*कल्याण, संजय कांबळे : कल्याण तालुक्यातील म्हारळ वरप-कांबा येथे राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, दि. 8 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 11 वाजता कांबा येथील मोनालिसा हॉल येथे हा मेळावा होणार असल्याची माहिती आयोजक भरत (भाऊ) गोंधळे यांनी दिली.
या मेळाव्यास संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, माजी मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड, महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, भिवंडीचे खासदार तथा ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे, कल्याण लोकसभा प्रभारी महेश तपासे, ठाणे शहर जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भरत (भाऊ) गजानन गोंधळे यांनी या मेळाव्याचे आयोजन केले असून कल्याण, मुरबाड, शहापूर परिसरातून मोठ्या संख्येने महिला उपस्थित राहणार आहेत. मेळाव्याच्या तयारीची पाहणी भरत (भाऊ) गोंधळे यांनी केली असून ठाणे जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
या कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून अनंता ठाकरे, रवींद्र परटोले, निलेश कडू, संतोष म्हसकर, सागर राठोड, ज्योती वाघमारे आणि आम्रपाली लोखंडे कार्यरत आहेत.
No comments:
Post a Comment