Monday, 24 August 2026

पनवेल येथील सेंट विल्फ्रेड्स कॉलेजमध्ये "अर्थव्यवस्थेवर अर्थसंकल्पाचा प्रभाव” या विषयावर परिसंवाद संपन्न !!

पनवेल येथील सेंट विल्फ्रेड्स कॉलेजमध्ये "अर्थव्यवस्थेवर अर्थसंकल्पाचा प्रभाव” या विषयावर परिसंवाद संपन्न !!

पनवेल, २४ ऑगस्ट २०२६: सेंट विल्फ्रेड्स कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, पनवेल येथील वाणिज्य विभागाच्या वतीने “अर्थव्यवस्थेवर अर्थसंकल्पाचा प्रभाव” या विषयावर सोमवार, दिनांक २४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी १२.०० या वेळेत महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये परिसंवादाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमास महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य *डॉ. जयंत बेहरा* यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या मार्गदर्शन व सहकार्यामुळे कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

या परिसंवादाचे मार्गदर्शन *प्रा. सी. ए. दीपक वकारिया* यांनी केले. त्यांनी अर्थसंकल्पाची भूमिका तसेच त्याचा आर्थिक विकास, आर्थिक वृद्धी, रोजगारनिर्मिती आणि अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रांवर होणारा परिणाम याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर व उपयुक्त माहिती दिली.

परिसंवादाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून चर्चेत सक्रिय सहभाग घेतला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना अर्थसंकल्प आणि त्याच्या आर्थिक परिणामांविषयी व्यावहारिक व शैक्षणिक दृष्टिकोनातून माहिती मिळाली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी *प्राचार्य डॉ. जयंत बेहरा, प्रमुख वक्ते प्रा. सी. ए. दीपक वकारिया, सर्व प्राध्यापकवर्ग तसेच उपस्थित राहून सक्रिय सहभाग नोंदविणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे वाणिज्य विभागाच्या वतीने मनःपूर्वक आभार मानण्यात आले.*

प्रा. पंकज सरवाडे
*HOD, Commerce Department (वाणिज्य विभागप्रमुख)*
St. Wilfred’s College of Arts, Commerce & Science, Panvel.

वृत्त - अश्विनी निवाते 

No comments:

Post a Comment

*इम्पॅक्ट न्यूज : - आंदोलनाच्या धाकाने अखेर धर्मवीर आनंद दिघे उद्यानाचे टाळे उघडले; पुण्यतिथी दिवशीच केडीएमसीला जाग !!

*इम्पॅक्ट न्यूज* *आंदोलनाच्या धाकाने अखेर धर्मवीर आनंद दिघे उद्यानाचे टाळे उघडले; पुण्यतिथी दिवशीच केडीएमसीला जाग* *डोंबिवली, दि...