Friday, 2 October 2026

उरण येथे महाराष्ट्र ओबीसी कृती समितीची कार्यकारणी बैठक !!

उरण येथे महाराष्ट्र ओबीसी कृती समितीची कार्यकारणी बैठक !!

महाराष्ट्रातील ३३ ओबीसी जातींच्या केंद्रीय ओबीसी सूचीतील समावेशासाठी पुढील रणनीतीवर होणार चर्चा.

उरण दि २, (विठ्ठल ममताबादे) : महाराष्ट्रातील ३३ ओबीसी जाती/समाज समूहांचा केंद्र सरकारच्या केंद्रीय ओबीसी सूचीमध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या महाराष्ट्र ओबीसी कृती समितीची कार्यकारणी बैठक रविवार, दि.४ ऑक्टोबर २०२६ रोजी उरण, जिल्हा रायगड येथे कराडी समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीत महाराष्ट्रातील संबंधित ओबीसी समाजांना केंद्र सरकारच्या ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळण्यासाठी सुरू असलेल्या पाठपुराव्याचा आढावा घेण्यात येणार असून, केंद्र व राज्य सरकारकडे करण्यात आलेल्या निवेदने, बैठका, पत्रव्यवहार तसेच पुढील कार्यवाहीबाबत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.

विशेषतः केंद्रीय ओबीसी सूचीतील समावेशाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात नेण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रभावीपणे पाठपुरावा करणे, तसेच या विषयाबाबत विविध ओबीसी समाज संघटनांमध्ये व्यापक जनजागृती करण्यासाठी पुढील दिशा निश्चित करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र ओबीसी कृती समितीच्या माध्यमातून या विषयासाठी दिल्ली तसेच महाराष्ट्रात विविध स्तरांवर सातत्याने पाठपुरावा करण्यात आला आहे. संबंधित समाजांना केंद्र शासनाच्या शैक्षणिक प्रवेश, केंद्रीय सरकारी नोकऱ्या, शिष्यवृत्ती व इतर केंद्रस्तरीय योजनांमध्ये उपलब्ध होणाऱ्या ओबीसी सुविधांचा लाभ मिळावा, हा या प्रयत्नांचा प्रमुख उद्देश आहे.

या कार्यकारणी बैठकीस महाराष्ट्रातील विविध ओबीसी समाजांचे प्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार असून, एकत्रितपणे पुढील कृती आराखडा निश्चित करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र ओबीसी कृती समितीचे अध्यक्ष श्रावण फरकाडे व कराडी समाज संघटना  यांनी संबंधित सर्व पदाधिकारी व प्रतिनिधींनी बैठकीस उपस्थित राहून आपले विचार व सूचना मांडाव्यात, असे आवाहन केले आहे.रविवार, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२ ते ४ या वेळेत हॉटेल आनंदी, रेल्वे स्टेशनजवळ, उरण, जिल्हा रायगड येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र ओबीसी कृती समितीचे अध्यक्ष श्रावण फरकाडे व कराडी समाज संघटना यांच्या वतीने करण्यात आले आहे

No comments:

Post a Comment

जीवनदीप लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून वरप जि.प. शाळेतील मुलांना 'सुरक्षाकवच' अंतर्गत कायदेविषयक जनजागृती !!

जीवनदीप लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून वरप जि.प. शाळेतील मुलांना 'सुरक्षाकवच' अंतर्गत कायदेविषयक जनजागृती !! *कल्याण (सं...