Friday, 2 October 2026

*‘आयुक्तांचा विश्वासघात; मुटघरे-भूमाफिया साटेलोट्यात वसई-विरारचा बळी!’*

*‘आयुक्तांचा विश्वासघात; मुटघरे-भूमाफिया साटेलोट्यात वसई-विरारचा बळी!’* 

वसई-विरार (विशेष प्रतिनिधी):
वसई-विरार शहर महानगरपालिकेत शिस्त आणणाऱ्या आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांच्या विश्वासाला हरताळ फाळत, उपायुक्त विशाखा मुटघरे आणि भूमाफियांचे उघड 'साटेलोटे' सुरू असल्याचे समोर आले आहे. आयुक्त शहराच्या विकासाची स्वप्ने पाहत असताना, मुटघरे मॅडमच्या संशयास्पद मौनामुळे बेकायदेशीर इमारतींचे पेव अधिकच फोफावले आहे.

नालासोपारा पूर्व, वालीपाडा येथील (अक्षांश १९.४२३२१°, रेखांश ७२.८३५६५२°) उभी राहिलेली पांढऱ्या रंगाची अवाढव्य बहुमजली इमारत या भ्रष्ट कारभाराचा प्रत्यक्ष पुरावा आहे. काचा नसलेल्या खिडक्या, उघड्या चौकटी अन् कचऱ्याचे साम्राज्य सांगत आहे की ही इमारत पूर्णपणे बेकायदेशीर आहे.

उपायुक्त मुटघरे मॅडम, उत्तर द्या:

* दोन वेगवेगळे नियम का?: ६० फुटांच्या गरिबांच्या घरांवर तातडीने बुलडोझर चालवणारे पथक भूमाफियांच्या टोलेजंग इमारतींसमोर हतबल का होते?
* आयुक्तांची दिशाभूल: कडक कारवाईचे आदेश असताना, केवळ कागदी नोटिसांचे नाटक करून आयुक्तांची आणि जनतेची फसवणूक का केली जात आहे?
* विकासकाचा चेहरा गुप्त का?: या बेकायदेशीर इमारतीचा विकासक कोण आणि त्याचा मालमत्ता क्रमांक काय, ही माहिती सार्वजनिक का केली जात नाही?

वातानुकूलित केबिनमध्ये बसून भूमाफियांशी घरोबा घालणे बंद करा! महापालिकेने तातडीने या इमारतीवर बुलडोझर चालवून ती जमीनदोस्त करावी. टाळाटाळ झाल्यास, उपायुक्त विशाखा मुटघरे यांनी आयुक्तांचा विश्वासघात करून भूमाफियांशी हातमिळवणी केल्याचे सिद्ध होईल आणि त्यांच्या निलंबनाची मागणी पत्रकार व नागरिकांकडून लावून धरली जाईल.

— बी. के. पांड्ये (पत्रकार)

No comments:

Post a Comment

जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत, सिद्धार्थ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वेट लिप्टींग स्पर्धेत सुवर्णपदक व तायक्वांडो स्पर्धेत रौप्यपदक जिंकले !

जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत, सिद्धार्थ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वेट लिप्टींग स्पर्धेत सुवर्णपदक व तायक्वांडो स्पर्धेत रौप्यपदक जिंक...