Saturday, 2 May 2026

संगीता ढेरें राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मानित !!

संगीता ढेरें राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मानित !!

** सर्वच स्तरातून शुभेच्छा व कौतुकांचा वर्षाव.

उरण दि २, (विठ्ठल ममताबादे) : महाराष्ट्र दिनाचे तसेच कामगार दिनाचे औचित्य साधून रायगड जिल्ह्यातील उरण येथील जेष्ठ समाजसेविका संगीता सचिन ढेरे यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेत राज्य शासनाच्या प्रतिष्ठित पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अलिबाग येथे आयोजित करण्यात आलेल्या या गौरव सोहळ्यात त्यांना सन्मानचिन्ह व मानपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.

या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे, रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, जिल्हाधिकारी किशन जावळे तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना ढेरे यांच्या कार्याचा विशेष उल्लेख करण्यात आला. संगीता ढेरे यांनी उरण परिसरात महिला सक्षमीकरण, बालकल्याण, शिक्षण आणि समाजजागृती या क्षेत्रांत सातत्याने काम केले आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक महिलांना स्वावलंबनाचा मार्ग सापडला असून सामाजिक परिवर्तनासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.महिला बचत गटांना एकत्रित करून त्यांच्यात समन्वय घडून आणून विविध उत्पादने वस्तू निर्मितीला त्यांनी प्रोत्साहन दिले आहे. वेगवेगळे मेळावे, स्टॉल लावून तसेच महिलांच्या सर्वांगीण प्रगती साठी विविध कार्यक्रम त्यांनी राबविले आहे.त्यांच्या या कार्याची दखल घेत राज्य शासनाने त्यांना या मानाच्या पुरस्काराने सन्मानित केले.संगीता ढेरे यांना मिळालेला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार हा त्यांच्या कार्याची पावती असून समाजसेवेचा आदर्श ठरतो.उरण मधील जेष्ठ महिला सामाजिक कार्यकर्त्या संगीता ढेरे यांना राज्य शासनाचा प्रतिष्ठित पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार मिळाल्याने त्यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

No comments:

Post a Comment

“कर्तृत्व, जिद्द आणि सेवाभावी कार्याचा प्रेरणादायी प्रवास” जुचंद्र येथे श्री. सुरेश तुकाराम राऊत सर यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात व भावनिक वातावरणात संपन्न !!

“कर्तृत्व, जिद्द आणि सेवाभावी कार्याचा प्रेरणादायी प्रवास” जुचंद्र येथे श्री. सुरेश तुकाराम राऊत सर यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ मोठ्या उत...