Friday, 20 February 2026

श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना गरम चादरीचे वाटप !

श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेतर्फे गरजूंना गरम चादरीचे वाटप !

** शिवजयंती निमित्त संस्थेचा स्तुत्य उपक्रम.

उरण दि २०, (विठ्ठल ममताबादे) : श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांचे कार्य व विचारांचा प्रचार व प्रसार करणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेतर्फे शिवजयंतीचे औचित्य साधून उरण तालुक्यातील करळ फाटा येथील झोपडपट्टीतील गोरगरीब गरजूंना, नागरिकांना गरम चादरीचे ( ब्लॅंकेटचे ) वाटप करण्यात आले.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांचे जवळचे सहकारी कट्टर समर्थक तथा सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र भगत (चिरनेर) यांची उपस्थिती लाभली. राजेंद्र भगत यांच्या शुभहस्ते गोरगरिबांना गरम चादरीचे (ब्लॅंकेटचे) वाटप करण्यात आले. 

यावेळी श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे सुदेश पाटील, विठ्ठल ममताबादे, कुमार ठाकूर, प्रेम म्हात्रे, माधव म्हात्रे, अन्वी पाटील,हेमंत ठाकूर,कृष्णा कोळी,सादिक शेख,साहिल म्हात्रे,परशुराम म्हात्रे,घनश्याम पाटील, सचिन म्हात्रे, अभय पाटील, प्रकाश म्हात्रे, नारायण कोळी आदी पदाधिकारी सदस्य, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. प्रस्तावनेत संस्थेचे कार्याध्यक्ष विठ्ठल ममताबादे यांनी संस्थेचा थोडक्यात परिचय व संस्थेने केलेली कार्य याची माहिती दिली. ज्या नागरिकांना स्वतःच्या हक्काचे घर नाही, उन्हाळा हिवाळा पावसाळा या तिन्ही ऋतूमध्ये जे हलाकीचे जीवन जगत आहेत, ज्यांना कोणत्याही सुख सुविधा नाहीत अशा गोरगरीब जनतेला गरम चादरीचे (ब्लॅंकेटचे) वाटप करण्यात आल्याने गरजू. नागरिकांनी समाधान व्यक्त करून आयोजकांचे आभार मानले. आभार मानताना संस्थेचे अध्यक्ष सुदेश पाटील यांनी संस्थेच्या सर्व पदाधिकारी सदस्यांचे आभार मानले.कामगार नेते महेंद्र शेठ घरत यांचा समाजसेवेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सामाजिक कार्यात नेहमी सक्रिय असलेले सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र भगत यांचा यावेळी यथोचित मान सन्मान करण्यात आला. सदर उपक्रमासाठी राजेंद्र भगत यांचे विशेष सहकार्य लाभल्याने  त्यांचेही यावेळी आभार मानण्यात आले. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय,जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

No comments:

Post a Comment

राष्ट्रीय सेवा योजना आयोजित "ग्रामीण विकास व संस्कार शिबीर" !!

राष्ट्रीय सेवा योजना आयोजित *"ग्रामीण विकास व संस्कार शिबीर"*   *(१०/२/२०२६ ते‌ १६/२/२०२६)* सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशा...