‘माहिती अधिकार कार्यकर्ते ब्लॅक मेलर’ या वक्तव्याने भोवले; नगरसेवकांविरोधात बाजारपेठ पोलिसांत अदखलपात्र गुन्हा दाखल !!
*कल्याण, दि. 9 ऑगस्ट 2026*
डोंबिवली महानगरपालिकेच्या महासभेत माहिती अधिकार कार्यकर्त्यांबाबत कथित बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी कल्याण पश्चिम बाजारपेठ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
*काय घडले होते?*
दि. 25 मार्च 2026 रोजी दुपारी सुमारे 2.30 वाजता महापालिका भवन येथे झालेल्या महासभेत डोंबिवली येथील नगरसेवक मंदार श्रीकांत हळबे यांनी माहिती अधिकार कार्यकर्त्यांना उद्देशून ‘ब्लॅक मेलर’ असा शब्द वापरल्याचा आरोप आहे.
*पोलिसांत तक्रार, नंतर NCR दाखल*
पत्रकार आणि माहिती अधिकार कार्यकर्ते गणेश ताटे यांनी या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दि. 9 जुलै 2026 रोजी भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 356(1) अन्वये NCR क्रमांक 1398/2026 नोंदवला आहे.
त्यानंतर दि. 8 ऑगस्ट 2026 रोजी पोलिसांनी तक्रार अर्जावर कारवाई झाल्याचे नमूद करून अर्ज दप्तरी दाखल केल्याचे पत्र गणेश काटे यांना दिले आहे.
*महासभेत चर्चेला उधाण*
या प्रकरणामुळे महापालिकेच्या महासभेत माहिती अधिकार कार्यकर्त्यांबाबत करण्यात आलेल्या कथित वक्तव्यावरून सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
या घटनेनंतर अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, "नगरसेवकांनी आपली पायरी ओळखून शब्द वापरावेत. एखाद्याला दमदाटी करू नये आणि पदाचा गैरवापर करू नये. आरटीआय कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांना विनाकारण त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी विविध स्तरातून येत आहेत."
पोलिसांनी या प्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे.
No comments:
Post a Comment