Friday, 9 October 2026

*एमआयडीसीत पाइपलाइनमधून पाण्याची गळती सुरूच; पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी*

*एमआयडीसीत पाइपलाइनमधून पाण्याची गळती सुरूच; पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी*

*डोंबिवली, राजू नलावडे :* डोंबिवली एमआयडीसी निवासी सर्व्हिस रोडवरील (कल्याण-शीळ रोड) पंचरत्न बिल्डिंग RL-39 समोर आज शनिवारी पहाटेपासून पाण्याची मोठी पाइपलाइन फुटून पाण्याचे फवारे उंच उडत होते. अंदाजे 4 ते 5 तास या पाइपलाइनमधून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होऊन नासाडी झाली.

एमआयडीसी डोंबिवली कार्यालयाला कळविल्यानंतर सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास ही गळती थांबविण्यात आली.

सध्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दुष्काळी परिस्थिती असून पाणी टंचाईने नागरिक त्रस्त असताना अशा प्रकारे पाण्याची नासाडी होत असेल तर प्रशासनाने हे गांभीर्याने घेण्याची गरज आहे.

डोंबिवली एमआयडीसी आणि ग्रामीण परिसरात अनेक ठिकाणी पाइपलाइनवरील व्हॉल्वमधून अजूनही पाणी गळती होत असल्याचे दिसते. काही समाजकंटक व्हॉल्वमध्ये छेडछाड करून पाणी चोरी करतात. त्यामुळे गळती आणि पाइपलाइन फुटण्याचे प्रकार वारंवार घडतात. तसेच पाइपलाइनमधून अनधिकृत कनेक्शन घेऊन पाणी चोरीचे प्रकारही सुरूच आहेत.

नागरिकांना पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत असताना गळती आणि चोरीला आळा घालणे आवश्यक आहे. पाण्याच्या मोठ्या पाइपलाइनवर ठराविक अंतरावर सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षा रक्षक नेमल्यास या प्रकारांना काही प्रमाणात आळा बसेल. एमआयडीसीने काही वर्षांपूर्वी याचा विचार केला होता, आता त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याची गरज आहे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

No comments:

Post a Comment

जसखार ग्रामसुधारणा मंडळाच्या अध्यक्षपदी रंजीत पाटील, तर सेक्रेटरीपदी सुरज कडू !!

जसखार ग्रामसुधारणा मंडळाच्या अध्यक्षपदी रंजीत पाटील, तर सेक्रेटरीपदी सुरज कडू !! उरण दि ९, (विठ्ठल ममताबादे ) : सर्वांचे लक्ष ला...