Friday, 20 February 2026

पुनाडे गावात शिवजयंती उत्साहात साजरी !

पुनाडे गावात शिवजयंती उत्साहात साजरी !

उरण दि २०, (विठ्ठल ममताबादे) :
गुरुवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज संघटना पुनाडे आणि देवेंद्र पाटील आणि परिवार ह्यांच्या संयुक्त विद्यमाने पुनाडे गावात शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 

त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार मनोहरशेठ भोईर, खोपटे गावातील उद्योगपती देवेंद्रशेठ पाटील. ए.डी.पाटील , द्रोणागिरी भुषण पुरस्कार प्राप्त चित्रकार रुपेश पाटील,ना.क.पाटील गुरुजी, शिंदे गटाचे तालुका संघटक रमेश म्हात्रे , ना.शं.पाटील गुरुजी, संदेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य रसिक पाटील, कृष्णा डाकी,  डोळ्यांच्या डॉक्टर दिक्षा डाकी, सद्गुरू अज्ञा बचत गटाच्या अध्यक्षा प्रिती देवेंद्र पाटील, जनाबाई पाटील, काशिबाई खारपाटील चिरनेर,लिलाबाई पाटील, प्रदिप पाटील व मिना पाटील रांजण पाडा, यश पाटील चरण पाटील रावे, अमित पाटील आवरे, प्रणाली डाकी, स्वाती पाटील,एड.रुषाली पाटील, स्नेहल पाटील, डॉक्टर जयेश पाटील, संदेश पाटील, अमित ठाकूर, ग्रामसुधारणा ग्रामस्थ मंडळ सावरखार अध्यक्ष गणेश घरत, आणि मोठ्या प्रमाणात पुनाडे ग्रामस्थ आणि शिवप्रेमी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल मान्यवरांनी भाषणातून माहिती दिली ह्या मध्ये चिमुकल्यांनी शिवाजी महाराजांच्या चारित्र्यावर भाषणे केली. चिन्मय पाटील रावे, चिराग पाटील रावे,वेदा पाटील पुनाडे, आणि शिवाजी महाराजांच्या बाळ भुमीकेत वेद पाटील ह्याने महत्वाची भूमिका बजावली.ह्या कार्यक्रमाचे आयोजक आणि पुनाडे गावचे सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र आत्माराम पाटील ह्यांनी ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  केले. देवेंद्र पाटील हे सामाजिक कार्यकर्ते असुन ते गोरगरीब जनतेला नेहमीच मदत करत असतात त्यांनी पुनाडे गावात अनेक कार्यक्रम राबविले आहेत .तसेच ह्या कार्यक्रमातील पाहुण्यांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत देवेंद्र पाटील यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.अशारीतीने पुनाडे गावात शिवजयंती उत्सव देवेंद्र पाटील आणि परिवार तसेच छत्रपती शिवाजी महाराज संघटना ह्यांच्या वतीने खेळीमेळीच्या वातावरणात, मोठया उत्साहात संपन्न झाले.

No comments:

Post a Comment

राष्ट्रीय सेवा योजना आयोजित "ग्रामीण विकास व संस्कार शिबीर" !!

राष्ट्रीय सेवा योजना आयोजित *"ग्रामीण विकास व संस्कार शिबीर"*   *(१०/२/२०२६ ते‌ १६/२/२०२६)* सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशा...