Friday, 21 August 2026

केबल फॉल्टसाठी मिलापनगरचा काँक्रिट रस्ता फोडला; नियोजनाअभावी नागरिक हैराण !!

केबल फॉल्टसाठी मिलापनगरचा काँक्रिट रस्ता फोडला; नियोजनाअभावी नागरिक हैराण !!

*डोंबिवली, दि. 20 ऑगस्ट 2026*

डोंबिवली एमआयडीसी निवासी भागात काँक्रिट रस्ते, नाले आणि गटारींची विकासकामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. मात्र नियोजनाच्या अभावामुळे त्याचा फटका नागरिकांसह महावितरणलाही बसत आहे. अनेक ठिकाणी केबल फॉल्ट झाल्याने नवनवीन काँक्रिट रस्ते तोडण्याची वेळ येत आहे.

*षटकार इमारतीजवळ फॉल्ट, वीजपुरवठा खंडित*  
आज मिलापनगर तलाव रस्त्यावरील षटकार इमारतीसमोर RL 40 येथे महावितरणच्या भूमिगत केबलमध्ये फॉल्ट निर्माण झाला. त्यामुळे आजूबाजूच्या काही इमारती आणि बंगल्यांचा वीजपुरवठा अचानक खंडित झाला.

महावितरण कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली असता काँक्रिट रस्त्याच्या खालून जाणाऱ्या केबलमध्ये बिघाड झाल्याचे स्पष्ट झाले. ग्राहकांना तातडीने वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणला पर्यायाने काँक्रिटचा रस्ता तोडावा लागला.

*विकासकामांमुळे केबल्सना धक्के*  
एमआयडीसी निवासीतील काँक्रिट रस्ते आणि नाले-गटारी बनविताना वीज, पाणी यांच्या भूमिगत वाहिन्यांना धक्के बसल्याने अशा प्रकारचे केबल फॉल्ट वारंवार होत असल्याचे महावितरण अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

नियोजनाअभावी एकीकडे करोडो रुपये खर्च करून बनवले रस्ते पुन्हा तोडावे लागत आहेत. त्यामुळे शासकीय निधीचा अपव्यय होत असून नागरिकांनाही खड्डे आणि धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे.

नागरिकांनी मागणी केली आहे की, पुढील विकासकामे करताना सर्व विभागांनी समन्वय ठेवून एकात्मिक आराखडा तयार करावा. म्हणजे नवीन रस्ते बनल्यानंतर लगेच ते फोडण्याची वेळ येणार नाही.

वृत्त - राजू नलावडे (डोंबिवली)

No comments:

Post a Comment

केबल फॉल्टसाठी मिलापनगरचा काँक्रिट रस्ता फोडला; नियोजनाअभावी नागरिक हैराण !!

केबल फॉल्टसाठी  मिलापनगरचा काँक्रिट रस्ता फोडला; नियोजनाअभावी नागरिक हैराण !! *डोंबिवली, दि. 20 ऑगस्ट 2026* डोंबिवली एमआयडीसी नि...