टिटवाळा येथे कोकण रहिवासी मंडळाचा गणेश दर्शन सोहळा उत्साहात संपन्न !!
*टिटवाळा, सप्टेंबर २०२६ :*
टिटवाळा येथे गणेशोत्सवानिमित्त कोकण रहिवासी मंडळ, टिटवाळा (रजि.) च्या वतीने गणेश दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
तुळशीबाई सृष्टी संकुल, शंभू राजे मित्र मंडळ, श्री. सुहास कांबळे, श्री. रूपेश जोशी, भाजपा टिटवाळा मंडळ अध्यक्ष श्री. शक्तिवान भोईर, माजी उपमहापौर तथा नगरसेविका सौ. उपेक्षाताई भोईर, श्री. राजू शिंदे, माजी नगरसेवक श्री. सुरेश बळीराम भोईर, ॐकार वसाहत उत्सव समिती, मांडा टिटवाळा, श्री. राजू शिर्के, श्री. जितेंद्र ओक, रमेश धुरीया, श्री. गोपाल बेहरा, श्री. मिथुन पात्रा, श्री. सचिन अनंत परब, श्री. देवेंद्र सावंत परिवार, श्री. कमलेश फाटक परिवार यांनी कोकण रहिवासी मंडळाला श्री गणेशोत्सव व श्री सत्यनारायण महापूजेचे आग्रहाचे निमंत्रण दिले होते.
या निमंत्रणाचा मान राखत कोकण रहिवासी मंडळाचे सभासद, पदाधिकारी व सल्लागार यांनी वेळात वेळ काढून श्री गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी मान्यवरांनी मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा आदर व सन्मान केला.
या प्रसंगी मंडळाचे मान्यवर संस्थापक अध्यक्ष बुवा यशवंत परब, उपाध्यक्ष शंकर पेंडूरकर, सल्लागार संतोष राणे, राजेंद्र गावडे, दिलीप चिपकर, संतोष गावडे, दिव्य परब, राहुल शिर्के, मोरे काका उपस्थित होते.
No comments:
Post a Comment