जीवनदीप महाविद्यालयातून वन्यजीव सप्ताहाला प्रांरभ, एक धाव वन्य जीवासाठी ने वातावरण निर्मिती, स्वच्छतेने कार्यक्रमाची सुरुवात, कल्याण वनविभागाचा कौतुकास्पद उपक्रम !
कल्याण, (संजय कांबळे) : वनविभाग ठाणे, वनपरिक्षेत्र अधिकारी कल्याण आणि जीवनदीप महाविद्यालयात गोवेली यांच्या संयुक्त विद्यमाने आज राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून २ आँक्टोबर ते ८ आँक्टोबर या वन्यजीव सप्ताहाचा प्रारंभ आज गोवेली महाविद्यालयातून झाला, यावेळी रन फाँर वाईल्ड लाईफ अर्थात एक धाव वन्यजीवासाठी मध्ये काँलेजच्या एन सीसी, वार फांऊंडेशन, वाइल्ड लाईफ इंडिया आणि वनविभागाचे कर्मचारी, वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश आखाडे, भाजपाचे तालुका अध्यक्ष शेखर लोणे, समृद्ध पंचायतराज चे सदस्य पत्रकार संजय कांबळे, गोवेली ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी आदी मंडळी या दौड मध्ये सहभागी झाले होते.
गोवेली महाविद्यालयात प्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त त्यांना पुष्पहार अर्पण करून उपस्थित विद्यार्थी व विविध संस्थाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांना वन्यजीव सप्ताहा बद्दल माहिती देण्यात आली, जनजागृती करण्यात आली. यानंतर भाजपाचे अध्यक्ष शेखर लोणे व वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश आखाडे यांनी झेंडा दाखवून रँलीची/दौडची सुरुवात काँलेज ते टिटवाळा मंदिर अशी झाली, यावेळी विद्यार्थ्यांच्या हातात विविध बँनर, फलक, होते, त्यावर, झाडे लावा, झाडे जगवा, ही दौड कोणासाठी, वन्यजीवासाठी, वन्य संपदाचे रक्षण ही आमची जबाबदारी, वन आहे तर जीवन आहे, असे मजकूरांचा त्यामध्ये समावेश होता,
ही दौड टिटवाळा मंदिर परिसरात पोहचल्यानंतर येथे मोठ्या प्रमाणात घोषणा देण्यात आल्या, यानंतर अध्यक्ष शेखर लोणे, आरफ ओ श्री आखाडे, समिती सदस्य, पत्रकार संजय कांबळे यांनी या परिसराची स्वच्छता केली, तर वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश आखाडे यांनी हा कार्यक्रम पुर्ण७दिवस शाळा, महाविद्यालयात, गावात, राबविण्यात येणार असून त्यामध्ये बिबट्या, व इतर वन्यजीव संदर्भात जनजागृती व माहिती देण्यात येणार असल्याचे सांगून त्यांनी आमदार किसन कथोरे, सभापती तथा महाविद्यालयाचे अध्यक्ष रवींद्र घोंडविंदे सर, भाजपाचे शेखर लोणे, वार फाऊंडेशनचे, वार लाईफचे सहकार्याबद्दल आभार मानले. यावेळी गोवेली पासून ते टिटवाळा पर्यंत काढलेल्या वन्यजीव रँलीमुळे परिसरात चांगले वातावरण निर्मिती झाली या उपक्रमाचे श्री लोणे यांनी कौतुक केलं.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जीवनदीप महाविद्यालयाचे शिक्षक, कर्मचारी, एनसीसी चे विद्यार्थी, वनकर्मचारी या सर्वांनी मेहनत घेतली.
No comments:
Post a Comment