Monday, 19 October 2026

सोनारपाडा साईबाबा मंदिराजवळ सतत पुन्हा पुन्हा दुरुस्ती करूनही पाण्याची गळती !!

सोनारपाडा साईबाबा मंदिराजवळ सतत पुन्हा पुन्हा दुरुस्ती करूनही पाण्याची गळती !!

डोंबिवली, राजू नलावडे:
             डोंबिवली एमआयडीसी, कल्याण शीळ रस्त्यावरील सोनारपाडा साईबाबा मंदिर जवळ एमआयडीसीच्या पाइपलाइन व्हॉल्व वर सतत पाण्याची गळती होण्याचे प्रकार होत आहेत. काल रविवारी सुटीच्या दिवशी या पाइपलाइन व्हॉल्व मधून पाण्याचे फवारे उंच उडत होते. याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केल्यावर एमआयडीसीने येऊन दुरुस्ती करून पाणी गळती थांबवली होती. परंतु आज सोमवार सकाळपासून पुन्हा यावर पाण्याची गळती सुरू झाल्याने पुन्हा आम्ही एमआयडीसीला कळविले असता त्यांच्या कर्मचाऱ्यांनी येऊन पाण्याची ही गळती थांबवली. ही सतत गळती कशामुळे होत आहे. तांत्रिक कारणामुळे की कोणी या पाइपलाइन व्हॉल्ववर छेडछेड करीत तर नाही ना, हे एमआयडीसीने स्पष्ट करून तशी कार्यवाही करावी.

         गेले अनेक महिने अशाच प्रकारच्या पाण्याच्या गळत्या अनेक ठिकाणी चालू आहेत. गेल्या शुक्रवारी एमआयडीसीने शट डाऊन घेऊन २४ तासाकरिता पाणी पुरवठा बंद असताना एमआयडीसी मधील सर्व पाण्याच्या गळत्या या दुरूस्ती करून घेतल्या असल्याचे एमआयडीसी तर्फे सांगण्यात आले होते. परंतु हा दावा सोनारपाडा, साईबाबा मंदिराजवळील कालच्या व आजच्या गळतीमुळे खोटा ठरला असल्याचे दिसत आहे. 

            सद्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असताना अशा गळत्या आपल्याला परवडणार नाही. एमआयडीसी या गळतीकडे गांभीर्याने घेत नसल्याचे दिसत आहे. लोकांनी तक्रार केल्यावरच ते तात्पुरती दुरुस्ती करीत असल्याचे दिसत आहे. यापुढे अशा गळत्या पुन्हा झाल्या तर जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांतर्फे करण्यात येत आहे. 

No comments:

Post a Comment

बाजीप्रभू चौकातील निवासी बस थांब्यावर वाढीव शेडची मागणी; नागरिकांकडून केडीएमटीचे आभार !

बाजीप्रभू चौकातील निवासी बस थांब्यावर वाढीव शेडची मागणी; नागरिकांकडून केडीएमटीचे आभार ! *डोंबिवली, राजू नलावडे :* डोंबिवलीतील बा...