*डोंबिवली टॅलेंट हंटच्या 14 व्या पर्वाला अभूतपूर्व प्रतिसाद; 44 हजार विद्यार्थ्यांचा सहभाग !!
डोंबिवलीतील विद्यार्थी आणि त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देणाऱ्या ‘डोंबिवली टॅलेंट हंट’च्या 14 व्या पर्वाला यंदा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या उपक्रमात 600 हून अधिक शाळांमधील इयत्ता 5 वी ते 10 वीच्या सुमारे 44 हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
थोर शिक्षणतज्ज्ञ स्व. सुरेंद्र बाजपेयी यांच्या स्मरणार्थ लायन्स क्लब ऑफ डोंबिवलीच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्राथमिक फेरीनंतर दुसऱ्या फेरीसाठी 1 हजार स्पर्धकांची, तर अंतिम फेरीसाठी 50 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. अंतिम फेरी ओंकार इंटरनॅशनल स्कूल, ठाकुर्ली येथे उत्साहात पार पडली.
या अंतिम फेरीसाठी मी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहून सर्व स्पर्धकांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा आणि त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवणारा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. गेल्या 14 वर्षांपासून सातत्याने सुरू असलेला हा उपक्रम यंदा सर्वाधिक यशस्वी ठरला, ही त्याची वाढती लोकप्रियता दर्शवणारी बाब आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणाऱ्या अशा उपक्रमांना डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन निश्चितच पाठबळ देत राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
यावेळी आमदार राजेश मोरे, लायन्स डिस्ट्रिक्ट गव्हर्नर राजेंद्र शाह, माधव जोशी, दर्शन सामंत, अमोल पोतदार, पर्णाद मोकाशी आदी मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment