साहित्य संघ मंदिर गिरगांव येथे शिवसेना आणि स्थानीय लोकाधिकार महासंघाच्यावतीने मराठी भाषा गौरव दिन साजरा !!
मुंबई (समीर खाडिलकर /शांताराम गुडेकर) :
ज्ञानपीठ विजेते कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी साजरा करण्यात येणाऱ्या मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने गिरगाव येथील साहित्य संघ मंदिरात शिवसेना आणि स्थानीय लोकाधिकार महासंघाच्या वतीने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या सोहळ्यात सुप्रसिद्ध श्री.निवास संगीतकार श्री.निवास खळे यांच्या गीतांवर आधारित संगीत रजनी हा कार्यक्रम सादर करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवर उद्योग व मराठी भाषा मंत्री श्री उदय सामंत,ज्येष्ठ नेते श्री. गजानन कीर्तीकर, माजी खासदार श्री. राहुल शेवाळे ,शिवसेना नेत्या सौ. मीनाताई कांबळी, मा.आ. सचिव/प्रवक्ते श्री. किरण पावसकर, प्रवक्त्या सौ.शीतल म्हात्रे, मुंबई महानगरपालिकेचे उपमहापौर श्री.संजय घाडी, बेस्ट समितीच्या अध्यक्षा सौ.तृष्णा विश्वासराव, सुधार समिती अध्यक्षा सौ.संध्या दोषी, 99 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पानिपतकार श्री.विश्वास पाटील यांसह नगरसेवक, पदाधिकारी, शिवसैनिक आणि मोठ्या संख्येने रसिक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment