Friday, 22 August 2025

श्री भक्ती विजय ग्रंथ पारायण सोहळा उत्साहात संपन्न !!

श्री भक्ती विजय ग्रंथ पारायण सोहळा उत्साहात संपन्न !!

उरण दि २२, (विठ्ठल ममताबादे) :
श्रावण महिना सुरू झाला की उरण मध्ये भाविक भक्तांना ओढ लागते ती ग्रंथ पारायण सोहळ्याची.उरण मध्ये वारकरी संप्रदायातील कीर्तनकार सखाराम गायकवाड यांनी ७५ वर्षापूर्वी ग्रंथ पोथी वाचन पारायणाची सुरुवात केली होती. ती परंपरा आजही ७५ वर्षे अखंडीतपणे सुरू आहे.भाविक भक्तांना अध्यात्म्याची गोडी लागावी नामस्मरणाची गोडी लागावी, नामस्मरण करून मानवी जीवन सार्थक व्हावे. या दृष्टिकोनातून कीर्तनकार सखाराम गायकवाड यांनी उरण मध्ये सर्वप्रथम गणपती चौकातील गणपती मंदिर येथे पोथी वाचन पारायण सोहळ्याला सुरुवात केली होती. हा उपक्रम, पारायण सोहळा सार्वजनिक असल्याने सर्व जाती धर्माचे लोक या पारायण सोहळ्याला मोठ्या संख्येने सहभागी होत होते. 

आज ७५ वर्षे या पारायण सोहळ्याला झाली आहेत. आजही हा सोहळा अखंडीतपणे सुरू आहे.दरवर्षीप्रमाणे श्रावण महिना सुरू झाला की श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी पारायण सोहळ्याला सुरुवात होते. हा पारायण सोहळा तब्बल एक महिना चालतो. सुरुवातीला श्री गणपती मंदिर येथे त्यानंतर श्रीराम मंदिर, त्यानंतर कोटनाका येथे नंतर बोरी येथे गायकवाड यांच्या घराच्या अंगणात पोथी वाचन पारायण सोहळा सुरू आहे.दरवर्षी वेगवेगळे गाथा ग्रंथ पारायण सोहळ्यात वाचले जाते. यंदा श्री भक्ती विजय ग्रंथ पारायण सोहळा मोठया उत्साहात संपन्न झाले. यावेळी श्री भक्ती विजय ग्रंथात संत ज्ञानेश्वर व त्यांच्या नंतरच्या संत परंपरेतील ईश्वर भक्ती अभंग वचने संतांचे कार्य व विचार, अवतार कार्य यांचा समावेश आहे.देवाचे नामस्मरण करत  भजन करत ग्रंथाचे वाचन, पारायण केले जाते. ७५ वर्षापासून सुरू असलेली ही परंपरा गायकवाड कुटुंबियांच्या तिसऱ्या व चौथ्या पिढीनेही मोठ्या उत्साहाने जपली आहे. या परंपरेचे जतन तिसऱ्या व चौथ्या पिढीकडून तेवढ्याच उत्साहाने व धार्मिक परंपरेने होत आहे. या दरम्यान गोकुळाष्टमीचा उत्साह मोठ्या उत्साहात साजरी केला जाते. श्री भक्ती विजय ग्रंथात ५७ अध्याय असून दररोज दोन अध्यायाचे वाचन केले जाते. काशिनाथ गायकवाड, अनंत गायकवाड,सदानंद गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी हा परंपरा सोहळा आयोजित केले जाते. या सोहळ्यात पुरुषासोबत महिला भगिनींचेही उपस्थिती लक्षणीय असते. पूर्वी शेती हा एकच मुख्य व्यवसाय होता त्यामुळे दिवसभर शेतात काम करून संध्याकाळी घरी आले की शेतकरी कष्टकरी वर्ग हे पारायण करण्यासाठी संध्याकाळी एकत्र यायचे व पारायण करायचे.आता मात्र अनेक वर्षांच्या वेगवेगळे बदल झाले तरी नागरिक भाविक व भक्त वेळ काढून हे पारायण सोहळा मोठ्या उत्साहात साजरी करीत असतात.संदीप गायकवाड, सिद्धेश गायकवाड, प्रमीला गाडे, आरती गायकवाड, मंदार गायकवाड, अक्षता गायकवाड, स्वपना गायकवाड, डॉ भक्ती कुंदेलवार यांनी यावर्षी श्री भक्तीचे विजय ग्रंथाचे वाचन पारायण केले.व ईश्वरभक्तीचा पारायण सोहळ्यातून प्रचार व प्रसार केला. दिनांक २१/८/२०२५ रोजी या ग्रंथ वाचन पोथी पारायण सोहळ्याची सांगता झाली.

No comments:

Post a Comment

चिंचोटी-कामण-खारबाव अंजुरफाटा ते माणकोली रस्त्याच्या कामातील अंदाधुंदी संदर्भात आंदोलनाचा इशारा !!

चिंचोटी-कामण-खारबाव अंजुरफाटा ते माणकोली रस्त्याच्या कामातील अंदाधुंदी संदर्भात आंदोलनाचा इशारा !! भिवंडी, प्रतिनिधी : ठाणे जिल्...