Thursday, 3 September 2026

भिवंडी लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांवर खासदार बाळ्या मामा म्हात्रे यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट !!

*भिवंडी लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांवर खासदार बाळ्या मामा म्हात्रे यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट !!

*ठाणे, प्रतिनिधी :* भिवंडी लोकसभा मतदारसंघातील विविध प्रलंबित आणि महत्त्वाच्या लोकहिताच्या प्रश्नांवर खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांनी ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सकारात्मक निर्णय घेऊन तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.

खासदार बाळ्या मामा म्हात्रे यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे यावेळी सांगितले.

*बैठकीतील प्रमुख मुद्दे :*

*🔹 टोरेंट पॉवरचा प्रश्न :* भिवंडीतील 90% ग्राहकांचा टोरेंट पॉवर कंपनीला विरोध असून तिची मान्यता रद्द करून इतर पर्यायी वीज वितरण कंपनी नेमण्याबाबत चर्चा झाली.

*🔹 नवीन अंबाडी तालुका निर्मिती :* भिवंडी तालुक्यातील नवीन अंबाडी तालुका निर्मितीच्या प्रक्रियेला गती देण्याची मागणी करण्यात आली.

*🔹 केंद्रीय विद्यालय व ग्रामपंचायतींचे प्रश्न :* दापोडे (सर्व्हे क्र. 115) येथे केंद्रीय विद्यालय उभारण्याची मागणी आणि इतर ग्रामपंचायतींच्या प्रलंबित समस्या मांडण्यात आल्या.

*🔹 विरार-अलिबाग कॉरिडोअर :* या प्रकल्पातील भूसंपादन आणि मूल्यांकनाबाबत सकारात्मक निर्णय घेण्यावर चर्चा झाली.

*🔹 सरवली MIDC व डंपिंग :* कोनगाव अंतर्गत रस्ता व डंपिंग प्रश्नाबाबत 2013 मधील इतिवृत्तानुसार अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली.

*🔹 भावली धरण योजना :* शहापूर येथील भावली धरण Y Piece Tapping संदर्भात चर्चा झाली.

*🔹 बिरसा मुंडा स्मारक :* शहापूर येथील क्रांतीसूर्य बिरसा मुंडा स्मारकाच्या जागेच्या मागणी प्रस्तावाचा पाठपुरावा करण्यात आला.

*🔹 मुरबाड रेल्वे प्रकल्प :* मुरबाड रेल्वेच्या भूसंपादन प्रक्रियेला गती देण्याबाबत चर्चा झाली.

No comments:

Post a Comment

भिवंडी लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांवर खासदार बाळ्या मामा म्हात्रे यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट !!

*भिवंडी लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांवर खासदार बाळ्या मामा म्हात्रे यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट !! *ठाणे, प्रतिनिध...