Wednesday, 25 November 2026

मुंब्रा, टिटवाळा, वाशिंद, कुळगाव-बदलापूर परिसरात बंगले व फार्म हाऊसवर दरोडे टाकणारी टोळी गुन्हे शाखेकडून जेरबंद !!

मुंब्रा, टिटवाळा, वाशिंद, कुळगाव-बदलापूर परिसरात बंगले व फार्म हाऊसवर दरोडे टाकणारी टोळी गुन्हे शाखेकडून जेरबंद !!

*मुंब्रा, विनोद गिरी :* मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तसेच टिटवाळा, वाशिंद, कुळगाव-बदलापूर परिसरातील बंगले व फार्म हाऊसवर दरोडे टाकून लुटणारी टोळी गुन्हे शाखा, घटक-३, कल्याण यांनी जेरबंद केली आहे.

*मुंब्रा येथील दरोड्याचा गुन्हा :*
मुंब्रा पोलीस स्टेशन, गुन्हा रजि. क्र. २०६४/२०२६, भा. न्याय संहिता २०२३ चे कलम ३१०(२), ३०७, ३१२, ३३१(४), ३३२ प्रमाणे दि. १७/११/२०२६ रोजी गुन्हा दाखल झाला होता.

फिर्यादी श्री. तुकाराम सत्यवान मुंढे यांच्या बंगल्याच्या खिडकीची ग्रील ८ ते ९ दरोडेखोरांनी तोडून बंगल्यात प्रवेश केला. बंगल्यामध्ये झोपलेल्या संतोष शेडगे यांना स्क्रू ड्रायव्हरचा धाक दाखवून व जिवे ठार मारण्याची धमकी देऊन त्यांच्या तोंडाला रुमाल बांधून हात-पाय बांधले. त्यानंतर बंगल्यातील १,५५,०००/- रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व ८४,०००/- रुपये रोख असा दरोडा टाकून पळून गेले होते.

*तपासातून टोळी उघड :*
या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा, घटक-३, कल्याणकडून करण्यात येत होता. घटनास्थळ व परिसरात तसेच सी.एस.एम.टी. ते बदलापूर, कसारा रेल्वे स्टेशनवर असलेल्या सुमारे १५० ते २०० सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्यांमधील फुटेजची पाहणी, तांत्रिक विश्लेषण आणि मानवी कौशल्याचा वापर करून आरोपी निष्पन्न करण्यात आले.

ताब्यात घेतलेले आरोपी :
*१)* विजय तुळशीराम चव्हाण, वय ४५ वर्षे, रा. येवे, पिंपळोली, बदलापूर, जि. ठाणे
*२)* लक्ष्मण उमाजी भोसले, वय ४३ वर्षे, रा. ३०३, शांताराम आत्माराम पाटील बिल्डिंग, शुभम डेअरीजवळ, सेक्टर-३१, खाडी पुलाजवळ, वाशी गाव, नवी मुंबई
*३)* सतिष सुरेश वाघे, वय २७ वर्षे, रा. साखरवाडी, पिसा डॅमजवळ, ता. भिवंडी, जि. ठाणे
*४)* नारायण रघुनाथ ठोंबरे, वय २७ वर्षे, रा. ठाकुरवाडी, बदलापूर, जि. ठाणे
*५)* जयेश सुरेश कथोरे, वय ३५ वर्षे, रा. हनुमान मंदिराच्या बाजूला, अंबरनाथ, जि. ठाणे

त्यांनी सदरचा दरोडा टाकल्याचे निष्पन्न झाल्याने गुन्हा उघडकीस आणला आहे. आरोपींना पुढील तपासकामी मुंब्रा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, पुढील तपास मुंब्रा पोलीस ठाण्याकडून करण्यात येत आहे.

*टोळीकडून उघडकीस आलेले गुन्हे :*
अ.क्र. पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नंबर कलम
१ कुळगाव पोलीस ठाणे २५४/२०२६ बीएनएस कलम ३०५, ३३१(४)
२ कल्याण तालुका पोलीस ठाणे ८२८/२०२६ बीएनएस कलम ३१०(२), ३०५, ३३१(३)
३ कल्याण तालुका पोलीस ठाणे ८१८/२०२६ बीएनएस कलम ३१०(२), ३०५, ३३१(२)
४ वाशिंद पोलीस ठाणे २७०/२०२६ बीएनएस कलम ३१०(२), ३०५, ३३१(२)
५ वाशिंद पोलीस ठाणे २७१/२०२६ बीएनएस कलम ३१०(२), ३०५, ३३१(२)
६ वाशिंद पोलीस ठाणे २७५/२०२६ बीएनएस कलम ३१०(२), ३०५, ३३१(३)
७ पडघा पोलीस ठाणे ४७९/२०२६ बीएनएस कलम ३०५, ३३१
*आरोपी विजय तुळशीराम चव्हाण याच्यावर पूर्वी दाखल असलेले गुन्हे :*
अ.क्र. पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नंबर कलम
१ देहू रोड पोलीस ठाणे २४१/२०१७ भादवि ४५७, ३८०
२ लोणावळा पोलीस ठाणे १५४/२०१३ भादवि ३९५, ३४२
३ अलिबाग पोलीस ठाणे ११४/२०१० भादवि १४३, १४७, १४९, ३२३, ५०६
४ कर्जत पोलीस ठाणे १५५/२००६ भादवि ३७९, ३४
५ माणगाव पोलीस ठाणे ०६/२००७ भादवि ४५७, ३८०, ३४
६ वडगाव मावळ पोलीस ठाणे १८१/२०१९ भादवि ३९५, ४२७, ४३९
७ कर्जत पोलीस ठाणे १४७/२०१८ भादवि ३९७, ३४२, ४१२
८ सासवड पोलीस ठाणे १६/२००७ भादवि ३७९, ३४
९ माणगाव पोलीस ठाणे ०२/२००७ भादवि ४५७, ३८०, ३४
१० कुळगाव पोलीस ठाणे १८६/२०१८ भादवि ३९२, ३९५, ४१७
११ लोणावळा ग्रामीण पोलीस ठाणे १७३/२०१३ भादवि ३९९, ४०२, शस्त्र अधि. कलम ३, ४, २५
१२ वडगाव मावळ पोलीस स्टेशन १९७/२०१३ भादवि ३९५, ४३९
१३ नेरळ पोलीस स्टेशन ९६/२०१८ भादवि ४५७, ३८०
१४ वडगाव मावळ पोलीस स्टेशन २४१/२०१४ भादवि ४६४, ४६८, ४७१, ४७४, ४२०, ३४
१५ लोणावळा पोलीस ठाणे २१८/२०१४ भादवि ३९४, ३४
१६ पनवेल तालुका पोलीस ठाणे ५२/२०१७ भादवि ३८०, ३४
१७ तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे २२५/२००९ भादवि ३९५, ४३९, ३४१, ३४
१८ मुरबाड पोलीस ठाणे ११०/२००९ भादवि ३९५, ३८०, ३४
*आरोपी नारायण रघुनाथ ठोंबरे याच्यावर पूर्वी दाखल असलेला गुन्हा :*
अ.क्र. पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नंबर कलम
१ कुळगाव पोलीस ठाणे १०/२०२५ भादवि ६४(१), ६४(२)(एम), ७७, ३५१(२), ३५२
*कामगिरी करणारे पथक :*
सदरची कामगिरी मा. श्री. आशुतोष डुंबरे, पोलीस आयुक्त, ठाणे शहर, मा. श्री. पंजाबराव उगले, सह पोलीस आयुक्त, गुन्हे, मा. श्री. अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, गुन्हे व मा. श्री. शेखर बागडे, सहा. पोलीस आयुक्त, (शोध-१) गुन्हे, ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अजित शिंदे, उल्हासनगर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेश गज्जल, कल्याण गुन्हे शाखेचे सपोनि गणेश दळवी, सपोनि सर्जेराव पाटील, पोउपनि किरण भिसे, पोलीस अंमलदार दत्ताराम भोसले, बालाजी शिंदे, विलास कडू, विजय जिरे, अदिक जाधव, दत्तप्रसाद महाजन, सुधीर कदम, सचिन भालेराव, पांडुरंग भांगरे, सचिन कदम, गोरखनाथ पोटे, प्रशांत वानखेडे, उल्हास खंडारे, युवराज ठेपणे, प्रविण किनरे, गुरूनाथ जरग, विनोद चन्ने, मिथुन राठोड, गोरक्ष शेकडे, सतिश सोनवणे, गणेश हरणे, महिला पोलीस अंमलदार मंगल गावित, पुनम खरात, चालक सपोउपनिरी अमोल बोरकर, उल्हासनगर गुन्हे शाखेचे सपोनिरी श्रीरंग गोसावी, पोउपनि अशोक पवार, सफौ बबन बांडे, सफौ सुरेश जाधव, पोहवा अशोक थोरवे, पोहवा राजेंद्र थोरवे, पोहवा गणेश गावडे, पोहवा रितेश वंजारी, पोहवा प्रकाश पाटील, पोशि रामदास उगले, चापोशि अविनाश पवार यांच्या पथकाने केलेली आहे.

No comments:

Post a Comment

मुंब्रा, टिटवाळा, वाशिंद, कुळगाव-बदलापूर परिसरात बंगले व फार्म हाऊसवर दरोडे टाकणारी टोळी गुन्हे शाखेकडून जेरबंद !!

मुंब्रा, टिटवाळा, वाशिंद, कुळगाव-बदलापूर परिसरात बंगले व फार्म हाऊसवर दरोडे टाकणारी टोळी गुन्हे शाखेकडून जेरबंद !! *मुंब्रा, विन...