नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी राधाकृष्ण मंदिर, निंबवली येथे काँक्रीट रस्त्याचे काम सुरू; किरण केणे यांच्या पाठपुराव्याला यश !!
*कल्याण (संजय कांबळे) :* शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी कल्याण तालुक्यातील निंबवली येथील राधाकृष्ण मंदिर परिसरात सुमारे 150 मीटर सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली.
सामाजिक कार्यकर्ते तथा काँग्रेसचे ठाणे जिल्हा ग्रामीण सचिव किरण राम केणे यांच्या गेल्या तीन महिन्यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश आले आहे. जनसुविधा योजना 2515 ग्रामीण विकास कार्यक्रमांतर्गत या रस्त्याचे काम मंजूर झाले असून त्याचे उद्घाटन काँग्रेसचे ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष इंजि. चेतनसिंह पवार यांच्या हस्ते आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आले.
टिटवाळा-खडवली रस्त्यावर वसलेल्या निंबवली गावाच्या विकासासाठी किरण केणे नेहमी अग्रेसर असतात. गटारे, जिल्हा परिषद शाळा, इतर सोयी-सुविधांसाठी ते पंचायत समिती, जिल्हा परिषद, खासदार, आमदार यांच्याकडे पाठपुरावा करत असतात. राधाकृष्ण मंदिर परिसरातील वाडी-वस्तीतील रस्त्यासाठीही ते गेल्या तीन महिन्यांपासून कल्याण पंचायत समितीकडे पाठपुरावा करत होते.
अखेर नवरात्राच्या शुभ मुहूर्तावर या कामाचे उद्घाटन झाले. यावेळी प्रतीक्षा केणे, बाजार समितीचे माजी संचालक अरुण जाधव, माजी उपसरपंच साईनाथ दळवी, उपसरपंच बबलू दळवी, सेवादलचे यशवंत गोंधळे, तुकाराम मांजरे, प्रकाश गोंधळे, प्रकाश खंबाळे, संतोष खंबाळे, सतिश केणे, सचिन दळवी, नरेश केणे, निकेश दळवी, त्रिदेव केणे, कृष्णा केणे, जयेश दळवी, वंदना भोईर, वंदना नाहटे, सुगंधा दळवी आदी उपस्थित होते.
या कामाबद्दल जिल्हाध्यक्ष चेतनसिंह पवार, शिवसेना (उबाठा) विभागप्रमुख सुरेश जाधव, उपसरपंच बबलू पाटील यांनी किरण केणे यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
No comments:
Post a Comment