Thursday, 16 July 2026

बोरीवलीत 'लाल सलाम' दीर्घांकाचा शुभारंभाचा प्रयोग; मालिकेत झळकणारा अभिनेता आयुष आशिष भिडे रंगभूमीवर !!

बोरीवलीत 'लाल सलाम' दीर्घांकाचा शुभारंभाचा प्रयोग; मालिकेत झळकणारा अभिनेता आयुष आशिष भिडे रंगभूमीवर !!

मुंबई प्रतिनिधी, पंकज चव्हाण

आम्ही रंगकर्मी प्रस्तुत 'लाल सलाम' या दीर्घांकाचा शुभारंभाचा प्रयोग रविवार दिनांक २ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ४.३० वाजता जयवंत दळवी लघुनाट्यगृह, प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरीवली (पश्चिम) येथे सादर होणार आहे. प्रभावी कथा, दमदार अभिनय आणि दर्जेदार तांत्रिक सादरीकरणामुळे या नाटकाची रंगप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

या दीर्घांकाच्या लेखिका नीरजा वर्तक असून, विशेष म्हणजे, सध्या कलर्स मराठी वाहिनीवरील 'मोहिनी – प्रेमाची फिल्मी कहाणी' या मालिकेत 'अजिंक्य' ही भूमिका साकारत असलेला अभिनेता आयुष भिडे यांनी या नाटकाची दिग्दर्शनासोबत अभिनेता म्हणून महत्त्वपूर्ण भूमिकाही साकारत आहेत.

लाल सलाम ह्या दीर्घांकाच्या
प्रकाशयोजनेची जबाबदारी कैलास ठाकूर आणि कुणाल खुटकर तसेच पार्श्वसंगीत मिहिर जोग व गौरंग साखरे, नेपथ्य आयुष भिडे आणि शुभम जाधव, रंगभूषा शरद विचारे, तर वेशभूषा सायली गावंड आणि पूर्वा फडके यांनी केली आहे. रंगमंच व्यवस्थापन कैलास मेस्त्री, गौतमी दातार, यश जाधव आणि सलोनी शिंदे यांनी सांभाळले आहे. 

या दीर्घांकात शार्वी वर्तक, पूर्वा फडके, सलोनी शिंदे, कैलास मेस्त्री, मिहिर जोग, शुभम जाधव, नीरजा वर्तक आणि आयुष भिडे हे कलाकार विविध भूमिका साकारत आहेत. या नाट्यप्रयोगाची निर्मिती आम्ही रंगकर्मी यांनी केली असून श्री. आशिष कलामंच आणि Gravitees यांचे निर्मिती सहाय्य लाभले आहे.

तिकीट दर ₹१५० असून तिकीट विक्री सुरू झाली आहे. नवोदित कलाकारांचा ओसंडून वाहणारा उत्साह, अनुभवी तांत्रिक टीमचे भक्कम पाठबळ आणि विषयाची प्रभावी मांडणी यांचा सुरेख संगम लाभलेल्या 'लाल सलाम'च्या या शुभारंभाच्या प्रयोगाकडून नाट्यरसिकांना एक उत्कट, दर्जेदार आणि दीर्घकाळ स्मरणात राहणारा रंगानुभव मिळण्याची उत्सुकता व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment

सेंट विल्फ्रेड्स कॉलेजच्या (पनवेल) वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांचा 'स्वागत समारंभ' उत्साहात साजरा !!

सेंट विल्फ्रेड्स कॉलेजच्या (पनवेल) वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांचा 'स्वागत समारंभ' उत्साहात साजरा !! पनवेल येथील सेंट व...