एक निरागस काव्य ....
---------------------------
सायली माझी लाडाची
आईच्या प्रेमाची
पप्पांच्या चेहे~याची
निरागस मनाची
सायली माझी लाडाची
बोलक्या डोळ्यांची
गुलाबी ओठांची
लांबसडक केसांची
सायली माझी लाडाची
शांत स्वाभावाची
गोड हृदयाची
स्वाभिमानी बाण्याची
सायली माझी लाडाची
आवड स्वयंपाकाची
निरनिराळ्या पदार्थांची
घरच्यांच्या मायेची
सायली माझी लाडाची
सौ. शिल्पा चंद्रकांत निमकर
घाटकोपर मुबंई.
No comments:
Post a Comment