Tuesday, 30 September 2025

भगत परिवार तर्फे नवरात्रौत्सव साजरा !!

भगत परिवार तर्फे नवरात्रौत्सव साजरा !!

उरण दि ३०, (विठ्ठल ममताबादे) :
भगत परिवार तर्फे मु- भिलजी, तालुका अलिबाग, जिल्हा रायगड येथे नवरात्रौत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भिलजी येथील महिला मंडळनेही नवरात्रौत्सव साजरा केला. दरवर्षी भिलजी येथे नवरात्रौत्सव मोठया उत्साहात साजरा केला जातो. अनेक वर्षाची ही परंपरा पुढे चालूच आहे.

उरण महाविद्यालयात आर्थिक साक्षरता कार्यशाळा संपन्न !!

उरण महाविद्यालयात आर्थिक साक्षरता कार्यशाळा संपन्न !!

उरण दि ३०, (विठ्ठल ममताबादे) : कोकण ज्ञानपीठ उरण महाविद्यालय  वाणिज्य विभाग तसेच सेबी (SEBI) यांच्या संयुक्त विद्यमाने आर्थिक साक्षरता कार्यक्रम घेण्यात आला.या करीता पालघर येथील सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचे प्रा. मकसूद मेमन यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. सर्व विद्यार्थ्यांनी सुरुवातीपासूनच कोण कोणत्या अधिकृत मार्गाने बचतीची सवय लावावी व आपली प्रगती कशी करावी याची संपूर्ण माहिती प्रा. मेमन  यांनी दिली.

या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वाल्मीक गर्जे  तसेच विभागप्रमुख प्रा. व्ही.एस. इंदुलकर यांनीही विद्यार्थ्यांना यथोचित मार्गदर्शन केले. प्रा.डॉ. पी.आर.कारुलकर यांनी या कार्यक्रमास उपस्थित सर्वांचे आभार मानले यावेळी प्रा. आर. टी. ठवरे प्रा.डॉ.एच.के.जगताप आणि सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भारतीय जनता पार्टी राजस्थान प्रकोष्ठच्या उत्तर रायगड जिल्हाध्यक्षपदी पुखराज सुतार !!

भारतीय जनता पार्टी राजस्थान प्रकोष्ठच्या उत्तर रायगड जिल्हाध्यक्षपदी पुखराज सुतार !!

उरण दि ३०, (विठ्ठल ममताबादे) :

पुखराज सुतार हे गेले अनेक वर्ष सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांनी आजपर्यंत अनेक विकास कामे केली असून जनतेच्या अनेक समस्या त्यांनी सोडवले आहेत. प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होऊन जनतेला न्याय देण्याचा त्यांचा नेहमी प्रयत्न असतो. राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव, दांडगा जनसंपर्क लक्षात घेता पुखराज सुतार यांची भारतीय जनता पार्टी राजस्थान प्रकोष्ठच्या उत्तर रायगड जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

भारतीय जनता पार्टी तर्फे पक्ष प्रवेश व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन उरण शहरातील श्रीराम मंदिर येथे सभागृहात करण्यात आले होते. यावेळी पद नियुक्ती बाबत अधिकृत घोषणा करण्यात आली. पुखराज सुतार यांना आमदार महेश बालदी यांनी पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठ कट्टर प्रामाणिक कार्यकर्ते म्हणून पुखराज सुतार यांची ओळख असून जनसंपर्क वाढवण्याच्या दृष्टिकोनातून व भाजपचे ध्येय धोरणे तळागळात पोहोचण्यासाठी त्यांची निवड राजस्थान प्रकोष्ठ उत्तर रायगड जिल्हाध्यक्षपदी करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या निर्देशानुसार, प्रवासी राजस्थान प्रकोष्ठ द्वारे पुखराज सुतार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही निवड केल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी, रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, भाजपा महाराष्ट्र प्रदेश सदस्य रवीशेठ भोईर, उरण शहर अध्यक्ष कौशिक शहा यांचे पुखराज सुतार यांनी आभार व्यक्त केले आहे. वरिष्ठ नेत्यांचा विश्वास व मार्गदर्शनमुळे मला महत्त्वाचे जबाबदारी मिळाली आहे. मी पूर्ण निष्ठेने प्रामाणिकपणे कठोर मेहनत घेऊन समर्पण वृत्तीने पक्षाचे कार्य करेन. पक्षाचे ध्येय धरणे तळागाळात पोहोचवेण असा संकल्प यावेळी पुखराज सुतार यांनी केला आहे.

पक्ष प्रवेश व कार्यकर्ता मेळावा  कार्यक्रम प्रसंगी आमदार महेश बालदी,जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, महाराष्ट्र परिषद सदस्य रवी भोईर, उरण शहर अध्यक्ष कौशिक शहा, अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष जसिम ग्यास, तालुका उरण ग्रामीण मंडल अध्यक्ष धनेश गावंड, उरण शहर मंडल अध्यक्ष प्रसाद भोईर, महालण विभाग अध्यक्ष महेश कडू, भाजपा नेते चंद्रकांत घरत, भाजपा नेते जितेंद्र म्हात्रे, शेखर तांडेल,जितेंद्र घरत, माजी नगराध्यक्ष सायली म्हात्रे,उरण युवा शहर अध्यक्ष निलेश पाटील, उरण शहर महिला अध्यक्षा संपूर्णा थळी, नवीन राजपाल, हस्तीमल मेहता, हितेश शाह , मनन पटेल आदी मान्यवर उपस्थित होते. भारतीय जनता पार्टी राजस्थान प्रकोष्ठच्या उत्तर रायगड जिल्हाध्यक्षपदी पुखराज सुतार यांची नियुक्ती झाल्याने भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी सदस्यांनी, विविध सामाजिक संस्था संघटनेच्या पदाधिकारी सदस्यांनी, विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पुखराज सुतार यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. व्हाट्सअप, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम आदी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही पुखराज सुतार यांच्यावर शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

अभिलेख दडविल्याबद्दल साझा कुंदे ता. कल्याण ग्राम महसूल अधिकारी यांच्या विरोधात आझाद मैदान ह्या ठिकाणी बेमुदत उपोषण !!

अभिलेख दडविल्याबद्दल साझा कुंदे ता. कल्याण ग्राम महसूल अधिकारी यांच्या विरोधात आझाद मैदान ह्या ठिकाणी बेमुदत उपोषण !!

कल्याण, प्रतिनिधी - कल्याण तहसीलदार अंतर्गत साझा कुंदे ग्राम महसूल अधिकारी श्रीमती मंजुषा राठोड यांच्या कर्तव्यात असलेले कोलिंब ह्या ठिकाणची फेरफार संचिका ३०२ यांची याची माहिती दडवली तसेच त्यांच्या वरिष्ठांना सदर विषयावर अवलोकीत केले तरी त्यांनी यासंदर्भात कोणतीही दखल घेतली नाही याप्रकरणी ग्राम महसूल अधिकारी श्रीमती मंजुषा राठोड त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे या मागणीसाठी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आज दिनांक २९/०९/२०२५ पासून बेमुदत उपोषणास सुरुवात करण्यात आलेली आहे जोपर्यंत कायदेशीर कार्यवाही पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील असे उपोषण करते प्रकाश पवार यांनी सांगितले आहे.

प्रकाश पवार यांच्या उपोषणासंदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी आम्ही तहसिलदार (कल्याण) सचिन वेताळ यांच्याशी फोनवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. असे दिसते की प्रशासन  ग्राम महसूल अधिकारी श्रीमती मंजुषा राठोड यांना पाठीशी घालत आहे.


साझा कुंदे ता. कल्याण ग्राम महसूल अधिकारी यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी आणि जोपर्यंत त्यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याबद्दल गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मी उपोषण सुरुच ठेवणार  - प्रकाश अंकुश पवार

Monday, 29 September 2025

श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून नवदुर्गांचा सन्मान‌ !!

श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून नवदुर्गांचा सन्मान‌ !!

उरण दि ३०, (विठ्ठल ममताबादे) : श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांचे विचार व कार्याचा प्रचार व प्रसार करणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी विविध उपक्रम राबविले जातात.समाजातील सर्व क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांचा योग्य मानसन्मान व्हावा. त्यांच्या कार्याची इतरांना ओळख व्हावी, महिलांना समाजात पुढे जाण्याची प्रेरणा मिळावी, समाजातील शेवटच्या घटकाला मान सन्मान मिळावा, न्याय मिळावा या अनुषंगाने श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी नऊ महिलांचा (नवदुर्गांचा) सन्मान करण्यात येतो. याही वर्षी संस्थेच्या माध्यमातून रँकर्स अकॅडमी, कोप्रोली चौक, उरण येथे नवदुर्गांचा सत्कार सोहळा मोठा उत्साहात संपन्न झाला.

सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष सुप्रिया सुधीर मुंबईकर, सामाजिक कार्यकर्त्या समिधा म्हात्रे, गट शिक्षणाधिकारी निर्मला घरत यांच्या हस्ते श्री गणेश पूजन झाले.प्रमुख पाहुणे आदर्श शिक्षक सुधीर मुंबईकर यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले. यावेळी सदर कार्यक्रमाची प्रस्तावना संस्थेचे कार्याध्यक्ष विठ्ठल ममताबादे यांनी केली. प्रस्तावनेत त्यांनी संस्थेचा थोडक्यात परिचय करून दिला. समिधा निलेश म्हात्रे (सामाजिक क्षेत्र ), डॉ.जागृती म्हात्रे (वैद्यकीय क्षेत्र), तृप्ती भोईर (पत्रकारिता ), हेमांगी नरेश म्हात्रे (शेतकरी क्षेत्र), निर्मला नरेश  म्हात्रे (आशा वर्कर), हर्षाताई लीलाधर ठाकूर (स्वच्छता कर्मचारी), ऍडवोकेट माधवी पाटील (न्यायदान क्षेत्र), निर्मला मच्छिंद्रनाथ घरत (शिक्षण क्षेत्र), अपर्णा अंकित म्हात्रे (पोलीस प्रशासन) या नवदुर्गांचा शाल गुलाब पुष्प प्रशस्तीपत्र, सन्मान चिन्ह, साडी देऊन सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे उत्तम नियोजन व आयोजन केल्याने उपस्थित महिलांनी सदर उपक्रमाचे कौतुक केले व संस्थेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचे आभार मानले . सदर कार्यक्रमाचे सुंदर असे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रसिद्ध निवेदक नवनाथ म्हात्रे (कोप्रोली) यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुदेश पाटील, कार्याध्यक्ष विठ्ठल ममताबादे, सचिव प्रेम म्हात्रे, सह सल्लागार कुमार ठाकूर, सदस्य माधव म्हात्रे, प्रणित पाटील, ओमकार म्हात्रे, साहिल म्हात्रे, प्रकाश म्हात्रे, सुरज पवार, निवेदक नवनाथ म्हात्रे यांनी व संस्थेच्या सर्व पदाधिकारी सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.दरवर्षी नवदुर्गा सन्मान सोहळा कार्यक्रमासाठी आदर्श शिक्षक सुधीर मुंबईकर, सुप्रिया मुंबईकर, प्रतीक मुंबईकर, समिधा मुंबईकर यांचे विशेष सहकार्य लाभत असल्याने संस्थेच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करून त्यांचे आभार मानण्यात आले. एकंदरीत सदर कार्यक्रम मोठया उत्साहात, उत्तम प्रतिसादात संपन्न झाला.

भेंडखळ येथे आदर्श सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ तर्फे विविध उपक्रमाचे आयोजन‌ !!

भेंडखळ येथे आदर्श सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ तर्फे विविध उपक्रमाचे आयोजन‌ !!

** खासदार श्रीरंग बारणे यांनी घेतले दर्शन. मंडळाच्या कार्याचे केले कौतुक

भाविक भक्तांनी घेतले मोठया प्रमाणात दर्शन  

उरण दि ३०, (विठ्ठल ममताबादे) : उरण तालुक्यात नवरात्रौत्सव मोठया प्रमाणात साजरा केला जातो. उरण तालुक्यातील भेंडखळ गावात दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी आदर्श सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ तर्फे नवरात्रौत्सव साजरा होत असून नवरात्रौत्सव साजरा करण्याचे हे यंदाचे २२ वे वर्ष आहे. २००४ पासून सदर नवरात्रौत्सव अखंडितपणे भेंडखळ मध्ये साजरा होत आहे. या नवरात्रौत्सव मध्ये अनेक विविध धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहेत. या मंडळाच्या देवीचे भाविक भक्तांनी मोठया प्रमाणात दर्शन घेऊन विविध कार्यक्रमाचा लाभ सुद्धा घेतला आहे. 

नवरात्रौत्सव दरम्यान मावळ लोकसभा मतदार संघांचे खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांनी या मंडळाला भेट देऊन देवीचे दर्शन घेतले. मंडळानी आयोजित केलेल्या विविध उपक्रमाचे, कार्याचे खासदार श्रीरंग बारणे यांनी कौतुक केले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा, विद्यार्थ्यांचा यावेळी खासदार बारणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आदर्श सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य यांचाही खासदार बारणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आदर्श सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ चांगले कार्य करीत असून विविध उपक्रम राबवून समाजात जनजागृती करीत आहे. या मंडळाचे कार्य कौतुस्कापद, उल्लेखनीय आहे. अशीच जनतेची सेवा आपल्या हातून घडो असे शुभेच्छा देत खासदार बारणे यांनी मंडळाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. नवरात्रौत्सव दरम्यान सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे कार्याध्यक्ष अतुल भगत, अध्यक्ष वैभव भगत, उपाध्यक्ष राकेश भगत, सचिव यतिश भगत, खजिनदार जय भगत, सर्व सल्लागार,सर्व कार्यकारिणी सदस्य, व्यवस्थापकीय सर्व सदस्य, महाप्रसाद समितीचे सर्व सदस्य विशेष मेहनत घेत आहेत.

मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीची विशेष मोहीम !!

मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीची विशेष मोहीम !!

पुणे, दि. २९ सप्टेंबर : राज्य शासनामार्फत "राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा" या कालावधीत मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जात प्रमाणपत्र पडताळणीची विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये इयत्ता १२ वी विज्ञान शाखेत शिक्षण घेणाऱ्या तसेच १२ वी उत्तीर्ण होऊन वैद्यकीय, अभियांत्रिकी, फार्मसी, कृषी, आदी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग, विशेष मागास प्रवर्ग व शैक्षणिक व समाजिकदृष्ट्या मागास प्रवर्ग (मराठा ) या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.

विद्यार्थ्यांनी आपले अर्ज COVIS प्रणाली किंवा www.barti.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन भरून त्याची हार्ड प्रत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, आळंदी रोड, पुणे येथे कार्यालयीन वेळेत सादर करावी. अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२५ आहे.

व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या व अर्ज प्रलंबित असलेल्या विद्यार्थ्यांसाठी दर बुधवारी व गुरुवारी विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले असून परिपूर्ण प्रकरणात तात्काळ जात वैधता प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, अशी माहिती संजय दाणे उपायुक्त तथा सदस्य, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, पुणे यांनी दिली.

रायगड मी मराठी प्रतिष्ठान ( रजि.) तर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन !!

रायगड मी मराठी प्रतिष्ठान ( रजि.) तर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन !!

मुंबई - ( दिपक कारकर )

रायगड मी मराठी प्रतिष्ठान, ( रजि.) उपरोक्त संस्था समाजसेवेचे व्रत हाती घेऊन समाजात चांगले बदल घडविण्यासाठी त्यातून समाज प्रबोधन होऊन,समाजाचा विकास करण्यासोबत पर्यावरण पूरक अभियान सुरू करून निसर्गाला चांगला फायदा करून मनुष्य जीवन सर्वांगाने समृद्ध होण्यासाठी महाराष्ट्रात विविध ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यास नेहमीच प्रयत्नशील असते. मनुष्य जीवनात रक्ताचे महत्व खूप अनमोल आहे.अनेकांचे प्राण वाचविण्याचे सामर्थ्य रक्तामध्ये आहे."रक्तदान हेच खरे जीवनदान "त्याची सामाजिक भावना लक्षात घेऊन रायगड मी मराठी प्रतिष्ठान (रजि.) च्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन दि.०५ ऑक्टोबर २०२५ रोजी (सकाळी ८ ते ४ वाजेपर्यंत) आय बी.पटेल शाळा, स्टेशन रोड, गुरवार बाजार,गोरेगाव स्टेशनच्या बाजूला, गोरेगाव (प.) येथे करण्यात आले आहे. ह्यावेळी समाजातील विविध क्षेत्रातील विविध ठिकाणाहून अनेक प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित राहून मार्गदर्शन करून मोठ्या संख्येने रक्तदान करणार आहेत. तरी सर्वांनी उपस्थित राहावे व ज्यांना शक्य आहे त्यांनी ह्या सामाजिक कार्यात रक्तदाता म्हणून सहभाग घ्यावा. असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे

जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारे महिला नेतृत्व प्रणाली किशोर म्हात्रे !!

जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारे महिला नेतृत्व प्रणाली किशोर म्हात्रे !!

आज महिला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहे. आज महिला पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहेत. जनतेचा सर्वांगीण विकासासाठी राजकारणात आज अनेक महिला सक्रिय आहेत. समाजकारणातून राजकारण व राजकारणातून देश सेवा अशा पद्धतीने आज महिला देश सेवेत समाजसेवेत राजकारणात कार्यरत आहेत उरण तालुक्यातही समाजसेवेचा व राजकारणाचा वसा चांगल्या पद्धतीने महिला चालवत आहेत त्यात एक आदर्श गृहिणी, आदर्श स्त्री, आदर्श ग्रामपंचायत सदस्य आदर्श उपसरपंच, आदर्श समाजसेविका म्हणून उरण तालुक्यातील जसखार गावच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य तथा माजी उपसरपंच म्हणून प्रणाली किशोर म्हात्रे यांचा नामोल्लेख करावा लागेल.

प्रणाली म्हात्रे या उत्तम सामाजिक कार्यकर्त्या असून शिवसेना पक्षाच्या अनेक वेगवेगळ्या पदावर त्यांनी उत्तमपणे काम केले आहे. आपले घरदार सांभाळत असताना ते राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत. या सर्व कार्यामध्ये त्यांच्या सासर आणि माहेरच्या कुटुंबाचे नेहमी पाठिंबा मिळाला आहे. माहेरचे आणि सासरचे नेहमी सहकार्य मिळाले आहे. स्वच्छ चारित्र्य, विकासात्मक दृष्टिकोन, उत्तम नेतृत्व, उत्तम राजकारणी असल्याने प्रणाली किशोर म्हात्रे यांच्या पाठीशी जनता नेहमी ठामपणे उभी राहिली आहे. जनतेच्या सुखदुःखात ते नेहमी सहभागी होत असतात. आज पर्यंत त्यांनी जनतेच्या अनेक अडचणी, समस्या सोडविल्या आहेत त्यामुळे त्यांचा अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात मान सन्मान सुद्धा झाला आहे. जनतेच्या कल्याणासाठी रात्रंदिवस झटणारे नेतृत्व म्हणून माजी उपसरपंच प्रणाली किशोर म्हात्रे हे सर्वांना सुपरिचित आहेत. माजी उपसरपंच प्रणाली किशोर म्हात्रे यांचे पती किशोर म्हात्रे यांचे प्रणाली म्हात्रे यांना नेहमी सहकार्य मिळत आले आहे. किशोर म्हात्रे यांनी दिलेल्या पाठिंब्या मुळे, सहकार्यामुळेच प्रणाली किशोर म्हात्रे यांनी आजपर्यंत अनेक चांगली कामे करून जनतेच्या कौतुकास पात्र ठरले आहेत. गावात विविध विकास निधी आणून कामे मंजूर करून अनेक विकासकामे मार्गी लावल्याने जनतेने नागरिकांनी तसेच ग्रामस्थांनी प्रणाली किशोर म्हात्रे यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक केले आहे.


सौ.प्रणाली किशोर म्हात्रे यांची थोडक्यात ओळख :- 

🟥२०२१ ला राजकारणात प्रवेश केला.
🟥 ⁠गेली पाच वर्ष प्रणाली म्हात्रे या राजकारणात सक्रिय आहे 
🟥 सन २०२३ ला ग्रामपंचायत निवडणूक मधे विजयी होवून उपसरपंच पदाचा कार्यभार सांभाळला. या दरम्यान प्रभारी सरपंच म्हणून सुद्धा उत्तम पणे जबाबदारी पार पाडली. तसेच महिला दक्षता कमिटी त्यानंतर शिवसेना महिला तालुका प्रमुख उरण व जिल्हास्तरीय जिल्हा विकास व सनियंत्रण समिती (दिशा समिती) या कमिटीवर सदस्य पदाचे काम करीत आहेत.

🔘प्रणाली म्हात्रे यांच्या अगोदर त्यांचे वडील राजकारणात सक्रिय होते, ते सन २०१७-२०२२ पर्यंत ग्रामपंचायत जसखार चे सदस्य होते.

🔘 शिक्षण:- प्राथमिक व माध्यमिक शिक्षण आय.इ.एस. जे.एन.पी. विद्यालय येथे झाले. इतर शिक्षण रयत शिक्षण संस्थेचे तू. ह. वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालय येथे झाले.F.Y.B.S.C उत्तीर्ण 

🔘सामाजिक कार्य:- 

🟥गावातील गरजू महिला व मुलांना रोजगार उपलब्ध करून दिले.
🟥 ग्रामपंचायतीच्या निधीतून व विशेष योजनांद्वारे गावातील विधवा महिलांना नियमित आर्थिक मदत उपलब्ध करून दिली.
🟥गावातील १० वी व १२ वी उतीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार केले . 

✳️ग्रामपंचायत च्या माध्यमातून कार्य :- 

🟥गावातील मुख्य रस्ते व आंतरिक रस्त्यांचे सिमेंट काँक्रीट (सीसी) / डांबरीकरण केले.
🟥सार्वजनिक ठिकाणी स्ट्रीट लाईट बसविले व देखभालचे कामे उत्तम पद्धतीने केले.
🟥शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय केली.पाईपलाईन टाकून लोकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली.
🟥वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धन उपक्रम राबविले.
🟥 गावातील महिला बचत गटना फॉरव्हीलर चे प्रशिक्षण दिले.
🟥महाराष्ट्र राज्य व केंद्र शासनाचे विविध योजना सेवा सवलतींची प्रभावीपणे अंमलबजावणी केली.
🟥विविध योजना सेवा सवलतीचा लाभ जनतेला मिळवून दिला.
🟥महाराष्ट्र शासनाच्या जिल्हास्तरीय जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा)चे सदस्य म्हणून कार्यरत असून या समितीचे सदस्य म्हणून उत्तम जबाबदारी पार पाडत आहेत. विविध विषयावर जनजागृती करीत आहेत.

🔘 प्रणाली म्हात्रे यांचा संकल्प :- 

1)गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न __
🟥पिण्याचे पाणी, रस्ते, वीज, स्वच्छता यांसारख्या मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावणे.
🟥 शासकीय योजनांचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणे.

2) शिक्षण व युवकांचा विकास
🟥 गावातील मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करणे.
🟥 युवकांना रोजगार व कौशल्य विकास प्रशिक्षण मिळावे यासाठी योजना राबवणे.

3)महिला सक्षमीकरण
🟥महिलांसाठी स्वयंरोजगार व उद्योग उभारणीच्या संधी उपलब्ध करून देणे.
🟥 विधवा व गरजू महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी आर्थिक व सामाजिक आधार.

4) आरोग्य व पर्यावरण
🟥गावात नियमित आरोग्य शिबिरे आयोजित करणे.
🟥वृक्षारोपण, पाण्याचे संवर्धन आणि स्वच्छतेबाबत जनजागृती करणे.
5) पारदर्शक व न्याय्य कारभार

🟥 प्रत्येक निर्णय व खर्च ग्रामसभेसमोर पारदर्शक ठेवणे.
🟥लोकांच्या विश्वासावर आधारित व भ्रष्टाचारमुक्त कामकाज करणे.

शब्दांकन /लेखन - विठ्ठल ममताबादे, उरण

'यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थे'चा सत्कार मी आयुष्यभर विसरणार नाही : अशोक सराफ

'यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थे'चा सत्कार मी आयुष्यभर विसरणार नाही : अशोक सराफ

चाहत्यांच्या तुफान गर्दीत अशोक सराफ यांचा उलव्यात भव्य नागरी सत्कार !

'बहुरूपी अशोक'च्या मेजवानीने रसिक मंत्रमुग्ध !

उरण दि २९, (विठ्ठल ममताबादे) : "आज जी काही माझी अभिनय क्षेत्रात वाटचाल सुरू आहे ती केवळ रसिकांमुळेच !" रसिक प्रेक्षक माझे मायबाप आहेत. माझ्या आयुष्यात निवेदिता आली आणि आयुष्यच उजळून गेले. सर्वांनाच अशा बायका मिळतात असे नाही. मी रसिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचे काम प्रामाणिकपणे केले, मला महाराष्ट्राच्या जनतेने भरभरून प्रेम दिले. या पूर्वी माझे अनेक सत्कार झालेत, पण उलव्यातील नागरी सत्कार मी आयुष्यभर विसरणार नाही. त्यामुळे महेंद्रशेठ घरत यांच्याही प्रेमात मी पडलोय व त्यांच्याबद्दल माझ्यामनात आदर वाढला," असे 'पद्मश्री' आणि 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कारप्राप्त अशोक सराफ नागरी सत्काराला उत्तर देताना म्हणाले.

मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते, अभिनयाचे बादशहा अशोक सराफ यांचा हजारो चाहत्यांच्या तुफान गर्दीत उलव्यातील 'भूमिपुत्र भवन' येथे रविवारी सपत्निक भव्य नागरी सत्कार सोहळा झाला. यावेळी नरेंद्र बेडेकर निर्मित 'बहुरूपी अशोक'च्या मेजवानीने रसिक मंत्रमुग्ध झाले होते. हा नागरी सत्कार समारंभ यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेने आयोजित केला होता. या सोहळ्याला माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय गृहमंत्री आणि आंध्र प्रदेशचे माजी राज्यपाल सुशीलकुमार शिंदे, महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक, रायगडचे खासदार सुनील तटकरे, माजी खासदार रामशेठ ठाकूर उपस्थित होते.

अशोक सराफ यांच्यावर प्रेम करणारे चाहत्यांनी तुफान गर्दी केल्याने 'भूमिपुत्र भवन' खचाखच भरले होते. यावेळी अशोक मामांना रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात सलामी दिली. रायगडचे खासदार सुनील तटकरे म्हणाले, "अशोक सराफ यांच्यासारखा कलाकार पुन्हा होणे नाही. त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळायला हवा. आम्हालाही राजकारणात रोज नवनवीन भूमिका कराव्या लागतात. अशा सर्व कलाकार मंडळींना एकत्र आणण्याचे काम महेंद्रशेठ घरत यांनी केले. ही किमया केवळ महेंद्रशेठ हेच करू शकतात."

माजी खासदार रामशेठ ठाकूर म्हणाले, "आम्ही आजही अशोक सराफ यांचे चित्रपट आणि सिरीयल बघत असतो. महेंद्रशेठ माझा शिष्य नाही तर भाऊ आहे असे मी मानतो."
 
माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले, "अशोक सराफ यांनी महाराष्ट्रीयन जनतेला खळखळून हसविले. रायगडसाठी लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे योगदान खूप मोठे आहे. रोखठोक बोलण्याची ते नेहमी तयारी ठेवायचे. ज्यावेळी साडेबारा टक्क्यासाठी गोळीबार झाला त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनाही त्यांनी सोडले नाही. सांस्कृतिक मंत्री असताना चित्रपट सृष्टीसाठी खूप मोठे योगदान मी दिले आहे. महेंद्र घरत गुणवत्ता असूनही राजकारणामध्ये थोडे मागे राहिले त्यांना योग्य स्थान मिळायला हवे." राज्याचे वनमंत्री गणेश नाईक म्हणाले, "अशोक सराफ यांचे चित्रपटसृष्टीसाठी योगदान खूप मोठे आहे. रसिकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवत ते आजही काम करत आहेत. निवेदिता सराफ यांचे अशोक सराफ यांच्या जीवनामध्ये खूप मोठे योगदान आहे. तसेच महेंद्र घरत यांनी मनामध्ये ठरवले तर ते काहीही करू शकतात. एकाच व्यासपीठावर अनेक पक्षातील नेत्यांना एकत्र आणण्याचे काम तेच करू शकतात."

यावेळी महेंद्रशेठ घरत म्हणाले, "भूमिपुत्र भवनाच्या निर्मितीत माझा सिंहाचा वाटा आहे. उरणचे हुतात्मा स्मारकाची मागणी केली, भूखंड आरक्षित झाला, पण खारफुटीत अडकला. आता तो उभारण्याबाबत मान्यवर मंडळींनी प्रयत्न करावेत." यावेळी शिवव्याख्याते प्रशांत देशमुख, साई मंदिर वहाळचे संस्थापक रविशेठ पाटील, शिवसेनेचे बबनदादा पाटील, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, मिलिंद पाडगावकर, माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील, विनोद म्हात्रे, गोपाल पाटील,राम हरी म्हात्रे, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होते. शेलघर येथील यमुना सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महेंद्रशेठ घरत आणि सचिव शुभांगीताई घरत यांनी रायगड, नवी मुंबईतील नागरिकांच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन केले होते.

कोट (चौकट ):- 

"कलेवर मी प्रेम करतो. नाटक, चित्रपट, क्रिकेट यांची मलाही आवड आहे. कला जिवंत राहावी, तिला चांगले व्यासपीठ मिळावे, म्हणून ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्यासारख्या  दिग्गज अभिनेत्याला उलवे नगरीत आणले. रसिकांच्या तुडुंब गर्दीत आज त्यांना 'याचि देही याचि डोळा' सर्वांनी पाहिल्याने मलाही मनस्वी आनंद झाला. त्यांना मानाचा मुजरा करतो."
     - महेंद्रशेठ घरत, आंतरराष्ट्रीय कामगार नेते.

राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान दिवस निम्मित जीवनदाता सामाजिक संस्था रक्तदान शिबिराचे आयोजन !!

राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान दिवस निम्मित जीवनदाता सामाजिक संस्था रक्तदान शिबिराचे आयोजन !!

मुंबई - निलेश कोकमकर 

जीवनदाता सामाजिक संस्था दरवर्षी १ ऑक्टोबर – राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान दिवस विशेष उत्साहात साजरा करत असून यंदा सलग १९ व्या वर्षी हा उपक्रम राबवला जाणार आहे. अनेक रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी, त्यांच्या आयुष्यात हसू उमलण्यासाठी  निःस्वार्थ रक्तदानाची गरज असते म्हणून सुट्टी असो वा नसो, महिन्याचा पहिला दिवस असो वा कामाचा, या दिवशीच रक्तदान करून समाजासाठी योगदान द्यावे हा संस्थेचा ठाम संकल्प आहे. व्हॅलेंटाईन डे, फ्रेण्डशिप डे अशा दिवसांप्रमाणेच रक्तदान दिवस देखील समाजाने मोठ्या प्रमाणात साजरा करावा, या उद्देशाने जीवनदाता परिवाराची स्थापना झाली.

कोविड काळातील निर्बंध असतानाही रक्तदात्यांनी न घाबरता १ ऑक्टोबरलाच प्रत्यक्ष रक्तपेढीत जाऊन रक्तदान करून हा दिवस साजरा केला होता. यंदाही ही परंपरा पुढे सुरू ठेवत बुधवार, १ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत रक्तपेढी, के.ई.एम. रुग्णालय, परेल, मुंबई – ४०००१२ येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. घराजवळच्या शिबिरात रक्तदान करणे अनेकांसाठी सोयीचे असते, परंतु कामाच्या दिवशी लांब जाऊन रक्तपेढीत रक्तदान करणे ही खरी सामाजिक बांधिलकी असल्याचे संस्थेचे म्हणणे आहे.

या रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होऊन सामाजिक बांधिलकी पार पाडावी, असे आवाहन जीवनदाता सामाजिक संस्था तर्फे करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी संपर्क गणेश आमडोसकर – ९८९२७१४१३१ यांच्याशी संपर्क साधावा.

Sunday, 28 September 2025

उद्यमनगर येथुन युवक बेपत्ता, चार दिवसा पुर्वी तक्रार देवून ही, रत्नागिरी पोलीसांची तपासात काहीच प्रगती नाही !

उद्यमनगर येथुन युवक बेपत्ता, चार दिवसा पुर्वी तक्रार देवून ही, रत्नागिरी पोलीसांची तपासात काहीच प्रगती नाही !

रत्नागिरी/ प्रतिनिधी 
रत्नागिरी मधील सामाजिक कार्यकर्त्या सौ फैमिदा सुर्वे  यांचे पती अली फारुक  सुर्वे हे गेल्या सहा दिवसापासुन बेपत्ता आहेत. रितसर तक्रार देण्यात आली आहे. रत्नागिरी पोलिसांना अद्याप कसलाच ठाव ठिकाणा मिळत नाही, लोकेशन मिळत नाही, पोलिस तपास पुढे सरकत नाही असेच चित्र दिसत आहे. बेपत्ता व्यक्तिचा शोध घेण्यात तत्परता दिसत नाही असे मत बेपत्ता  व्यक्तीच्या कुटुंबाने व्यक्त केले आहे. पूढील चोवीस तासात तपासाला गती आली नाही तर, सर्व कुटुंब उपोषणास बसणार आहेत असेही सांगितले. खंडाळा येथून सुद्धा दोन बेपत्ता व्यक्ति झाल्या होत्या, त्यात संबंधित पोलीसानी तपास तत्परतेने  न हाताळल्याने  त्यांचा खून झाल्याचे दिसून आले. अशा घटना जर आता रत्नागिरी वाढत असतील तर मग सामान्य माणसाचे काय होणार? या बेपत्ता तरुणाचे पोलिसांनी लवकरात लवकर शोध न लावल्यास सुर्वे परिवाराकडुन आमरण उपोषण करण्यात येईल अशा इशारा सुर्वे कुटुंबाकडून देण्यात आला आहे.

माहितीस्तव सादर - विलासराव कोळेकर सर 

चाईल्ड केअर संस्थेतर्फे नवदुर्गांचा सन्मान !!

चाईल्ड केअर संस्थेतर्फे नवदुर्गांचा सन्मान !!

उरण दि २८, (विठ्ठल ममताबादे) :
चाईल्ड केअर सामाजिक संस्था रायगड तर्फे अनेक वर्ष विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्यातील दर वर्षी दिले जाणारे नवदुर्गा सम्मान हा एक उपक्रम संस्थेचे संस्थापक विकास कडू यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केला जातो. तसेच या वर्षी हि नवदुर्गा सन्मान रायगड २०२५  हा पुरस्कार रायगड जिल्हातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना देण्यात आले. कनिष्का नाईक (महिला पोलीस) टाकीगाव, उरण, प्रा.अपूर्वा अनिल देसाई (योग शिक्षिका) महड रायगड, प्रतीक्षा सचिन चव्हाण (सामाजिक कार्य), शीतल शैलेश दर्णे (शालेय सेविका) केगांव उरण, करुणा ईश्वर ढोरे (समाजसेविका), पनवेल, कु. हदया सुदर्शन जाधव (गायिका) कळबूसरे उरण, सीमा प्रमोद मोरे (संपादिका, पत्रकार) पोलादपूर, निकिता सुरेश पाटील (अभिनेत्री) बोकडवीरा उरण, डॉ.वनिता श्रीकांत पाटील (वैद्यकीय) बोकडवीरा, उरण या महिलांना सन्मान चिन्ह, ट्रॉफी, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. या नवदुर्गाचे यथोचित मानसन्मान करण्यात आला. तसेंच या प्रसंगी रायगड मध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा रायगड विशेष सन्मान पुरस्कार देऊन गुण गौरव करण्यात आले. प्रकाश ठाकूर निवेदक-धुतम उरण, सचिन किसन गावंड (शैक्षणिक क्षेत्र) पेण, भूषण दामोदर भोईर (नूत्य दिग्दर्शक) मोठी जुई उरण ,कु विनायक म्हात्रे (युट्युबर) खारपाडा, पनवेल, उत्तमकुमार कडवे (गायक) करळ उरण, राजेश द्वारकानाथ ठाकूर (अभिनेता) भेंडखळ उरण ,हितेश अशोक म्हात्रे (निवेदक) जसखार उरण, कैलासराजे कमलाकर घरत (सामाजिक कार्य व पत्रकार) खारपाडा पेण, राजेश रामचंद्र चोघुले (सामाजिक कार्य), शिक्षक कुंडेगाव उरण ,विवेक गजानन केणी  (गायक) चिरनेर उरण, रोशन घरत व भाग्यश्री घरत (अभिनय) खोपटे उरण, साहील कडू व परी कडू (संगीत /ब्लॉगर) सोनारी उरण, नितेश तांडेल व तेजस्वी तांडेल (युट्युबर) जसखार उरण यांचा रायगड विशेष सन्मान पुरस्कार २०२५ देऊन सन्मान करण्यात आला.
 
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मिलिंद खारपाटील संपादक आवाज महामुबंई चैनल, डॉ राजू पाटोदकर सिने आभिनेते, शिवराज अनंत पार्टे माजी नगर सेवक पोलादपूर तसेच चाईल्ड केअर संस्थेला वेळो वेळी मदत करणारे महेश कडू माजी सरपंच सोनारी, मेघनाथ तांडेल (माजी अध्यक्ष पागोटे), भार्गव पाटील (माजी सरपंच पागोटे), सुजित तांडेल (माजी उप सरपंच पागोटे), विठ्ठल ममताबादे (चाईल्ड केअर संस्था मीडिया सल्लागार) उपस्थित होते. सदर सन्मान सोहळा प्रसंगी चाईल्ड केअर सामाजिक संस्थेचे विकास कडू (संस्थापक अध्यक्ष), विक्रांत कडू (कार्याध्यक्ष), विवेक पाटील (अध्यक्ष), मनोज ठाकूर (कार्याध्यक्ष), प्रकाश ठाकूर (सचिव), कैलास राजे घरत (पेण अध्यक्ष), विनायक म्हात्रे (पनवेल अध्यक्ष), हितेश म्हात्रे (उपाध्यक्ष), राजेश ठाकूर (उपाध्यक्ष), हितेश म्हात्रे (उपाध्यक्ष),तुषार ठाकूर (सहचिटणीस), ह्रितिक पाटील (सहचिटणीस), भूषण भोईर, उद्धव कोळी, विश्वनाथ घरत, सचिन गावंड (कार्याध्यक्ष), रिया कडू, सहसचिव विवेक कडू आदित्य पारवेहे आदी पदाधिकारी सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विवेक पाटील यांनी केले व निवेदन प्रकाश ठाकूर यांनी केले आणी आभार प्रदर्शन विकास कडू यांनी मानले. शेवटी विकास कडू यांनी सर्व पाहुण्यांचे आभार मानले व नवदुर्गाचे तोंड भरून कौतुक केले. यावेळी पागोटे गावातील शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. नव दुर्गा सन्मान कार्यक्रम विकास कडू यांच्या संकल्पनेतून करण्यात आला. या चाईल्ड केअर सामाजिक संस्था रायगड च्या उपक्रमास ग्रामस्थांनी भरभरून दाद दिली. या कार्यक्रमाला महेश कडू माजी सरपंच सोनारी यांनी संस्थेला आर्थिक मदत केली. या कार्यक्रमा बद्दल बोलताना चाईल्ड केअर सामाजिक संस्थाचे संस्थापक, अध्यक्ष  विकास कडू बोलताना म्हणाले कि "नवदुर्गा सन्मान कार्यक्रम आयोजित करताना आम्हाला आतिशय आनंद होत आहे कारण हा सन्मान नारी शक्तीचा सन्मान आहे या सन्मानाने रायगड च्या संपूर्ण नारी शक्ती सन्मान झाला आहे.आणि यामुळे ९ महिला नव्हे तर हजारो स्त्रिया आप आपल्या क्षेत्रात उल्ल्खनीय कार्य करतील असे मनोगत व्यक्त केले 

एकंदरींत चाईल्ड केअर सामाजिक संस्थेतर्फे नवदुर्गांचा  सन्मान सोहळा मोठया उत्साहात, उत्तम प्रतिसादात संपन्न झाला.

को.ए.सो. हायस्कूल, केळवणेची पावसाळी तालुका क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये ऐतिहासिक कामगिरी !!

को.ए.सो. हायस्कूल, केळवणेची पावसाळी तालुका क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये ऐतिहासिक कामगिरी !!

उरण दि २८, (विठ्ठल ममताबादे) :
केळवणे येथील को.ए.सो. हायस्कूल शाळेने पावसाळी तालुका क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये उल्लेखनीय यश मिळवत गेल्या काही दशकात  सर्वोत्कृष्ठ  कामगिरी केलेली आहे. या स्पर्धेत शाळेच्या तीन संघांनी अंतिम फेरीत दमदार विजय मिळवून जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी आपली पात्रता निश्चित केली आहे.

अंडर -१४ वयोगटातील मुलींच्या संघाने चावणे विद्यालयावर विजय मिळवला.अंडर -१७ वयोगटातील मुलींच्या संघानेही चावणे विद्यालयाचा पराभव केला.अंडर -१७ वयोगटातील मुलांनी कासारभट इंग्लिश मिडियम स्कूल विरुद्ध निर्णायक सामना जिंकला. या तिन्ही संघांच्या यशामुळे शाळेने सामूहिक स्तरावर तालुक्यात आपली मजबूत छाप सोडली आहे. यासोबतच, तालुका अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा २०२५ मध्येही विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. पूर्वा नवनीत मोकल – ४०० मीटर धावण्यामध्ये प्रथम क्रमांक मिळविला, कु. मुग्धा भास्कर म्हात्रे – ८०० मीटर धावण्यामध्ये प्रथम क्रमांक पटकाविला आहे ,कु. यश विजय ठाकूर – ८०० मीटर धावण्यामध्ये द्वितीय क्रमांक मिळविला आहे. या सर्व विद्यार्थ्यांच्या यशामुळे शाळेचा क्रीडा क्षेत्रातील आत्मविश्वास व प्रतिष्ठा अधिकच वृद्धिंगत झाली आहे. मुख्याध्यापक रामचंद्र गणा पाटील, क्रीडा शिक्षक अनमोल पगारे, देविदास गागुर्डे व संपूर्ण शिक्षकवृंद, सामाजिक कार्यकर्ते प्रेम म्हात्रे,अमित पाटील यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांना जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Saturday, 27 September 2025

"सिध्दी कातकरने" जिल्हास्तरीय रायफल शुटींग स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले...

"सिध्दी कातकरने" जिल्हास्तरीय रायफल शुटींग स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले...

** शिवसेना महिला शहरप्रमुख रूचिता नाईक यांच्या वतिने सत्कार

नालासोपारा, प्रतिनिधी ता, २७ :- नालासोपारातील  सिध्दी बाबुराव कातकर हिने जिल्हास्तरीय महाविद्यालयीन क्रीडा रायफल शुटींग स्पर्धेत चमकदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदक आपल्या नावे करत पालघर जिल्हायाचे नाव उज्वल केले आहे. सिध्दी ने यापूर्वीही अनेक स्पर्धांत चमकदार कामगिरी केली आहे. तिच्या या यशाबद्दल शिवसेना महिला आघाडी च्या वतिने शिवसेना महिला शहरप्रमुख रूचिता नाईक यांनी तिचे अभिनंदन केले आहे.

स्पर्धेदरम्यान सिध्दी ने उत्कृष्ट तांत्रिक कौशल्य, आत्मविश्वास आणि चिकाटी दाखवत प्रतिस्पर्ध्यांना दमदार टक्कर दिली. तिच्या निखळ मेहनतीमुळे व क्रीडाप्रेमामुळेच हे यश मिळाल्याचे तिचे मार्गदर्शक शिक्षक व आई वडिल सांगतात.
या विजयामुळे राष्ट्रीय पातळीवर हि ती दमदार प्रदर्शन करेल, कुटुंबीयांची अपेक्षा आहे. शिवसेना महिला आघाडीच्या वतिने तीचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

जिल्हास्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून आपल्या पालघर जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. तुमची ही कामगिरी अत्यंत कौतुकास्पद आहे. तुमच्या उत्कृष्ट खेळाचे आणि मेहनतीचे हे फळ आहे. या यशाबद्दल तुमचे मनःपूर्वक अभिनंदन करत रूचिता नाईक यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना महिला आघाडी उपशहर संघटक भाविका छावडा, शाखा संघटक वंदना ढगे जया गुप्ता, भारती कातकर उपस्थित होते.

बेस्ट कामगार सेना (उ.बा.ठा) गटातील कुलाबा, घाटकोपर, आणि मजास या आगारातील सभासद,पदाधिकारी यांचा बाळासाहेब भवन येथे राष्ट्रीय कर्मचारी सेनेत मोठ्या संख्येने प्रवेश !!

बेस्ट कामगार सेना (उ.बा.ठा) गटातील कुलाबा, घाटकोपर, आणि मजास या आगारातील सभासद,पदाधिकारी यांचा बाळासाहेब भवन येथे  राष्ट्रीय कर्मचारी सेनेत मोठ्या संख्येने प्रवेश !!

मुंबई (समीर खाडिलकर/शांताराम गुडेकर) :
           शिवसेनेचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार आणि मा. आमदार शिवसेना सचिव प्रवक्ते राष्ट्रीय कर्मचारी सेना अध्यक्ष श्री.किरण पावसकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली बेस्ट कामगार सेना (उ.बा.ठा) गटातील कुलाबा, घाटकोपर, आणि मजास  या आगारातील सभासद,पदाधिकारी यांचा बाळासाहेब भवन येथे दिनांक २६.०९.२०२५ रोजी राष्ट्रीय कर्मचारी सेनेत मोठ्या संख्येने प्रवेश घेण्यात आला.

           तसेच बेस्ट कर्मचाऱ्यांना मागील तीन वर्षा पासून भरघोस बोनस देण्याचे काम महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा.श्री. एकनाथजी शिंदे साहेब व राष्ट्रीय कर्मचारी सेनेमुळेच आपल्याला भेटलेले आहे असे कामगारांनी सांगितले आणि शिंदे साहेबांचे आभार ही मानले.
           पावसकर साहेबांनी बेस्ट कामगारांना मार्गदर्शन करताना सांगितले की बेस्ट कामगारांचा मेळावा हा लवकरच घेण्याविषयी चर्चा झालेली आहे. त्या मेळाव्यास खा. डॉ. श्रीकांत शिंदे साहेब बेस्ट कामगारांना मार्गदर्शन करतील. सोबत राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे बेस्ट युनिट अध्यक्ष श्री.किसन वाळुंज सरचिटणीस श्री. किरण साळुंखे, कोर कमिटी, राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे चिटणीस श्री. सचिन लिमन, बेस्टचे कर्मचारी आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नाट्य क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणारी रत्न नगरीची नवदुर्गा सौ.रक्षिता पालव !!

नाट्य क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणारी रत्न नगरीची नवदुर्गा सौ.रक्षिता पालव !!

          सन 2003 मध्ये "वेडा वृंदावन" या नाटकातून आवड म्हणून रंगभूमीशी नाते जुळले.... पुढे ही आवड राहिली नाही... ती गरज झाली... कारण घरची अत्यंत गरिबी... जीवनाशी संघर्ष करायचा म्हणजे काहीतरी करायला हवे होतेच आणि मग नाटकाकडे वळले, मानधन घेऊन काम करू लागले, आयुष्याचा प्रवास तिथूनच सुरू झाला असे भावपूर्ण उद्गार रक्षिता महेश पालव हिने काढले. 
             सध्या ती स्टेट बँक कॉलनी, कृष्णा अपार्टमेंट मध्ये स्वतःच्या घरात राहते. सुरुवातीचा काळ हा फारच  भयावह होता... त्यात मुलांना वाढविणे त्यांचे शिक्षण, अशा अनेक जबाबदाऱ्या पार पाडताना तिला नाटकाचा मोठा आधार होता. 
             अजिंक्यतारा , संकल्प कला मंच, कलारंग वरवडे, अशा संस्थांमधून तिने काम करण्यास सुरुवात केली.  चांदणे  शिंपीत जा, मी माझ्या मुलांचा, कुसुम मनोहर लेले, आई रिटायर होते, माझं काय चुकलं?, एखाद्याचं नशीब, दिवसा तू रात्री मी, या सर्व नाटकांचे मिळून 250 पेक्षा जास्त प्रयोग झाले. शिवाय तो येणार आहे, रुक्ष, दिवा जळू दे सारी रात, माझ्या सासरच्या  मंदिरी, एक डाव भटाचा, शांतीच कार्ट चालू आहे, वेगळ व्हायचंय मला, कन्याही सासुरासी जाये, उंबरठ्यावरी माप ठेविले, फुलाला सुगंध मातीचा,  अधांतर, एक्सपायरी डेट, तो एक अरुणास्त, या नाटकांचेही अनेक प्रयोग झाले. रक्षिता यांनी एका वर्षात 48 नाटकातून भूमिका केल्या त्यामध्ये अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या स्पर्धेतील नऊ नाटकांचा समावेश आहे. 
             रंगभूमीवरील पदार्पणात अजित पाटील सारख्या मातब्बर दिग्दर्शकाच्या हाताखाली काम करावयास मिळाले, त्यानंतर गुळवणीसर, दशरथ रांगणकर, श्रीकांत पाटील, यांच्याही दिग्दर्शनाचा तिला फायदा झाला. 
             गेल्या काही वर्षात राज्य नाट्य स्पर्धेमध्ये भाग घेऊन पारितोषिक मिळवणे मानाचे समजले जाते... रक्षिताही त्यात मागे  नाही.. नव्हती, मेला तो शेवटचा,  मावळतीचा इंद्रधनु,  वाटेला सोबत हवी, या तिन्ही नाटकांमध्ये भूमिका करून रक्षिताने उत्कृष्ट  अभिनयाचे प्रमाणपत्र पटकावले, तसेच कामगार कल्याण केंद्र विक्रोळी येथे संकल्प कला मंच तर्फे सादर झालेल्या नाटकात उत्कृष्ट अभिनेत्रीचे तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या स्पर्धेतील  चांदणे शिंपीत जा, या नाटकातील भूमिकेसाठी सुद्धा प्रथम क्रमांकाचे पारितोषिक तिला मिळाले. 
            " एक गाव भुताचा" या दूरदर्शनच्या मालिकेमध्ये तसेच झी मराठीवरील एक मालिका, चार शॉर्ट फिल्म मध्ये तिने भूमिका केली होती.
            रक्षिताने आत्तापर्यंतच्या या प्रवासात  १४००पेक्षा जास्त नाट्यप्रयोगातून भूमिका केलेल्या आहेत.
           ... विशेष म्हणजे सावरकर नाट्यगृहातील स्पर्धेचा नाट्य प्रयोग संपल्यानंतर लगेच रक्षिता गावातल्या नाटकाच्या प्रयो गासाठी वेळेवर पोहोचली, असेही एकमेव उदाहरण सांगता येईल, तसेच ऐनवेळी नाटकात काम करण्याचे धाडस तिने दोन वेळा केलेले आहे, अशी ही हरहुन्नरी कलाकार आजही पन्नाशीच्या उंबरठ्यावर असताना नाटकातून काम करीत आहे. तिच्या या प्रवासाला शुभेच्छा देऊन इथेच थांबतो.

शब्दांकन - श्रीकांत पाटील
संकलन - दीपक मांडवकर

Friday, 26 September 2025

अनिर्वेध चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित नवदुर्गा पुरस्कार २०२५ जाहीर !!

अनिर्वेध चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित नवदुर्गा पुरस्कार २०२५ जाहीर !!

मुंबई, प्रतिनिधी : अनिर्वेध चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने, दरवर्षी विविध श्रेत्रात उल्लखनीय कार्य करणा-या महिलांचा "नवं दुर्गा पुरस्कारा" ने सन्मानीत करण्यात येते. २०२५ वर्षीचा पुरस्कार - निर्मला सामंत - प्रभावळकर ( माजी महापौर), डॉ.गायत्री पांडव, सिल्व्हिया फार्नांडिस (स्पिरिट्युअल), नेहा पावसकर (अंध स्पोर्ट्स कोच), सावली परब (योगा शिक्षिका),अर्जंना भारत गणेशपुरे (सेलिब्रेटी), सिचिता महाले (शिक्षिका),  विराली मोदी (मोटीवेशनल स्पीकर) व वंदना मिरचंदा (उद्योजिका) यांना जाहीर झाला.
         नवदुर्गा पुरस्कार २०२५ सोहळा,  गोरेगाव पूर्व येथील जय लीला हॉटेल येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.   
      कार्यक्रमाची सुरुवात डि पी अग्रवाल यांच्या हस्ते दीप प्रज्वलाने व अंध गायिका - विजयालक्षमी यादव हिच्या गरबा गीताने झाली. प्रथमच असंख्य अंध महिला - पुरुषानी गरबा नृत्यात सहभाग घेऊन सभागृह दणाणुन टाकले.

         संस्थेचे विश्वस्त - सचिन सरकाळे, अंजली सरकाळे व अश्विनी बोरगावकर यांच्या हस्ते नवदुर्गा चा सन्मानचिन्ह, शाल, पुस्तक व भेटवस्तू देऊ सन्मानीत करण्यात आले. तसेच उपस्थित पाहुण्याचा शाल व भेटवस्तू  देऊन सत्कार करण्यात आला. उत्कृष्ठ नृत्या बाबत दोन, अंध महिलांना भेट वस्तू देऊन गौरवण्यात आले.
       सर्व नवदुर्गानी मनोगत व्यक्त करून, अंजली सरकाळे यांचे आभार मानले. सूत्रसंचलन चिराग मुनानी व पूजा काळे यांनी केले व उपस्थिताचे आभार, सचिव अंजली सरकाळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शैलजा बोन्द्रे व कृतिका पवार यांनी खूपच मेहनत घेतली होती.

Thursday, 25 September 2025

हरवला आहे..‌..

हरवला आहे..‌..

शहाड येथील सेंचुरी हायस्कूलमध्ये इयत्ता दहावी मधील कांबा गावात रहात असलेला शिवशंकर मल्लिकार्जुन मालपोल हा विद्यार्थी दिनांक २४/०९/२०२५ रोजी कांबा येथून दुपारी ४ च्या सुमारास वरप येथे क्लास साठी जातो म्हणून घरी सांगून गेला परंतु सदर मुलगा हा क्लासला न जाता बेपत्ता झाला आहे. त्यामुळे त्याच्या आजीने क्लास मध्ये जाऊन चौकशी केली असता तो त्याच्या मित्राच्या वाढदिवसाला जाणार होता परंतु मित्रांकडे  चौकशी केली असता तो वाढदिवसाला आला नाही असे सांगितले, त्यामुळे त्याच्या आज्जीने टिटवाला पोलीस स्टेशन यांच्याकडे तक्रार नोंदवली असून पोलीस तपास सुरू आहे परंतु सदर मुलाचे  आई वडील नसल्याने तो त्याच्या आजीकडे कांबा येथे राहत आहे तरी सदर मुलगा कोणाला दिसल्यास या नंबरवर ( ९५६१४८१३३८ ) संपर्क साधावा .
 
ओळख 
चॉकलेटी कलरचा टी-शर्ट , काळया कलरची फुल पँट,पायात काळया कलरची सँडल, गळ्यामध्ये चांदीची चैन, व शाळेची काली बॅग

वृत्तांत / तसेच अधिक माहितीसाठी 
प्रतिनिधी : राजेंद्र शिरोशे ( ९१५६७६७०१० )

तहसील कार्यालय अंबरनाथ व भटके विमुक्त सामाजिक संस्था यांचे माध्यमातून शासकीय दाखले मिळविण्यासाठी जनजागृती !!

तहसील कार्यालय अंबरनाथ व भटके विमुक्त सामाजिक संस्था यांचे माध्यमातून शासकीय दाखले मिळविण्यासाठी जनजागृती !!

अंबरनाथ, प्रतिनिधी:
भटके विमुक्त समाजातील विशेष करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती मिळवून घेण्यासाठी आवश्यक असलेलं जात प्रमाणपत्र मिळविण्यासाठी खुप अडचणी येतात, भटके विमुक्त समाजासाठी शासनाकडून विविध स्तरांवर योजना राबविण्यात येतात परंतु आपण त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र असणे आवश्यक असते यासाठी भटके विमुक्त सामाजिक संस्था आपली सामाजिक बांधिलकी जोपासत समाजात जनजागृती करून भटके विमुक्त समाजाला शासकीय दाखले मिळविण्यासाठी मार्गदर्शन करते याच अनुषंगाने आज बुधवार दि २४ सप्टेंबर २०२५ रोजी तहसील कार्यालय अंबरनाथ येथे समाजबांधवांना शासकीय दाखले मिळविण्यासाठी जनजागृती करून मार्गदर्शन केले.

शासकीय दाखले मिळविण्यासाठी भटके विमुक्त समाजाचे विद्यार्थी व विद्यार्थिनी तसेच पालक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कागदपत्रे सादर केली, कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे पदाधिकारी मदत करत होते. याप्रसंगी भटके विमुक्त समाजाचे शिष्टमंडळ यांनी मा तहसीलदार साहेब यांना भेटून शासकीय दाखले मिळविण्यासाठी जनजागृती करून उपक्रम राबविण्यात आल्याबद्दल आभार व्यक्त केले.

याप्रसंगी भटके विमुक्त  सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुंदर डांगे, शिवसेना शिंदे गटाचे ओबीसी व्हीजेएनटी अंबरनाथ तालुका प्रमुख परशुराम जाधव, कंजारभाट समाजाचे विनोद तमायचीकर, शेखर अभंगे, कैलास घुमान, विनोद परमार, मुकेश चव्हाण, बहुजन विचार प्रणेते विजय हनुवते व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

पंचरत्न मित्र मंडळाच्या वतीने चेंबूर वेल्फेअर मराठी शाळा (प्राथमिक विभाग), येथील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य स्टील कपाटे, कंप्यूटर ट्रॉली, खुर्च्या इत्यादी साहित्य वाटप !!

पंचरत्न मित्र मंडळाच्या वतीने चेंबूर वेल्फेअर मराठी शाळा (प्राथमिक विभाग), येथील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य स्टील कपाटे, कंप्यूटर ट्रॉली, खुर्च्या इत्यादी साहित्य वाटप !!

मुंबई, (शांताराम गुडेकर) :
      चेंबूर वेल्फेअर मराठी शाळा (प्राथमिक विभाग), भक्तीसागर को. ऑप हौ. सोसा. बिल्डींग नं. ५, नवीन म्हाडा वसाहत, वाशीनाका, चेंबूर, मुंबई येथील गरजू विद्यार्थ्यांना पंचरत्न मित्र मंडळाच्या वतीने शाळेतील गरीब व गरजू मुलांना वहया, कंपासबॉक्स, स्केल, बिस्कीट, चॉकलेट, मॅगो फ्रुटी वाटप करण्यात आले. शिवाय स्टील दोन कपाटे , कंप्यूटर ट्रॉली, खुर्च्या इत्यादी साहित्य भेट म्हणून देण्यात आल्या. चित्रकला स्पर्धा, कथाकथन सुलेखन स्पर्धेचा बक्षिस समारंभ वितरणही करण्यात आला. 

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री. संजय पेटकर साहेब महाप्रबंधक (सी.सी आणि सीएसआर आरसीएफ), विशेष पाहुणे म्हणून मा.श्री.पराग दांडेकर साहेब उपमहाव्यवस्थापक, आर.सी.एफ.लि. चेंबूर,श्री.विठ्ठल खरटमोल - मा नगरसेवक ,
मा.डॉ.रजनीश कुमार साहेब मॅनेजर (आर.सी. एफ लि. चेंबूर), मा.श्री.धनंजय खामकर साहेब (सल्लागार - आर.सी.एफ.लि. चेंबूर), मा. श्री. संतोष शिकतोडे साहेब (उप अभियंता, नवी मुंबई महानगर पालिका), श्री.भालचंद्र पाटे अध्यक्ष (मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघ), मुख्याध्यापिका श्रीमती श्रद्धा उजाले आदी मान्यवर उपस्थित होते. 

प्रमुख पाहुणे मार्गदर्शन करताना म्हणाले की मातृभाषेतून शिक्षण घेतल्यास लगेच समजते, आकलन होते. अनेक नामांकित मराठी व्यक्तिमत्वांनी मराठी माध्यमातूनच शिक्षण घेतले, त्यांचे पुढे काही अडले नाही; त्यामुळे पालकांनी आपल्या मुलामुलींना मराठी माध्यमाच्या शाळांतून शिकवावे असे त्यांनी प्रतिपादन केले. 

याप्रसंगी पंचरत्न मित्र मंडळाचे अध्यक्ष अशोक भोईर, सचिव प्रदीप गावंड उपस्थित होते. पंचरत्न मित्र मंडळाने नेहमीच समाजातील दुर्बल घटक सांठी विशेष तत्पर राहून मोठे योगदान दिले आहे .शैक्षणिक संस्थांसाठी मदत कार्यात मोठी आघाडी घेतली असून या शाळेतील मुलामुलींनीही शिकून मोठे झाल्यावर इतर दुर्बल घटकांना मदतीचा हात देऊन समाज ऋणातून उतराई व्हावे असे आवाहन केले. सूत्रसंचालन सुशील मिस्त्री यांनी केले. कार्यक्रम संपन्न करण्यासाठी वैभव घरत, श्री सचिन साळुंखे ,श्री प्रकाश भोसले (मॅनेजर सारस्वत बँक), स्नेहा नानीवडेकर, डीएम मिश्रा, प्रकाश शेजवळ, विलास कुंभार, श्री तुकाराम वने मॅथ्यू डिसोजा आदींनी सांभाळली . भेटवस्तू मिळाल्याने लहान विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता .

Wednesday, 24 September 2025

नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून आदिवासी महिलांना साड्यांचे वाटप !!

नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून आदिवासी महिलांना साड्यांचे वाटप !!

उरण दि २४, (विठ्ठल ममताबादे) :
केळ्याचे माल अभिनव सेवा सहकारी संस्था मर्या.चिरनेर यांच्या वतीने सार्वजनिक नवरात्रौत्सवाचे आयोजन यावर्षी करण्यात करण्यात आले आहे. शारदा नवरात्रौत्सवाचे औचित्य साधून बुधवारी ( दि २४ ) अतिदुर्गम भागातील केळाचा माल या आदिवासी वाडीवरील महिलांना अनंत नारंगीकर यांच्या कुटुंबियांच्या वतीने सामाजिक जीवनाशी बांधिलकी जपत साड्यांचे वाटप करण्यात आले.

ग्रामदैवत - आदिशक्तीचा जागर सोहळा तथा शारदा नवरात्रौत्सव शहर तसेच ग्रामीण भागात मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जात आहे.यावर्षी शारदा नवरात्रौत्सव हा सोमवारी ( दि २२) आल्याने सालाबादप्रमाणे यंदाही नवरात्रौत्सव मंडळाने आप आपल्या शहरात, गाव परिसरात घटस्थापनेच्या मुहूर्तावर श्री दुर्गादेवी, महिषासुरमर्दिनीची मोठ्या भक्तिभावाने पुजा अर्चा करून प्राणप्रतिष्ठा केली आहे.यामुहूर्ताचे औचित्य साधून चिरनेर केळाचा माल या अतिदुर्गम भागातील आदिवासी महिलांना साड्यांचे वाटप करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून अनंत नारंगीकर, सौ वंदना अनंत नारंगीकर यांच्या कुटुंबियांनी हाती घेतले.

यावेळी केळ्याचे माल अभिनव सेवा सहकारी संस्थचे पदाधिकारी दत्ता कातकरी, अशोक कातकरी, सुरेश कातकरी, रोहित कातकरी, श्रीकांत कातकरी,राम कातकरी, राम कातकरी यांच्या उपस्थितीत कविता अशोक कातकरी ,वैशाली गुरुनाथ कातकरी, किर्ती रोहित कातकरी, बेबी रामा कातकरी, अमिषा अश्विन कातकरी, देवकी दत्ता कातकरी, लता दशरथ कातकरी, गुलाब सुरेश कातकरी, रुपाली अजय कातकरी सह इतर आदिवासी बांधव, महिलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. या समाजाभिमुख कार्यक्रमांचे औचित्य साधून आदिवासी महिलांनी वंदना अनंत नारंगीकर यांच्या कुटुंबीयांचे कौतुक केले आहे.

समर्थ जनरल कामगार संघटनेतर्फे पोलारीस कंपनीमध्ये कामगार करार संपन्न !!

समर्थ जनरल कामगार संघटनेतर्फे पोलारीस कंपनीमध्ये कामगार करार संपन्न !!

उरण दि २४, (विठ्ठल ममताबादे) : कामगारांना न्याय मिळावा, कामगारांचे हक्क व अधिकार अबाधित राहावेत, कोणत्याही कामगारांवर अन्याय होऊ नये या दृष्टीकोणातून राजकारणात गेली अनेक वर्षे कार्यरत असलेले कामगार नेते अतुल भगत यांनी सण २०२२ मध्ये समर्थ जनरल कामगार संघटनेची अधिकृतरित्या स्थापना केली. ही संघटना स्थापन केल्यापासून सदर कामगार संघटनेची यशस्वी घोडदौड सुरूच आहे. यातच अनेक ठिकाणी कामगारांच्या पगारात वाढ करण्यात त्यांना वेगवेगळे सेवा सुविधा देण्यात संघटना यशस्वी झाली आहे. उरण तालुक्यातील भेंडखळ येथे पोलारीस कंपनी कार्यरत असून या कंपनी मध्ये समर्थ कामगार जनरल संघटनेची युनिट कार्यरत असून अतुल भगत यांच्या नेतृत्वात पोलारीस कंपनी मधील हाऊसकिपींग व लेबरचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार वाढीचा करार नुकताच संपन्न झाला आहे. पगार वाढीचा निर्णय, करार हा कामगार क्षेत्रात ऐतिहासिक करार ठरला आहे. कामगारांच्या मागणी नुसार हाऊसकिपींग कर्मचाऱ्यांसाठी ३९०० रुपये तर लेबर कर्मचाऱ्यांसाठी ४७५० रुपयांची पगारात वाढ झाली आहे. हा पगार वाढ केंद्र शासनाच्या मिनिमम वेजेस नुसार जास्त आहे. त्यामुळे कामगार वर्गांना दिलासा देणारा हा निर्णय असल्यामुळे कामगारांनी समाधान व्यक्त केला आहे. हा करार जेएनपीटी परिसरातील जवळपास १०० हुन अधिक सीएफएस मधील झालेल्या करारपेक्षा जास्त आहे. या कराराचा फायदा भविष्यात उरण मध्ये येणाऱ्या विविध प्रकल्प, सीएफएस मधील कामगारांना मोठया प्रमाणात होणार आहे. असे मत करारा प्रसंगी अतुल भगत यांनी व्यक्त केले. 

हा करार करताना समर्थ जनरल कामगार संघटनेतर्फे संस्थापक अध्यक्ष अतुल भगत, सचिव अजय कृष्णा पाटील, उपाध्यक्ष नैनेश नारायण म्हात्रे तर पोलारीस प्रशासनातर्फे डायरेक्टर संतोषकुमार शेट्टी, डायरेक्टर जेकब थॉमस, पोलारीस लॉजिस्टिक पार्कचे सिईओ कॅप्टन कवीश आनंद, व्हॉइस प्रेसिडेंट एच आर ऍण्ड आय आर अभय वाईकर, एच आर ऍण्ड आय आर हेड हेमंत तेजे आदी अधिकारी वर्ग उपस्थित होते. या करारामुळे कामगार वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

शोएब मुख्तार इब्जी यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान !!

शोएब मुख्तार इब्जी यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान !!

उरण दि २४, (विठ्ठल ममताबादे) :
सिटीझन्स हायस्कूल उरणचे कार्यशील शिक्षक शोएब मुख्तार इब्जी यांना कोकण मतदार संघांचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या हस्ते माधवबाग प्रस्तुत जिल्हास्तरीय रायगड जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५ ने सन्मानित करण्यात आले. माधवबाग हॉस्पिटल कॅम्पस खोपोली, तालुका- खालापूर, जिल्हा- रायगड येथे सदर पुरस्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी ज्ञानेश्वर म्हात्रे - आमदार कोकण विभाग शिक्षक मतदार संघ, डॉ. राहुल जाधव - ऍडमिनिस्ट्रेटर माधवबा, डॉ. अनिरुद्ध भुसे, बबन पाटील, निर्भय सर आदी मान्यवर उपस्थित होते. उत्तम अध्यापन, उत्तम चारित्र्य संपन्न, विद्यार्थी प्रिय, जनता प्रिय व्यक्तीमत्व असल्याने सिटीझन्स हायस्कूल उरणचे कार्यशील शिक्षक शोएब मुख्तार इब्जी यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

नवरात्र उत्सव व प्रारंभ घट यांची पारंपरिक परंपरेनुसार म्हात्रे कुटुंबातील देव्हाऱ्यात स्थापना !!

नवरात्र उत्सव व प्रारंभ घट यांची पारंपरिक परंपरेनुसार म्हात्रे कुटुंबातील देव्हाऱ्यात स्थापना !!

उरण दि २४, (विठ्ठल ममताबादे) : उरण तालुक्यातील गोवठणे गावातील फेमस युट्युबर तथा गोवठणे गावातील सामाजिक कार्यकर्ते प्रेम म्हात्रे यांच्या कुटुंबातील देव्हाऱ्यात घट स्थापना करण्यात आली. प्रेम म्हात्रे हे ज्या म्हात्रे कुटुंबातील देव्हाऱ्यात सदस्य आहेत त्या देव्हाऱ्यात नवरात्रोत्सव व घट स्थापना मोठ्या उत्स्फूर्त वातावरणात स्थापन झाले.

सर्व मंगल मांगल्ये! शिवे सर्वार्थ साधिके !! शरण्ये त्रंबके गौरी नारायणे नमोस्तुते !! 

असे जयजयकार करत जल्लोषमय  वातावरणात घटस्थापना झाले. सर्व भारतात मोठ्या आनंदात आणि भक्तिमय वातावरणात घट स्थापना साजरा करण्यात आला. गोवठणे, ता- उरण येथे म्हात्रे कुटुंबियांतील कुलदैवत मंदिरामध्ये घट बसविणे, मंदिरातील देवदेवतांची, पूजा अर्चा, अभिषेक, शुद्धीकरण, नैवेद्य आणि सामूहिक आरतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात, भक्तिमध्ये, आणि आनंदाच्या वातावरणात पार पडले. म्हात्रे कुटुंबियांतील सर्व लहान थोर, जेष्ठ मंडळी, तरुण मित्र मंडळी, आणि माता भगिनी उपस्तित राहून घटस्थापनेच्या पूजा विधिला उपस्थित राहून कुलदैवत खंडोबा देवाचा कुलस्वामिनी तुळजा भवानी देवीचा आणि सर्वच देवदेवतांचा आशीर्वाद घेतला. नऊ दिवस चालणाऱ्या या नवरात्री उत्सवात सर्व म्हात्रे कुटुंबीय, नातेवाईक, भावबंध, आणि माता भगिनी मोठ्या उत्साहात मंदिरात उपस्थित राहून देव देवतेची सेवा करत असतात. दर दिवशी ( रात्री ) कुलदैवत मंदिरामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करत असतात. सर्व भक्तगण आपआपली सर्व कामे ऍडजेस्ट करून, आरती, जागरण, प्रसाद, व नैवेद्य आणून देवाला अर्पण करतात. मग ते नैवेद्य प्रसाद म्हणून ( आल्पोपहार / नाष्टा ) सर्वांना वाटप करतात. विशेष म्हणजे सर्वच खंडोबा भक्त, आणि दुर्गामातेच्या उपासक माता भगिनी वेगवेगळे आर्थिक, वस्तू रूपाने, किंवा इतर मदत करून, एकमेकांना सहकार्य करतात हे विशेष. एकंदरीत सर्व म्हात्रे कुटुंबियांच्या, भावाबंध मंडळी, बच्चे कंपनी, सर्व तरुण मित्र मंडळी, माताभगिनी, आणि सर्व भक्तगण यांच्या सहकार्याने नवरात्र उत्सव अतिशय आनंदात आणि भक्तिमय वातावरणात पार पडणार आहे.

संगीता गायकवाड यांची भाजपा उरण ग्रामीण मंडल चिटणीस पदी नियुक्ती !!

संगीता गायकवाड यांची भाजपा उरण ग्रामीण मंडल चिटणीस पदी नियुक्ती !!

उरण दि २४, (विठ्ठल ममताबादे) : उरण-द्रोणागिरी नोड येथे
भारतीय जनता पार्टीचे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोहळा मोठया उत्साहात पार पडला. तसेच नवीन पदाधिकाऱ्यांचा सन्मान सत्कार सोहळाही भव्य उत्साहात संपन्न झाला. कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि जनतेचा आशीर्वाद यामुळे हा सोहळा जनसेवेच्या नव्या पर्वाची सुरुवात ठरला. या वेळी भारतीय जनता पार्टी मोर्चाच्या तालुका उपाध्यक्ष संगीता रवींद्र गायकवाड यांची भाजपा उरण ग्रामीण मंडल चिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली. 

या वेळी आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, सदस्य भाजपा महाराष्ट्र राज्य परिषद रवी भोईर, युवा नेते प्रतिम म्हात्रे, उरण शहर ग्रामीण मंडल अध्यक्ष प्रसाद भोईर, उरण ग्रामीण मंडल अध्यक्ष धनेश गावंड, महिला मोर्चा अध्यक्ष राणी म्हात्रे, महालण विभाग अध्यक्ष महेश कडू, द्रोणागिरी नोड भाजपा अध्यक्ष शेखर पाटील यांच्यासह माजी नगरसेवक व नगरसेविका, माजी जिल्हा परिषद सदस्य, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच,सदस्य सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीचे विचार व कार्य तळागाळात पोहोचावे, पक्षाच्या माध्यमातून जनतेला जास्तीत जास्त न्याय देता यावा या अनुषंगाने तसेच संगीता रवींद्र गायकवाड या भारतीय जनता पार्टीच्या कट्टर एकनिष्ठ व प्रामाणिक कार्यकर्त्या असल्याने त्यांची निवड भाजपा उरण ग्रामीण मंडल चिटणीस पदी करण्यात आली आहे. संगीता गायकवाड यांची निवड उरण ग्रामीण मंडल चिटणीस पदी झाल्याने त्यांच्या या निवडीचे सर्वत्र स्वागत करण्यात येत असून त्यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.सर्वांचे आभार मानत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

भाजपा उरण ग्रामीण मंडल चिटणीस पदी माझी नियुक्ती करण्यात आली आहे त्याबद्दल मी पक्षाच्या सर्वच पदाधिकारी कार्यकर्त्यांचे आभार मानते. पक्ष संघटना अधिकाधिक मजबूत करण्याकरिता माझ्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आगामी काळात मी सर्वांना सोबत घेवून पक्ष संघटन अधिक मजबूत करून विविध निवडणूकांमध्ये पक्षाला मोठे यश मिळवून देईन त्यासाठी मी नेहमी सक्रिय राहीन.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डाजी, मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस, भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आ. प्रशांत ठाकूर, आ.महेश बालदी तसेच उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष  अविनाश कोळी, महिला मोर्चा अध्यक्ष राणी म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली मी भाजपाचे ध्येय, धोरणे व कार्यक्रमांची यशस्वीरित्या अंमलबजावणी करेन, पक्षाचे ध्येय धोरणे तळागाळात पोहोचवेन असे मत या प्रसंगी नवनियुक्त भाजपा उरण ग्रामीण मंडल चिटणीस संगीता गायकवाड यांनी व्यक्त केले आहे.

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...