Friday, 6 February 2026

उरण पोलीस ठाणे ने घेतला रूट मार्च !!

उरण पोलीस ठाणे ने घेतला रूट मार्च !!

** नागरिकांनी शांततेने मतदान करावे,  पोलीस प्रशासनातर्फे आवाहन

उरण दि ५, (विठ्ठल ममताबादे) : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने उरण पोलीस ठाणे ने जासई, चिरनेर, कोप्रोली व चांणजे गावात रूट मार्च घेतला. या रूट मार्चचा उद्देश शांतता राखणे आणि मतदारांना निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन करणे हा होता.

रूट मार्च जासई पोलीस चौकी येथून सुरू होऊन, जासई, चिरनेर, कोप्रोली व चांणजे गावातून फिरून उरण एस.टी.स्टँड चारफाटा येथे समाप्त झाला. या रूट मार्चमध्ये उरण पोलीस ठाणे कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनीफ मुलाणी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राहूल काटवाणी, ०७ सपोनि/ पोउपनिरी, १५ पोलीस अंमलदार, तसेच RCP चे ०१ अधिकारी व १९ अंमलदार व QRT चे १० अंमलदार यांनी सहभाग घेतला होता.

तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे मतदान ७ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार आहे, तर मतमोजणी ९ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार आहे.तर उरण पोलीस ठाणे ने मतदारांना निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन केले आहे. पोलीस ठाणे ने शांतता राखण्याचे आणि निवडणुकीच्या प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

No comments:

Post a Comment

शिवसेना प्रणित जय महाराष्ट्र माथाडी आणि जनरल कामगार सेनेच्या मावळ लोकसभा क्षेत्राच्या उपाध्यक्ष पदी जगदीश ठाकूर !!

शिवसेना प्रणित जय महाराष्ट्र माथाडी आणि जनरल कामगार सेनेच्या मावळ लोकसभा क्षेत्राच्या उपाध्यक्ष पदी जगदीश ठाकूर !! उरण दि २१, (व...