डॉ. रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली बुद्धभूमी फाउंडेशनबाबत सह्याद्री अतिथीगृहात महत्त्वपूर्ण बैठक !!
*मुंबई, दि. 18 ऑगस्ट 2026*
मा. डॉ. रामदासजी आठवले साहेब, राज्यमंत्री, सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मलबार हिल मुंबई येथे बुद्धभूमी फाउंडेशनशी संबंधित विविध विषयांवर महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत तीन प्रमुख मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली.
*बैठकीतील प्रमुख चर्चा*
*1. जमीन आणि सातबारा नोंदीबाबत*
बुद्धभूमी फाउंडेशनच्या ताब्यातील जमिनीवर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने चुकीच्या आणि बेकायदेशीर पद्धतीने TDR काढून सातबारा उताऱ्यावर केलेल्या नोंदींचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. सदर नोंदींची सुनावणी घेऊन त्या रद्द कराव्यात तसेच दोषी अधिकारी आणि संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी झाली. यासोबतच सातबारा उतारा बुद्धभूमी फाउंडेशनच्या नावावर करण्याबाबतही चर्चा करण्यात आली.
*2. भंतेगण आणि साधकांवरील FIR रद्द करण्याची मागणी*
बुद्धभूमी फाउंडेशनचे भंतेगण आणि साधकांविरुद्ध दाखल करण्यात आलेले अन्यायकारक FIR तातडीने रद्द करण्याबाबत बैठकीत निर्णय घेण्यासाठी चर्चा झाली.
*3. नावकरण आणि धम्मगेट उभारणी*
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील वालधुनी नदी समांतर नियोजित उन्नत मार्गाला "तथागत भगवान गौतम बुद्ध उड्डाणपूल" अlसे नाव देण्यात यावे. तसेच बुद्धभूमी परिसराच्या संरक्षणासाठी "बुद्धभूमी धम्मगेट" उभारण्याबाबतही प्रस्तावावर सकारात्मक चर्चा झाली.
*बैठकीला कोण होते उपस्थित*
या बैठकीला कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे अधिकारी, प्रांत अधिकारी कल्याण विभाग, तहसीलदार कल्याण, कल्याण परिमंडळ 3 चे डीसीपी, MMRDA चे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
बुद्धभूमी फाउंडेशनशी संबंधित प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही करावी असे निर्देश बैठकीत देण्यात आले.
No comments:
Post a Comment