शिस्तीने आणि स्वकर्तृत्वाने वेगळी ओळख निर्माण केलेले मुख्याध्यापक श्री विलासराव कोळेकर !!
रत्नागिरी, प्रतिनिधी :
रत्नागिरी जिल्ह्यात शैक्षणिक क्षेत्रात स्वत:ची ओळख शिस्त आणि स्वकर्तृत्वाने वेगळी ओळख निर्माण केलेले मुख्याध्यापक म्हणजेच श्री विलासराव कोळेकर होय. असे उद्गार पद्मश्री दादा इदाते यांनी काढले. दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडे येथील मुख्याध्यापक श्री विलासराव कोळेकर यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित केलेल्या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. श्री इदाते पुढे म्हणाले शैक्षणिक क्षेत्रातील अनेक आव्हाने असतानाही अत्यंत कल्पकतेने व सकारात्मक वृत्तीने सातत्याने काम करुन शाळा व संस्थेचे नाव त्यांनी उज्वल केले आहे. शैक्षणिक क्षेत्राबरोबरच पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील त्यांचा सहजतेने वावर होता. एक कुशल संघटक व उपक्रमशिल मुख्याध्यापक म्हणून श्री विलासराव कोळेकर यांनी कौतुकास्पद काम केले आहे असेही ते म्हणाले. यावेळी माजी मंत्री महादेव जानकर, माजी आमदार भगवान साळुंखे, शिक्षणाधिकारी (योजना) किरण लोहार, जयगड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पाटील, रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे अध्यक्ष सागर पाटील, जि. प. सदस्या सौ. उषा सावंत,अरुण मोर्ये,सोसायटीचे अध्यक्ष रहीम माद्रे, बाबासाहेब राशिनकर आदी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले. व शाळेच्या चौफेर प्रगतीबद्दल कौतुक केले. श्री विलासराव कोळेकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडेचे मुख्याध्यापक श्री. विलासराव कोळेकर सर यांचा सेवानिवृत्ती सोहळा अत्यंत उत्साहात आणि तितक्याच भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. त्यांच्या प्रदीर्घ आणि देदीप्यमान सेवेचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या समारंभाने संपूर्ण सैतवडे परिसराचे लक्ष वेधून घेतले.
मुस्लिम एज्युकेशन सोसायटी, सैतवडे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री नामदार महादेव जानकर यांची विशेष उपस्थिती लाभली होती. कोळेकर सरांनी आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात केवळ शाळाच चालवली नाही, तर ती एका वटवृक्षाप्रमाणे विस्तारली. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे दि मॉडेल इंग्लिश स्कूलने शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात एक वेगळा ठसा उमटवला आहे. कोळेकर सरांनी आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात केवळ शाळाच चालवली नाही, तर ती एका वटवृक्षाप्रमाणे विस्तारली. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे दि मॉडेल इंग्लिश स्कूलने शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात एक वेगळा ठसा उमटवला आहे. यावेळी मुस्लिम एज्युकेशनचे अध्यक्ष रहीम माद्रे, अक्रम कापडे, रज्जाक फकीर, अजिज वागळे, हशमत निवेकर, गनी खतीब, रूमान पारेख, तौफिक चिकटे, अजिज माद्रे, मुख्याध्यापक सर्वश्री व्ही. वाय कुंभार, प्रकाश वंजोळे, श्रीमती सिद्धी लांजेकर, इमरान अंतुले, अरुण जाधव, श्रीशैल्य पुजारी, आशिष वासावे, सुनिल पाटील यांचेबरोबरच, पत्रकार सर्वश्री बाबासाहेब राशिनकर, सुनिल पवार, वैभव पवार, संजय कदम, राजेश जोष्टे, अनिकेत पवार, दिपक पोतदार उपस्थित होते.तसेच तंटामुक्तीचे सैतवडेचे अध्यक्ष दिलावर खान,जांभारीचे सरपंच आदेश पावरी, हर्षल पेढे, संजय शितप, राजेश जाधव, डॉ. जाधव, माजी सरपंच गणेश झगडे, आंबा उद्योजक उमेश रहाटे, कवीवर्य अरुण मोर्ये, संभाजी जाधव, नितीन जाधव, चव्हाण सर, केंद्र प्रमुख अरविंद महाकाळ, शिक्षण विस्तार अधिकारी तोटावार मॅडम,आदी मान्यवर व ग्रामस्थ, माजी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रभावी सुत्रसंचालन विनोद पेढे यांनी केले.सर्वांचे अविनाश केदारी यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment