अल्पसंख्याक युवक-युवतींसाठी बीएसएनएलकडून मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण !!
भारत सरकारच्या पीएम विकास योजनेअंतर्गत भारत संचार निगम लिमिटेड यांच्या झोनल टेलिकॉम प्रशिक्षण केंद्र, शाहूनगर, चिंचवड येथे अल्पसंख्याक युवक-युवतींसाठी मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे.
या प्रशिक्षणामध्ये ब्रॉडबँड नेटवर्क तंत्रज्ञ व वायरलेस नेटवर्क तंत्रज्ञ या अभ्यासक्रमांचे तीन महिन्यांचे प्रशिक्षण तसेच एक महिन्याचे कार्यस्थळी प्रशिक्षण दिले जाणार आहे. पात्र प्रशिक्षणार्थींना दरमहा दोन हजार रुपये विद्यावेतन व प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर शासनमान्य प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन व पारशी समाजातील १८ ते ४५ वर्षे वयोगटातील बारावी उत्तीर्ण युवक-युवती तसेच पदवी, पदव्युत्तर, अभियांत्रिकी, डिप्लोमा व पॉलिटेक्निकचे विद्यार्थी अर्ज करू शकतात. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) व दिव्यांग उमेदवारांसाठीही मर्यादित जागा उपलब्ध आहेत.
इच्छुकांनी अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी ९४०३१२८३८८, ९४२५८००९७८ किंवा ९४२५८००७९३ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment