Monday, 17 August 2026

केबल फॉल्टमुळे डोंबिवली एमआयडीसी निवासीमध्ये 13 तास वीज पुरवठा बंद !!

केबल फॉल्टमुळे डोंबिवली एमआयडीसी निवासीमध्ये 13 तास वीज पुरवठा बंद !!

*डोंबिवली, दि. 18 ऑगस्ट 2026*

डोंबिवली एमआयडीसी निवासी परिसरात आज पुन्हा एकदा दीर्घकाळ वीज खंडित राहिल्याने नागरिक वैतागले आहेत. केबल फॉल्टमुळे स्नेहगंधा सोसायटीसह परिसरातील अनेक सोसायट्यांना तब्बल 13 तासांहून अधिक काळ वीजेविना रहावे लागले.

*पहाटेपासून वीज गायब*  
आज सोमवारी पहाटे 3.30 वाजण्याच्या सुमारास स्नेहगंधा सोसायटी RH 20 आणि आजूबाजूच्या सोसायट्यांचा वीज पुरवठा अचानक बंद झाला. नागरिकांनी महावितरणकडे तक्रार केल्यानंतर कर्मचाऱ्यांनी पाहणी केली असता केबलमध्ये फॉल्ट असल्याचे निदर्शनास आले. 

या केबलला जॉईंट मारणे आवश्यक असल्याने खाजगी ठेकेदार एजन्सीच्या मदतीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले.

*दुपारी 4.30 नंतर सुरू झाली वीज*  
दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर दुपारी 4.30 वाजता वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. त्यामुळे नागरिकांना पहाटेपासून दुपारपर्यंत अडचणींचा सामना करावा लागला.

*सततच्या खंडितमुळे नागरिक संतप्त*  
एमआयडीसी निवासी परिसरात गेल्या काही महिन्यांपासून केबल फॉल्ट, पोलवरील तांत्रिक बिघाड आणि उच्च दाबाच्या वाहिन्यांवर झाडांच्या फांद्या पडून किंवा स्पर्श होऊन वीज खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत.

वारंवार होणाऱ्या या खंडितांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे. महावितरण आणि केडीएमसी प्रशासनाने कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी नागरिक करत आहेत.

वृत्त - राजू नलावडे (डोंबिवली)

No comments:

Post a Comment

केबल फॉल्टमुळे डोंबिवली एमआयडीसी निवासीमध्ये 13 तास वीज पुरवठा बंद !!

केबल फॉल्टमुळे डोंबिवली एमआयडीसी निवासीमध्ये 13 तास वीज पुरवठा बंद !! *डोंबिवली, दि. 18 ऑगस्ट 2026* डोंबिवली एमआयडीसी निवासी परि...