अंबरनाथमध्ये रंगला "सुरों का कारवां" – सोनाली साउंडवेव्हजचा संगीतमय सोहळा !!
अंबरनाथ (प्रतिनिधी): सोनाली साउंडवेव्हज प्रस्तुत "सुरों का कारवां" हा लाईव्ह संगीत कार्यक्रम रविवार, दि. २७ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजता अंबरनाथ (पूर्व) येथील वडवली सेक्शनमधील रोटरी क्लब हॉलमध्ये उत्साहात पार पडला. संगीतप्रेमी रसिकांच्या उपस्थितीत आणि टाळ्यांच्या कडकडाटात हा कार्यक्रम यशस्वी झाला.
कार्यक्रमाच्या आयोजिका व गायिका सोनाली यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या मैफलीत जुनी आणि नवी हिंदी-मराठी गीते सादर करण्यात आली. सुमारे तीस हौशी गायकांनी आपली कला सादर केली. त्यात पापिया, निलीमा, नयना, कांचन, मंगला,इंद्रनील, धनंजय, अतुल, विजय, प्रियेश, , महेशकुमार, अखिल, श्रीकांत, विजय एस., हेमंत, स्नेहा, संतोष, अंजया, ओमकार, योगेश, मनोज, सुरेश, प्रथमेश, डॉ. ललित आणि करण यांचा समावेश होता. याशिवाय सुनील डी., शोभराज के., , सोजी एस. आणि रोहित जे. या पाहुण्या गायकांनी आपल्या सुरेल गायनाने कार्यक्रमाची रंगत वाढवली.सिओना सर्व्हे या चिमुकल्या, गुणी पियानो कलाकाराने आपल्या अप्रतिम वादनाने सर्वांची मनं जिंकली.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. ज्योती के., अनन्या के.. यांनी प्रभावीपणे केले. संगीत साथ अभिषेक जहागीरदार (कीबोर्ड) आणि त्यांच्या सहकारी वादकांनी केली. प्रकाश जी., प्रथमेश एम., सुरेन एन., किरीट टी. आणि राहुल के. यांनी संगीत, ध्वनी व्यवस्था आणि व्हिडिओग्राफीची जबाबदारी उत्तमरीत्या सांभाळली.
या कार्यक्रमाला श्रीनिवास व्ही. आणि अजय एम. यांचे सहकार्य लाभले. तसेच विजय क्लासेस आणि सी१० एज्युकेअर यांनी प्रायोजकत्व दिले. कार्यक्रमादरम्यान सर्व कलाकार, पाहुणे आणि मान्यवरांचा पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व कलाकारांनी एकत्र येऊन उपस्थित रसिकांचे आभार मानले. संगीताच्या माध्यमातून लोकांना एकत्र आणणे आणि नवोदित व हौशी कलाकारांना व्यासपीठ देणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे आयोजिका सोनाली यांनी सांगितले. रसिकांचा उदंड प्रतिसाद पाहून भविष्यातही असे कार्यक्रम आयोजित करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
रसिकांच्या उपस्थितीने आणि कलाकारांच्या सादरीकरणाने "सुरों का कारवां" हा कार्यक्रम अंबरनाथच्या संगीतप्रेमींसाठी एक संस्मरणीय संध्याकाळ ठरला.
No comments:
Post a Comment