Friday, 9 October 2026

वसईच्या नवापूर-काठेपाडा धूप प्रतिबंधक बंधाऱ्याचे काम रखडले; आ. स्नेहा दुबे पंडित यांच्याकडे साकडे, रिटेंडरिंगचे आश्वासन !!

वसईच्या नवापूर-काठेपाडा धूप प्रतिबंधक बंधाऱ्याचे काम रखडले; आ. स्नेहा दुबे पंडित यांच्याकडे साकडे, रिटेंडरिंगचे आश्वासन !!

*वसई, प्रतिनिधी :* प्रशासनाच्या चुकीमुळे आणि कागदोपत्री घोळामुळे वसई तालुक्यातील नवापूर-काठेपाडा किनारपट्टीवरील धूप प्रतिबंधक बंधाऱ्याचे काम रखडले आहे. या प्रश्नी शिवसेना वसई विधानसभा संघटक प्रथमेश बांदेकर यांनी आमदार स्नेहा दुबे पंडित यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावर आमदारांनी नव्याने रिटेंडरिंग करून प्रकल्प मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

समुद्राच्या भरतीमुळे नवापूर-काठेपाडा येथे मोठ्या प्रमाणावर जमिनीची धूप होत असून स्थानिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे. यावर उपाय म्हणून शासनाने धूप प्रतिबंधक बंधारा मंजूर केला होता.

मात्र, पुणे येथील CWPRS संस्थेने तयार केलेल्या अहवालात वसईच्या 'नवापूर-काठेपाडा' ऐवजी बोईसरमधील 'नवापूर-दांडी' असा चुकीचा उल्लेख केल्यामुळे या प्रकल्पाच्या CRZ परवानग्या रखडल्या आणि कोट्यवधी रुपयांचे काम लालफितीत अडकले.

या प्रशासकीय गोंधळामुळे स्थानिकांचे मोठे नुकसान होत असल्याची बाब बांदेकर यांनी पुराव्यांसह आमदारांच्या निदर्शनास आणून दिली. आमदारांनी या विषयाचे गांभीर्य ओळखून संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधून रिटेंडरिंग प्रक्रियेद्वारे प्रश्न सोडविण्याची ग्वाही दिली. तसेच तांत्रिक त्रुटी दूर करण्यासाठी अधिक माहिती व कागदपत्रे सादर करण्याच्या सूचना बांदेकर यांना दिल्या.

"प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा फटका नागरिकांना बसू नये यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आमदारांनी दिलेल्या आश्वासनामुळे जनतेला लवकरच न्याय मिळेल आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. जोपर्यंत काम सुरू होत नाही, तोपर्यंत पाठपुरावा सुरूच राहील," अशी प्रतिक्रिया प्रथमेश बांदेकर यांनी दिली.

No comments:

Post a Comment

नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी राधाकृष्ण मंदिर, निंबवली येथे काँक्रीट रस्त्याचे काम सुरू; किरण केणे यांच्या पाठपुराव्याला यश !!

नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी राधाकृष्ण मंदिर, निंबवली येथे काँक्रीट रस्त्याचे काम सुरू; किरण केणे यांच्या पाठपुराव्याला यश !! ...