Wednesday, 5 August 2026

ठाणे जिल्हा परिषदेत 11 आरोग्य सेवकांना पदोन्नती; मुख्य कार्यकारी अधिकारी यादव यांच्या हस्ते आदेश वितरण !!

ठाणे जिल्हा परिषदेत 11 आरोग्य सेवकांना पदोन्नती; मुख्य कार्यकारी अधिकारी यादव यांच्या हस्ते आदेश वितरण !!

*ठाणे, दि. 4 ऑगस्ट 2026*

जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत आरोग्य विभागातील 11 आरोग्य सेवक (पुरुष) कर्मचाऱ्यांना आरोग्य सहाय्यक (पुरुष) पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. 

आज जिल्हा परिषद सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या अध्यक्षतेखाली समुपदेशनानंतर पदस्थापना आदेशांचे वितरण करण्यात आले.

*उपस्थित मान्यवर*  
या कार्यक्रमाला उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. स्वाती पाटील तसेच आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

*सीईओ काय म्हणाले?*  
पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव म्हणाले, "अधिक जबाबदारीने सेवा करण्याची ही संधी आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना गुणवत्तापूर्ण आणि तत्पर आरोग्य सेवा देण्यासाठी नव्या पदाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी. शासनाच्या आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून जिल्हा परिषदेच्या आरोग्य सेवेला अधिक सक्षम बनवावे."

पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांनीही जिल्हा परिषद प्रशासनाचे आभार मानले आणि ग्रामीण भागाला चांगल्या आरोग्य सुविधा देण्यासाठी समर्पितपणे काम करण्याची ग्वाही दिली.

No comments:

Post a Comment

ठाणे जिल्हा परिषदेत 11 आरोग्य सेवकांना पदोन्नती; मुख्य कार्यकारी अधिकारी यादव यांच्या हस्ते आदेश वितरण !!

ठाणे जिल्हा परिषदेत 11 आरोग्य सेवकांना पदोन्नती; मुख्य कार्यकारी अधिकारी यादव यांच्या हस्ते आदेश वितरण !! *ठाणे, दि. 4 ऑगस्ट 202...