Friday, 2 October 2026

जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत, सिद्धार्थ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वेट लिप्टींग स्पर्धेत सुवर्णपदक व तायक्वांडो स्पर्धेत रौप्यपदक जिंकले !

जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत, सिद्धार्थ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वेट लिप्टींग स्पर्धेत सुवर्णपदक व तायक्वांडो स्पर्धेत रौप्यपदक जिंकले !

मुंबई शहर अंतर्गत, मुंबई विभागीय शालेय वेटलिफ्टिग व तायक्वांडो क्रीडा स्पर्धा २०२६-२७ आयोजित करण्यात आल्या होत्या. सदर स्पर्धेत सिद्धार्थ कनिष्ठ महाविद्यालयाचा, इयत्ता १२वीचा विद्यार्थी कु. आयन समीर हवालदार याने उत्तम कामगिरी करून चालू वर्षाच्या मुंबई विभागीय शालेय वेटलिफ्टिंग क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून पुढील राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत प्रवेश मिळवला आहे‌. ही स्पर्धा अमरावती येथे १५ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.

तसेच तायक्वांडो क्रीडा स्पर्धेत आमच्या कनिष्ट महाविद्यालयाचा इयत्ता ११वीचा विद्यार्थी 'कु. हेम विपूल धोरीया' यानेदेखील मुंबई विभागीय शालेय तायक्वांडो स्पर्धेत रौप्यपदक जिंकले. या स्पर्धेसाठी महाविद्यालयांकडून या दोन्ही विद्यार्थ्यांना पूर्ण सहकार्य करण्यात आले व पुढील स्पर्धेतही त्यांना सहकार्य मिळणार आहे. 

तसेच जिल्हास्तरीय फूट बॉल स्पर्धेत आमच्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या संघाने दोन सलग साखळी सामन्यात जयहिंद व विल्सन महाविद्यालयाच्या संघाला हारवून तीसर्या फेरीत प्रवेश मिळविला, मात्र भवन्स महाविद्यालयाच्या संघाकडून  आमच्या संघाचा या फेरीत पराभव झाला.

जिमखाना विभागाचे आमचे सहाय्यक कर्मचारी श्री मंगेश कदम हे संबंधित विभागाच्या प्रशासकीय कामकाजात लक्ष घालून विद्यार्थ्यांना नेहमीच सहकार्य करत असतात, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या विविध क्रीडा स्पर्धेतील सहभाग वाढविण्यासाठी त्यांचे प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहेत.‌

डॉ. विष्णु ज. भंडारे
(प्रभारी प्राचार्य)

वृत्त - अश्विनी निवाते (मुंबई)

No comments:

Post a Comment

जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत, सिद्धार्थ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वेट लिप्टींग स्पर्धेत सुवर्णपदक व तायक्वांडो स्पर्धेत रौप्यपदक जिंकले !

जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत, सिद्धार्थ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वेट लिप्टींग स्पर्धेत सुवर्णपदक व तायक्वांडो स्पर्धेत रौप्यपदक जिंक...