Monday, 19 October 2026

बाजीप्रभू चौकातील निवासी बस थांब्यावर वाढीव शेडची मागणी; नागरिकांकडून केडीएमटीचे आभार !

बाजीप्रभू चौकातील निवासी बस थांब्यावर वाढीव शेडची मागणी; नागरिकांकडून केडीएमटीचे आभार !

*डोंबिवली, राजू नलावडे :* डोंबिवलीतील बाजीप्रभू चौकातील निवासी बस थांब्याजवळ अनधिकृत टपऱ्या आणि फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले होते. याबाबत केडीएमसी अतिक्रमण विभागाला पत्र देऊन कारवाई करण्यास भाग पाडण्यात आले. या कारवाईबद्दल स्थानिक नागरिकांनी केडीएमटीचे आभार मानले आहेत.

या बस थांब्यावर दिवसभर प्रवाशांची मोठी गर्दी आणि लांबच लांब रांग असते. सध्याच्या शेडची जागा अपुरी असल्याने प्रवाशांची रांग नेहमी शेडबाहेर, थेट रस्त्यावर येते. त्यामुळे नागरिकांना भर उन्हात आणि पावसात रस्त्यावर उभे राहावे लागते. तसेच तेथे वाहतुकीची मोठी वर्दळ असल्याने अपघाताचा धोकाही निर्माण झाला आहे.

आता महापालिकेने अनधिकृत टपऱ्यांवर कारवाई केल्याने परिसर मोकळा झाला आहे. या मोकळ्या झालेल्या जागेवर प्रवाशांसाठी रांग लावण्याकरिता अतिरिक्त शेड उभारून बस थांबा पुढे वाढवावा, अशी मागणी नागरिक करत आहेत. असे केल्यास प्रवाशांना दिलासा मिळेल आणि पुन्हा अनधिकृत टपऱ्या उभ्या राहण्यास आळा बसेल, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

No comments:

Post a Comment

बाजीप्रभू चौकातील निवासी बस थांब्यावर वाढीव शेडची मागणी; नागरिकांकडून केडीएमटीचे आभार !

बाजीप्रभू चौकातील निवासी बस थांब्यावर वाढीव शेडची मागणी; नागरिकांकडून केडीएमटीचे आभार ! *डोंबिवली, राजू नलावडे :* डोंबिवलीतील बा...