Tuesday, 18 August 2026

ज्येष्ठ पत्रकार महेंद्र ऊर्फ अण्णा पंडित यांना राज्यस्तरीय "वृत्तरत्न" पत्रकारिता पुरस्कार जाहीर...

ज्येष्ठ पत्रकार महेंद्र ऊर्फ अण्णा पंडित यांना राज्यस्तरीय "वृत्तरत्न" पत्रकारिता पुरस्कार जाहीर...

मुंबई, प्रतिनिधी : पत्रकारितेच्या क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत ज्येष्ठ पत्रकार महेंद्र ऊर्फ अण्णा पंडित यांना ‘मंत्रालय वार्ता’च्या वतीने राज्यस्तरीय "वृत्तरत्न" पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. याबाबतचे अधिकृत निमंत्रणपत्र त्यांना मंत्रालय वार्ता चे संपादक ॲड.अनिल अहिरे यांनी दिले आहे.

हा पुरस्कार वितरण सोहळा २६ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर, मंत्रालयासमोर, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. पत्रकारितेतील योगदान आणि वृत्तांकनाची दखल घेत अण्णा पंडित यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याचे निमंत्रणपत्रात नमूद करण्यात आले आहे.

‘मंत्रालय वार्ता’चे मुख्य संपादक ॲड. अनिल अहिरे आणि पुरस्कार निवड समितीच्या अध्यक्षा निशाताई भगत यांच्या स्वाक्षरीने हे निमंत्रणपत्र जारी करण्यात आले आहे. पुरस्कार सोहळ्यास उपस्थित राहून सन्मान स्वीकारावा, अशी विनंती महेंद्र उर्फ अण्णा पंडीत यांना करण्यात आली आहे.

राज्यस्तरीय वृत्तरत्न पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल पत्रकारिता क्षेत्रातील सहकारी, विविध सामाजिक संस्था आणि हितचिंतकांकडून महेंद्र ऊर्फ अण्णा पंडित यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

सावळाराम महाराज क्रीडा संकुलातील वृक्षतोडीप्रकरणी शिवसेना उबाठाकडून मानपाडा पोलिसांना निवेदन !?

सावळाराम महाराज क्रीडा संकुलातील वृक्षतोडीप्रकरणी शिवसेना उबाठाकडून मानपाडा पोलिसांना निवेदन !? *डोंबिवली, दि. 19 ऑगस्ट 2026* डो...