Friday, 20 February 2026

पालघरच्या संघ व्यवस्थापकांची रांचीतील राष्ट्रीय निवड चाचणीत उल्लेखनीय कामगिरी !!

पालघरच्या संघ व्यवस्थापकांची रांचीतील राष्ट्रीय निवड चाचणीत उल्लेखनीय कामगिरी !!

विरार प्रतिनिधी/ पंकज चव्हाण

भारत सरकारच्या खेळ आणि क्रीडा विभाग यांच्या वतीने आयोजित पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल गेम्स अंतर्गत वैयक्तिक मैदानी स्पर्धांसाठी राष्ट्रीय स्तरावरील निवड चाचणी दिनांक १४ व १५ फेब्रुवारी २०२६ रोजी रांची येथे उत्साहात पार पडली.

या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघ व्यवस्थापक म्हणून पालघर जिल्ह्यातील श्री. आशिष नरोत्तम पाटील (डॉन बॉस्को शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, बोईसर) तसेच प्रा. योगेश किशोर चौधरी (कै. पांडुरंग रघुनाथ पाटील उत्कर्ष माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय, विरार) यांची निवड करण्यात आली होती.

दोन्ही संघ व्यवस्थापकांनी आपली जबाबदारी अत्यंत सक्षमपणे व यशस्वीरित्या पार पाडली. त्यांच्या उत्कृष्ट नियोजन, समन्वय आणि नेतृत्वामुळे महाराष्ट्राच्या खेळाडूंना योग्य मार्गदर्शन लाभले.

त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल चंद्रशेखर साखरे (सहाय्यक संचालक, क्रीडा आणि युवा सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे) तसेच पालघर जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. सुहास व्हनमाने यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
पालघर जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब असून, त्यांच्या या यशामुळे जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राला नवी प्रेरणा मिळाली आहे.

No comments:

Post a Comment

राष्ट्रीय सेवा योजना आयोजित "ग्रामीण विकास व संस्कार शिबीर" !!

राष्ट्रीय सेवा योजना आयोजित *"ग्रामीण विकास व संस्कार शिबीर"*   *(१०/२/२०२६ ते‌ १६/२/२०२६)* सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशा...