Friday, 20 February 2026

दुर्ग मावळा प्रतिष्ठान उरण विभागातर्फे भव्य शिवजन्मोत्सव साजरा !

दुर्ग मावळा प्रतिष्ठान उरण विभागातर्फे भव्य शिवजन्मोत्सव साजरा !

उरण दि २०, (विठ्ठल ममताबादे) :
“हा एकच असा राजा होऊन गेला की त्याची शिवजयंती तिथीप्रमाणे आणि तारखेप्रमाणे साजरी होते,” या भावनेतून १९ फेब्रुवारी २०२६ रोजी दुर्ग मावळा प्रतिष्ठान उरण विभागातर्फे द्रोणागिरी किल्ला येथे शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

दोन ते तीन महिने आधीपासून गड स्वच्छता व संवर्धनाची तयारी करण्यात आली. १८ फेब्रुवारी रोजी गडाची सजावट करून विमला तलाव येथे शिवप्रतिमेचा अभिषेक, मशाल फेरी व सहभोजन पार पडले.१९ फेब्रुवारी रोजी बालशिवरायांच्या अंगाई गीताने कार्यक्रमास प्रारंभ झाला. उरण बाजारपेठेतून पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. टिमकी वाद्य आणि बालशिवरायांच्या वेशातील मावळा हे विशेष आकर्षण ठरले. गडावर पारंपरिक पूजन व भंडाऱ्याने जल्लोष करण्यात आला.शिवगर्जना शाहीर पथकाचे युवाशाहीर अभिषेक पाटील व सहकाऱ्यांच्या जोशपूर्ण पोवाड्यांनी वातावरण भारावून गेले. “राजांचे विचार जपायचे असतील तर गड-कोट टिकवले पाहिजेत,” हा संदेश त्यांनी दिला.शेकडो शिवप्रेमी उपस्थित होते. लहान मावळ्यांना शिववस्त्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. अध्यक्ष शेखर भोमकर व उपाध्यक्ष विवेक केणी यांच्या मार्गदर्शनाखाली सोहळा यशस्वी पार पडला. कार्यक्रमाचे निवेदन राजेंद्र ठाकूर यांनी केले.गडाची स्वच्छता करून जल्लोषात कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. हा उपक्रम गडसंवर्धन व राष्ट्रप्रेमाचा प्रेरणादायी संदेश देणारा ठरला.

No comments:

Post a Comment

राष्ट्रीय सेवा योजना आयोजित "ग्रामीण विकास व संस्कार शिबीर" !!

राष्ट्रीय सेवा योजना आयोजित *"ग्रामीण विकास व संस्कार शिबीर"*   *(१०/२/२०२६ ते‌ १६/२/२०२६)* सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशा...