रस्त्यांच्या तक्रारीवर केडिएमसी कडून फक्त खड्ड्यांच्या जागांवर डांबरीकरणाचा मलम..
(रस्ते दुरुस्ती मध्ये नागरिकांचा कराचा पैसा केडीएमसी ठेकेदाराला खड्डे भरण्यासाठी चे पैसे देणार कि खड्ड्यांच्या नावाखाली संपूर्ण रस्त्या डांबरीकरण दुरुस्तीचे पैसे देणार शिल्पा बजरंग तांगडकर यांचा सवाल)
कल्याण, प्रतिनिधी - कल्याण परिसरामध्ये सर्व ठिकाणी खड्ड्यांमुळे रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे या रस्त्या दुरुस्ती करण्यामध्ये फक्त खड्डे पडलेल्या जागेवर डांबरीकरणाचा मुलामा देऊन नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न कल्याण डोंबिवली महानगरपालिकडे करून येत आहे ,शिल्पा बजरंग तांगडकर यांच्या वतीने टावरी पाडा ,बारावी परिसरातील रस्त्यांच्या प्रश्नांवर ऑनलाइन पत्रा सोबत कार्यालयामध्ये पत्रव्यवहार करण्यात आला होता यावर तत्काळ दिलेल्या कालावधीत कोणती कारवाई करण्यात आली नाही परंतु आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर टावरीपाडा वॉटर फिल्टर रोड डांबरीकरणाचे काम करण्यात आले परंतु हे काम संपूर्ण रस्त्याचे काम केले नसून फक्त खड्डे पडले होते त्या ठिकाणी पॅच मारुन डांबरीकरण करण्यात आले, तसेच अजून बारावे पाइपलाइन ,गोदरेज हिल परिसरातील रस्त्यांची परिस्थिती जैसे थे तशीच आहे.
नागरिकांचा करातील पैसा केडिएमसी खड्डे बुजवल्यानंतर कंत्राटदाराला फक्त त्या खड्डे बुजवले त्याचे पैसे देणार कि रस्ता दुरुस्ती नावाखाली संपूर्ण रस्त्या डांबरीकरण चे पैसे देणार हा प्रश्न शिल्पा तांगडकर यांचा वतीने विचारण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment