*कल्याण-डोंबिवली : रुग्णालयात अडीच वर्षाच्या मुलाच्या कमरेत इंजेक्शनची सुई अडकली; चौकशी सुरू*
*कल्याण, प्रतिनिधी* : कल्याण डोंबिवलीतील काका ढाबा परिसरात पाळीव कुत्र्याने चावा घेतल्यानंतर उपचारासाठी दाखल केलेल्या अडीच वर्षाच्या मुलाच्या कमरेत अँटी रेबीज इंजेक्शनची सुई अडकल्याची धक्कादायक घटना रुक्मिणीबाई रुग्णालयात घडली आहे.
*काय घडले?*
काका ढाबा परिसरातील सूर्यकांत पांडे आणि काजल पांडे यांचा मुलगा कावेशला 2 ऑगस्ट रोजी कुत्रा चावल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याला अँटी रेबीजची 6 इंजेक्शने द्यायची होती. शेवटचे इंजेक्शन देताना मुलाच्या कमरेत सुई अडकली. काही दिवसांनी मुलाला त्रास होऊ लागल्याने पालकांनी एक्स-रे काढला तेव्हा हा प्रकार उघडकीस आला.
*कोण जबाबदार?*
प्राथमिक माहितीनुसार, अंबरनाथ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एका शिकाऊ डॉक्टरने हे इंजेक्शन दिले होते. मात्र, त्यावेळी केडीएमसीचा वरिष्ठ डॉक्टर उपस्थित नव्हता. याबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.
*चौकशी सुरू*
या घटनेची गंभीर दखल घेत अंबरनाथ महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संतोष वर्मा आणि केडीएमसीच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपा शुक्ला यांनी दोन सदस्यीय चौकशी समिती नियुक्त केली आहे. समितीचा अहवाल आल्यानंतर जबाबदारांवर कारवाई केली जाणार आहे.
या घटनेमुळे सरकारी रुग्णालयातील रुग्णांच्या सुरक्षिततेवर आणि शिकाऊ डॉक्टरांच्या देखरेखीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
No comments:
Post a Comment