Thursday, 8 October 2026

वसईत रेशनकार्डच्या नावाखाली गरिबांची लूट; पुरवठा अधिकारी भागवत सोनार यांच्या चौकशीची मागणी !!

वसईत रेशनकार्डच्या नावाखाली गरिबांची लूट; पुरवठा अधिकारी भागवत सोनार यांच्या चौकशीची मागणी !!

*शिवसेना वसई विधानसभा संघटक प्रथमेश बांदेकर यांनी खासदार डॉ. हेमंत सावरा यांची मंत्रालयात घेतली भेट*

वसई, प्रतिनिधी : वसई तालुक्यात नवीन प्राधान्य (PHH) आणि बिगर प्राधान्य (NPH) रेशनकार्ड बनवून देण्याच्या नावाखाली गरीब जनतेची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये तालुका पुरवठा अधिकारी भागवत सोनार आणि परिसरातील महा ई-सेवा केंद्रांचे साटेलोटे असून या भ्रष्ट साखळीची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी शिवसेना वसई विधानसभा संघटक प्रथमेश बांदेकर यांनी केली आहे.

या गंभीर विषयावर बांदेकर यांनी मंत्रालयात पालघरचे खासदार डॉ. हेमंत सावरा यांची भेट घेऊन निवेदन दिले.

शासकीय नियमानुसार रेशनकार्डसाठी नाममात्र शुल्क आकारले जाणे अपेक्षित असताना वसई-विरार आणि नालासोपारा परिसरातील महा ई-सेवा केंद्रांमधून हजारो रुपयांची बेकायदेशीर मागणी केली जात असल्याचा आरोप बांदेकर यांनी केला आहे. पुरवठा अधिकारी सोनार यांच्या आशीर्वादाशिवाय ही लूट शक्य नसल्याचा थेट आरोपही त्यांनी केला.

*बांदेकर यांच्या प्रमुख मागण्या :*
*१.* पुरवठा अधिकारी भागवत सोनार यांच्या कार्यकाळातील रेशनकार्ड वाटपाची उच्चस्तरीय समितीमार्फत सखोल चौकशी करून त्यांना तत्काळ निलंबित करावे.
*२.* भ्रष्टाचाराच्या तक्रारी असलेल्या महा ई-सेवा केंद्रांचे परवाने रद्द करून त्यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत.
*३.* गेल्या वर्षभरात वाटप झालेल्या सर्व NPH आणि PHH रेशनकार्डचे ऑडिट करावे.

या प्रकरणात लक्ष घालून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन खासदार डॉ. सावरा यांनी दिल्याचे समजते.

No comments:

Post a Comment

खरांगण येथील वयोवृद्ध महिला शेतकऱ्यांची खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे तक्रार; लक्ष घालण्याचे आश्वासन !

खरांगण येथील वयोवृद्ध महिला शेतकऱ्यांची खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे तक्रार; लक्ष घालण्याचे आश्वासन ! *कल्याण (संजय कांबळे) :...