नवघर येथील एपीएम टर्मिनल कंपनीतील देव इंटरप्रायजेसच्या कामगारांना २०,००० रुपयांची भरघोस पगार वाढ !!
कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण ; ८ वर्षासाठी झाला करार
उरण दि २६, (विठ्ठल ममताबादे ) : नवघर येथील एपीएम टर्मिनल कंपनीतील देव इंटरप्रायजेसच्या कामगारांना २०,००० रुपयांची भरघोस पगार वाढ झाली आहे.देव इंटरप्राईजेचे मालक शेखर तांडेल यांच्यासोबत आठ वर्षाचा करार झाला आहे. उरण तालुक्यातील नवघर येथील एपीएम टर्मिनल कंपनी मधील देव इंटरप्रायजेसच्या कामगारांना २०,००० चे भरघोस पगारवाढ झाले आहे. महाराष्ट्र जनरल कामगार युनियन तर्फे झालेल्या पगारवाढमुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे
महाराष्ट्र जनरल कामगार युनियनचे अध्यक्ष भूषण सामंत,जनरल सेक्रेटरी वर्गीस चाको,द्रोणागिरी न्हावा शेवा उपाध्यक्ष रोशन ठाकूर,सेक्रेटरी धर्मेंद्र तांडेल,कमिटी मेंबर जयप्रकाश पाटील,निलेश भोईर,वैभव चोगले,ज्ञानेश्वर भोईर,देव एंटरप्राइजेसचे मालक शेखर तांडेल,एपीएम टर्मिनलचे मॅनेजर योगेश ठाकूर आदी पदाधिकारी मान्यवरांच्या उपस्थितीत हा करार संपन्न झाला.या करारामुळे कामगार वर्गाने समाधान व्यक्त करत कमिटी मेंबर जयप्रकाश पाटील व वैभव चोगले आणि सर्व कामगारांनी युनियनचे आभार मानले आहेत.
खालील प्रमाणे पगार वाढ करण्यात येणार आहे.
८ वर्षासाठी २०,०००/-
१ ला वर्ष ५०००/-
२ रा वर्ष २५००/-
३ रा वर्ष २५००/-
४ था वर्ष २०००/-
५ व वर्ष २०००/-
६ वा वर्ष २०००/-
७ वा वर्ष २०००/-
८ वा वर्ष २०००/-
No comments:
Post a Comment