वारी चुको ने दि हरि तपपूर्ती" भव्य नामयज्ञ सोहळा संपन्न !! नालासोपारा नगरी अवघी झाली भक्तीमय..... मुंबई  - ( दिपक कारकर ) : महार...