Thursday, 18 June 2026

मनसे तर्फे विद्यार्थ्यांना छत्री व खाऊ वाटप !

मनसे तर्फे विद्यार्थ्यांना छत्री व खाऊ वाटप !

उरण दि १६, (विठ्ठल ममताबादे) : कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचे प्रेरणास्थान व मार्गदर्शक तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्ताने आज बेलपाडा गावातील रायगड जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गव्हाण विभाग सचिव ( समाजसेवक ) प्रदीप महादेव  ठाकुर यांच्या पुढाकाराने बेलपाडा गावातील विद्यार्थ्यांसाठी छत्री व खाऊ वाटत करण्यात आले. 

त्या वेळी पनवेल  तालुका  सचिव  निर्दोष  केशव  गोंधळी, उलवे शहर माजी अध्यक्ष  राहुल  बाबुराव  पाटील,उलवे  शहर  अध्यक्ष   आकाश  श्रीकांत  देशमुख, गव्हाण विभाग उपाध्यक्ष  बाळकृष्ण ( बबलु) जगन्नाथ पाटील,  संदिप  म्हात्रे, अजित  ठाकूर,  गजानन  म्हात्रे आदि  विभागातील बरेच  पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित  होते.छत्री व खाऊ वाटप केल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. सदर उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे

No comments:

Post a Comment

धुतुममध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात; रात्रभर नामस्मरण, भजनाने रंगला जागर, अनेक वर्षाची परंपरा !!

धुतुममध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात; रात्रभर नामस्मरण, भजनाने रंगला जागर, अनेक वर्षाची परंपरा !! उरण दि ४, (विठ्ठल ममताबाद...