Monday, 17 August 2026

झाड तिरपे, धोकादायक झाले; रस्त्यावर कोसळल्यास मोठ्या दुर्घटनेची शक्यता !!

झाड तिरपे, धोकादायक झाले; रस्त्यावर कोसळल्यास मोठ्या दुर्घटनेची शक्यता !!

*डोंबिवली, दि. 19 ऑगस्ट 2026*

डोंबिवली एमआयडीसी निवासी परिसरात झाडे कोसळण्याच्या घटना सुरूच आहेत. या पावसाळ्यात आतापर्यंत सुमारे 17 झाडे कोसळून त्यात काही वाहने आणि संरक्षक भिंतीचे नुकसान झाले आहे. आज आणखी एक धोकादायक झाड समोर आल्याने प्रशासनाला तातडीने कळवण्यात आले आहे.

*मोनालिसा सोसायटीजवळ रेन ट्री धोक्यात*  
आज मंगळवारी सकाळी मिलापनगर सर्व्हिस रोडवर मोनालिसा सोसायटी RM 01 जवळ एक मोठे रेन ट्री झाड तिरपे होऊन रस्त्याच्या दिशेने वाकले दिसले. हे झाड रस्त्याच्या दुसऱ्या बाजूच्या झाडाच्या फांदीच्या आधारावर तोल सावरून उभे आहे. काही मोठी वाहने या झाडाला घासून गेल्याचेही दिसत आहे.

या रस्त्यावरून शालेय बसेस, कंपनीच्या बसेस, केडीएमटी बसेस, रिक्षा आणि दुचाकींची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे हे झाड रस्त्यावर कोसळल्यास जीवित आणि मालमत्तेची मोठी हानी होऊ शकते.

*प्रशासनाला तातडीची सूचना*  
या धोकादायक झाडाबाबत अग्निशमन दल, केडीएमसी उद्यान विभाग आणि वाहतूक पोलिस यांना तातडीने माहिती देण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सदर रस्त्यावरील वाहतूक तात्पुरती बंद करावी अशी विनंतीही करण्यात आली आहे.

*केडीएमसीकडून समिती, नागरिकांची मागणी*  
एमआयडीसी निवासीतील धोकादायक झाडांचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यासाठी केडीएमसी उद्यान विभागाने तज्ज्ञांची समिती नेमली असून तिने अहवाल लवकरात लवकर आयुक्तांना सादर करावा अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

नागरिकांची प्रमुख मागणी आहे की परिसरातील सर्व झाडांचे सर्वेक्षण करून जी झाडे धोकादायक आहेत ती तातडीने तोडावीत. तसेच नव्याने बनवलेल्या काँक्रिट रस्ते, नाले आणि गटारींमुळे झाडांच्या मुळांना फटका बसत आहे. त्यासाठी उपाययोजना केल्यास आणखी झाडे कोसळण्यापासून वाचू शकतील.

प्रशासनाने या विषयाला गांभीर्याने घेऊन त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.

वृत्त - राजू नलावडे (डोंबिवली)

No comments:

Post a Comment

सावळाराम महाराज क्रीडा संकुलातील वृक्षतोडीप्रकरणी शिवसेना उबाठाकडून मानपाडा पोलिसांना निवेदन !?

सावळाराम महाराज क्रीडा संकुलातील वृक्षतोडीप्रकरणी शिवसेना उबाठाकडून मानपाडा पोलिसांना निवेदन !? *डोंबिवली, दि. 19 ऑगस्ट 2026* डो...