Tuesday, 23 June 2026

३० जूनपर्यंत वार्षिक विवरणपत्र दाखल करा; अन्यथा १० हजारांचा दंड !!

३० जूनपर्यंत वार्षिक विवरणपत्र दाखल करा; अन्यथा १० हजारांचा दंड !!

*मुंबई, दि. 23 जून 2026*

प्रेस आणि नियतकालिक नोंदणी अधिनियम 2023 अंतर्गत नोंदणीकृत सर्व नियतकालिकांच्या प्रकाशकांनी आर्थिक वर्ष 2024-25 चे लेखापरीक्षित वार्षिक विवरणपत्र Annual Statement 30 जून 2026 पर्यंत प्रेस सेवा पोर्टल PSP वर ऑनलाइन सादर करावे, असे आवाहन भारत सरकारच्या प्रेस रजिस्टर जनरल, नवी दिल्ली यांनी केले आहे.

*बंधनकारक सूचना*  
प्रेस आणि नियतकालिक नोंदणी अधिनियम 2023 मधील कलम 14(1)(ब) व 14(3) नुसार प्रत्येक नोंदणीकृत नियतकालिकासाठी वार्षिक विवरणपत्र दाखल करणे बंधनकारक आहे. आर्थिक वर्ष 2024-25 चे विवरणपत्र अद्याप सादर न केलेल्या प्रकाशकांना 30 जून 2026 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

*दंडात्मक कारवाई*  
निर्धारित मुदतीत वार्षिक विवरणपत्र सादर न केल्यास संबंधित प्रकाशकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. 
*पहिले उल्लंघन*: किमान 10 हजार रुपयांचा दंड आकारला जाईल.  
*पुढील उल्लंघन*: त्यानंतरच्या प्रत्येक उल्लंघनासाठी दंडाची रक्कम मागील दंडाच्या दुप्पट असेल.  
*कमाल मर्यादा*: एकूण दंडाची कमाल मर्यादा 2 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे.

प्रेस रजिस्टर जनरल यांनी आर्थिक वर्ष 2024-25 चे वार्षिक विवरणपत्र अद्याप दाखल न केलेल्या प्रकाशकांना 30 जूनपूर्वी प्रेस सेवा पोर्टलवर ऑनलाइन विवरणपत्र सादर करून दंडात्मक कारवाई टाळण्याचे आवाहन केले आहे.

No comments:

Post a Comment

आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव न देणे ही हुतात्म्यांशीही सरकारने केलेली प्रतारणा !!

आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव न देणे ही हुतात्म्यांशीही सरकारने केलेली प्रतारणा !! 1984 च्या आंदोलनातील रणरागिणी भारतीताई पोवार यांचे...