Friday, 9 October 2026

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीतील 'नमो रमो' कार्यक्रमाचा खर्च शेतकऱ्यांसाठी वळवा; ॲड. आकाश वेदक यांची मागणी !!

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीतील 'नमो रमो' कार्यक्रमाचा खर्च शेतकऱ्यांसाठी वळवा; ॲड. आकाश वेदक यांची मागणी !!

        ॲड. आकाश वेदक (अधिवक्ता, मुंबई उच्च न्यायालय) 

*डोंबिवली :* महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून पावसाची कमतरता, पाणीटंचाई आणि पीक नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाने दुष्काळग्रस्त तालुक्यांची घोषणा करून उपाययोजना सुरू केल्या असतानाच, डोंबिवली येथे आयोजित करण्यात येणाऱ्या 'नमो रमो' कार्यक्रमाचा खर्च दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वळवावा, अशी मागणी अशी मागणी ॲड. आकाश वेदक (अधिवक्ता, मुंबई उच्च न्यायालय) यांनी केली आहे.

नागरिकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या मागणीद्वारे कोणत्याही धार्मिक कार्यक्रमाला, नवरात्रोत्सवाला किंवा देवीच्या भक्तीला विरोध नाही. उलट नवरात्रोत्सवाचे धार्मिक व पारंपरिक स्वरूप कायम राहावे, हीच भूमिका आहे.

मोठ्या खर्चाच्या AC Dome मध्ये गरबा-रास आयोजित करण्याऐवजी देवीची मूर्ती विधिवत आणून प्रतिष्ठापना करावी आणि नवरात्रोत्सवाच्या काळात दररोज आरती करून धार्मिक परंपरा जपावी. त्यामुळे अनावश्यक खर्च टाळून तो निधी संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरता येईल, असे निवेदनात म्हटले आहे.

*प्रमुख मागण्या :*

*1.* AC Dome मधील गरबा-रासचा कार्यक्रम रद्द करून नवरात्रोत्सव साध्या व धार्मिक स्वरूपात साजरा करावा.
*2.* देवीची मूर्ती विधिवत आणून प्रतिष्ठापना करावी व दररोज आरती करावी.
*3.* कार्यक्रमासाठी होणारा खर्च व जमा होणारा निधी दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर व त्यांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी द्यावा.
*4.* सदर निधीचा वापर पीक नुकसान भरपाई, चारा, पिण्याचे पाणी, बियाणे व शेती साहित्यासाठी पारदर्शक पद्धतीने करावा.

"आज महाराष्ट्रातील शेतकरी संकटात असताना डोंबिवलीने उत्सवाबरोबरच सामाजिक संवेदनशीलतेचा आदर्श निर्माण करावा. देवीची भक्तीही राहू द्या आणि संकटात असलेल्या अन्नदात्याची मदतही होऊ द्या," असे आवाहन ॲड. आकाश वेदक यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीतील 'नमो रमो' कार्यक्रमाचा खर्च शेतकऱ्यांसाठी वळवा; ॲड. आकाश वेदक यांची मागणी !!

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीतील 'नमो रमो' कार्यक्रमाचा खर्च शेतकऱ्यांसाठी वळवा; ॲड. आकाश वेदक यांची मागणी !!     ...