राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेशाध्यक्षा पदी शमीमदीदी शहा यांची निवड !!
मुंबई, (सचिन ननगरे) : संपूर्ण महाराष्ट्रात रिपब्लिकन चळवळ गतिमान करण्यासाठी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या नेतृत्वाखाली जोमाने वाटचाल करीत आहे. मुंबई प्रदेशात सक्रीय असणाऱ्या महिला आघाडीच्या नेत्या 'शमीमदीदी शहा' यांची महिला आघाडी मुंबई प्रदेशाध्यक्ष पदी निवड राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी बांद्रा मुंबई येथे जाहीर केली.
संपूर्ण मुंबईत शमीमदीदी यांचा दांडगा जनसंपर्क असून, लवकरच मोठ्या प्रमाणात महिलांचा राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षात भव्य प्रवेश सोहळा मुंबईत होणार असून त्या अनुषंगाने त्या जोमाने कामाला लागल्या आहेत. शाखा उदघाटन, विभाग निहाय बैठका,सभांच्या माध्यमातून राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष मजबुती साठी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष महिला आघाडी जोमाने काम करेल असे आश्वासन निवडी प्रसंगी शमीम दीदी शहा यांनी दिले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश जनसंपर्क प्रमुख सचिनभाऊ नांगरे, मुंबई अध्यक्ष नाका सेल सागर भाई पिल्ले, मुंबई रिक्षा युनियन अध्यक्ष मेहमूद भाई शेख, युवा नेतृत्व बिपीन कटारे, प्रशांत कटारे, अभिनव निकम, मुंबई नेते विश्वास कांबळे, शिवाजी पिंपळे, दस्तगीर मिर्जा, महिला आघाडी शमीम शहा, निर्मला चिमणापुरे, नूरजहाँ खान, रिंका देवी जैस्वाल, सलमा कुरेशी, रिजवान खान, रसूल खान, रईशा शेख, सूफिया शेख,मदिना शेख, गुडिया खान, सना अन्सारी, कविता राठोड,नजमा शेख, आदी महिला पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
लवकरच राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष मुंबई प्रदेश मेळावा घेणार असल्याचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment