जॉय सामाजिक संस्था मुंबई (रजि.) तर्फे कोकण सुपुत्र शांताराम गुडेकर यांची "आदर्श पत्रकार पुरस्कार -२०२५" साठी निवड !!
मुंबई, (उत्कर्ष गुडेकर) :
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील देवरुख शहरापासून जवळच असलेल्या सह्याद्रीचा प्रतिकैलास श्रीक्षेत्र मार्लेश्वर परिसरातील आंगवली -रेवाळेवाडीचे सुपुत्र विक्रोळी पश्चिम पार्क साईट येथील रहिवासी वृत्तपत्रलेखक /पत्रकार--शांत्ताराम लक्ष्मण गुडेकर ( Ex.S.E.O) यांची जॉय सामाजिक संस्था मुंबई (रजि.) तर्फे "आदर्श पत्रकार पुरस्कार -२०२५" साठी निवड करण्यात आली आहे. गुडेकर यांना हा पुरस्कार शनिवार दि. ७ जून २०२५ रोजी संध्याकाळी ५ ते ७ या वेळेत जोगेश्वरी पूर्व येथील अस्मिता भवन राजपुरिया हॉल, पहिला माळा, जोगेश्वरी पूर्व मेट्रो स्टेशन जवळ, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, ट्रॉमा हॉस्पिटल जवळ, जोगेश्वरी (पूर्व), मुंबई -६० येथे प्रमुख पाहुणे सन्मा.डॉ एम डी वळंजू (जोगेश्वरी भूषण ), प्रदीप जोशी (शिक्षकेतर कर्मचारी नेते), अविनाश दौंड (कामगार नेते), अँड. सि. रुषिला रिबेलो (कौन्सिलर मार्गदर्शक ), जगदीश जायले (वकील उच्च न्यायालय मुंबई ), वसंत ढोबळे (Ex ACP Mumbai), फादर निकी डीकोस्टा ( प्रिन्सिपॉल STHS) यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती यांना जीवनगौरव पुरस्कार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांना देखील पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
शांत्ताराम गुडेकर यांना महाराष्ट्र शासनाने "विशेष कार्यकारी अधिकारी" म्हणून २०१२ ते २०१७ या काळावधीसाठी नियुक्त केले होते. त्यांना डाँ.बाबासाहेब आंबेडकर फँलोशिप पुरस्कार -दिल्ली प्राप्त झालेला आहे. ते महाराष्ट्र शासनाच्या नागरी संरक्षण दल-एन विभाग-क्षेत्र-३ मध्ये स्वयंसेवक म्हणून कार्यरत होते. शिवाय महाराष्ट्र शासन अनुदानित नशाबंदी मंडळ- महाराष्ट्र राज्य या मंडळतर्फे नशाबंदी चे काम करतात. कोकण विभाग पत्रकार संघ मुंबई जिल्हा सचिव म्हणून ते काम पाहिले असून त्यांना नगर मित्र, आदर्श समाजसेवक, समाजरत्न, दक्ष नागरिक, कोकण भूषण, वृत्तदिप पुरस्कार, महापौर गौरवपत्र तसेच सोनी टि.व्ही वरील सी.आय.डी मालीकेला वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शांत्ताराम गुडेकर यांना "स्थानिक हिरो" सी.आय.डी मेडल व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आलेले आहे.
शांताराम गुडेकर महाराष्ट्र हरित सेना, वन विभाग, महाराष्ट्र शासन चे सदस्य, माझी वसुंधरा, महाराष्ट्र शासन चे सदस्य आहेत. शिवाय माहिती अधिकार, पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण सेना चे मुंबई जिल्हा प्रसिद्धी प्रमुख आहेत. अखिल भारतीय पत्रकार हक्क संसद समिती चे मुंबई उपनगर सचिव आहेत. शांत्ताराम गुडेकर यांची आदर्श पत्रकार -२०२५ साठी निवड झाल्याबद्दल स्वतंत्र कोकण राज्य अभियानचे अध्यक्ष श्री. संजय कोकरे आणि मुंबई/कोकण पदाधिकारी, सदस्य तसेच अनेक संस्था, प्रतिष्ठान, संघ व शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, वृत्तपत्रलेखक संघटना, पत्रकार मंडळीच्या वतीने अभिनंदनासह शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
जॉय सामाजिक संस्था मुंबई (रजि.) सामाजिक उपक्रम साजरे करण्यासाठी मुंबई सह कोकण विभागात अग्रेसर आहे. त्यांच्या व्हाट्सअप ग्रुप मधील अनेकजण सढळ हस्ते मदत करण्यास पुढे येतात व यामुळे नक्कीच समाजातील गोर-गरीब, वंचित घटकांना आम्ही सहकार्य करू शकतो व या सेवेचा आनंद ग्रुपमधील सर्वजण घेत असतात.. जॉय ऑफ गिविंग म्हणजेच दुसऱ्याला देण्यातला आनंद हा ग्रुपचा जो उद्देश आहे, तो यामुळे सफल होत असल्याचे संस्थापक अध्यक्ष गणेश हिरवे सर यांनी सांगितले. विविध पुरस्कार देऊन विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्ती, संस्था यांचा गौरव करणे हा सुद्धा वर्धापन दिनानिमित्त त्याचाच एक भाग आहे. तरी या पुरस्कार सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवर, हितचिंतक यांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन निमंत्रक -श्री.गणेश हिरवे (संस्थापकअध्यक्ष), शीला येरागी (उपाध्यक्षा), असुंता डिसोझा (कार्याध्यक्ष), छाया राणे (सचिव), समीर परब (कोषाध्यक्ष) यांच्या तर्फे करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment