Wednesday, 3 February 2021

मुरबाड तालुक्यातील बहुचर्चित सरपंच पदाचे आरक्षण अखेर जाहिर !!

मुरबाड तालुक्यातील बहुचर्चित सरपंच पदाचे आरक्षण अखेर जाहिर !!


** आरक्षण बदलाने झाला अनेक भावी सरपंचांचा अपेक्षा भंग **             ---


मुरबाड-(मंगल डोंगरे) : 15 डिसेंबर  2020 ला झालेल्या मुरबाड तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतीच्या  निवडणुका पार पडल्या त्यांनतर १८ डिसेंबरला मतमोजणी घेण्यात आली. परंतु सरपंच पदाचे आरक्षण घोषित नसल्याने गावकुसात शांतता होती .आज अखेर ग्रामपंचायत सरपंच पदाचे  आरक्षण मुरबाड मधिल एम. आय. डी. सी. हाॕल मधे घोषित झाले असून २०२० ते २०२५ या पंचवार्षिक साठी तालुक्यातील खांडपे, शिवळे व उचले या ग्रामपंचायतमधे अनुसूचित जातीचे आरक्षण घोषित झाले असून यातील शिवळे  ग्रामपंचायत मध्ये सरपंच पद हे अनुसूचित महिलेसाठी राखीव आहे. तर अनुसूचित जमाती वर्गासाठी मासले, खानिवरे, व आसोसे या तिन ग्रामपंचायतीचा समावेश झाला आहे. यात खानिवरे व आसोसे येथे अनुसूचित महिला राखीव सरपंच असणार आहे.
                    
उर्वरीत ३८ पैकी १९ ग्रामपंचायतीवर ना.मा.प्रवर्ग आरक्षण असून नढई, मोहोप, कोरावळे, शेलारी, माजगाव, कान्होळ, कान्हार्ले, जांबुर्डे,पाठगाव, कोळठण या १० ग्रामपंचायतीच्या सरपंच महिला असतील. व डोंगरन्हावे, शिरवली, कुडवली, देवपे, पवाळे, सरळगाव, असोळे, कळमखांडे, मा.शिरवली अशा ०९ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी पुरुष आरुढ होणार आहेत. उर्वरीत 46 ग्रामपंचायतीच्या पैकी आंबेळे बु||,शिरगाव, साकुर्ली, न्हावे, किशोर, धानिवली, टेंबरे बु||, कळंभे, करवेळे, आंबेटेंभे, वांजळे, नारीवली, पोटगाव, म्हाडस, चिरड, तोंडली, वाघिवली, नागाव, देवगाव, विढे, भालुक, फणसोली, आगाशी, या ग्रामपंचायतीचे सरपंच पद खुल्या प्रवर्गासाठी तर दहिगाव शे,चिखले,भादाणे, आंबेगाव, बांधिवली, गवाळी, केदुर्ली, डेहनोली, काचकोळी, मोहघर, बोरगाव, खाटेघर, साजई, म्हसा, कोंडेसाखरे, शिदगाव, माल्हेड, नढई, सासणे, भुवन, मानिवली बु||, देहेरी, खांदारे या ग्रामपंचायतीचे सरपंच पद हे महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहे. आजच्या या आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागले असताना बदललेल्या आरक्षणामुळे अनेक भावी सरपंच पदाची स्वप्न पाहणाऱ्यांचा अपेक्षा भंग झाला आहे.तर काही सदस्यांना आरक्षण सोडतीने आशा पल्लवित  झाल्याचे दिसून आले.            

याq आरक्षण सोडतीसाठी उपजिल्हाधिकारी तथा निवडणुक निर्णय अधिकारी अपर्णा सोमाने, मुरबाडचे तहसिलदार अमोल कदम, नायब तहसिलदार प्रसाद पाटिल यांच्या समवेत लहान मुलगी कु.पूर्वी सोनटक्के हिच्या हस्ते चिठ्ठ्या काढून सोडत काढण्यात आली.

कल्याण तालुक्यातील ऐक्केचाळीस ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर, वरप अनुचित जाती महिला, बेहरे खोणी सर्वसाधारण महिला तर म्हारळ नागरिकांचा मागास प्रवर्ग ?

कल्याण तालुक्यातील ऐक्केचाळीस ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर, वरप अनुचित जाती महिला, बेहरे खोणी सर्वसाधारण महिला तर म्हारळ नागरिकांचा मागास प्रवर्ग ?


कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील एकूण ४१ ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण सोडत आज काढण्यात आली. यामध्ये वरप ग्रामपंचायतीची स्थापना झाल्यापासूनच पहिल्यांदाच ग्रामपंचायतीवर मागासवर्गीय महिला सरपंच पदाचे आरक्षण पडले असून तालुक्यातील सर्वात मोठ्या असलेल्या बेहरे आणि खोणी ग्रामपंचायतीवर खुल्या गटातील महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. तर दुसऱ्या मोठ्या व श्रीमंत असलेली म्हारळ ग्रामपंचायत ही नागरिकांचा मागास प्रवर्ग साठी राखीव पडल्याने येथे सरपंच पदाची चुरस निर्माण होणार आहे.


कल्याण तालुक्यातील नुकत्याच झालेल्या २१ ग्रामपंचायतीचे व उर्वरित २० ग्रामपंचायतीसाठी असे एकूण ४१ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत आज कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या आचार्य अत्रे नाट्यगृहात लहान मुलगा पार्थ चौगले याच्या हस्ते काढण्यात आले. यामध्ये नुकत्याच निवडणूका झालेल्या आपटी मांजर्ली, रायते पिंपळोली, नवगाव बापसई, गोवेली रेवती, निंबवली मोस, म्हारळ, वरप, कांबा, जांभूळ मोहिली, आणे भिसोळ, खोणी वडवली, वडवली शिरढोण, बेहरे, नडगाव दांनबाव, घोटसई,  सांगोडा कोंढेरी, म्हसकळ अनखर, मानवली, उतणे चिंचवली, गुरवली आणि राया ओझल्री आदी ग्रामपंचायतीचा समावेश होता.

परंतु आज सरपंच पदाचे आरक्षणासाठी उर्वरित २० ग्रामपंचायतीचेहीआरक्षण काढण्यात आले. ही सोडत काढताना मागील १५ वर्षांतील म्हणजे २००५, २०१०, व २०१५ यावेळी काय आरक्षण होते याचा विचार करून ही सोडत काढण्यात आली. यामध्ये प्रथम अनुचित जाती /मागासवर्गीय साठी तीन जागा राखीव ठेवण्यात आल्या, नागरिकांचा मागास प्रवर्ग करीता ११ तर सर्वसाधारण (खुला) १२ जागा आरक्षित करण्यात आल्या. यामध्ये प्रामुख्याने वरप आणि निंबवली मोस या ग्रामपंचायती मागासवर्गीय महिला साठी आरक्षित झाल्या तर गोवेली रेवती अनुसूचित जाती सर्वसाधारण साठी राखीव ठेवण्यात आली. त्यानंतर अनुसूचित जमाती महिला म्हसकळ अनखर तसेत कांबा, चौरे या ग्रामपंचायती आरक्षित झाल्या. तर  नागरिकांचा मागास प्रवर्ग साठी ११ ग्रामपंचायती पैकी ५ महिलासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली यामध्ये आपटी मांजर्ली, फळेगाव, रायते, रुंदा आंबिवली, आणि नडगाव दांनबाव याचा समावेश आहे उर्वरित म्हारळ, गेरसे, आणे भिसोळ, आदी ग्रामपंचायतीचा समावेश आहे.

सर्वांचेच लक्ष लागलेल्या सर्वसाधारण (खुला) गटातील २४ ग्रामपंचायतीपैकी १२ ग्रामपंचायती सर्वसाधारण महिला साठी राखीव ठेवण्यात येवून याचे आरक्षण काढण्यात आले. बापसई नवगाव, बेहरे, पोई, खोणी वढवली, उशीद, वासुद्री, पळसोली, रोहन अंताडे, सांगोडा, उतणे चिंचवली, मानिवली व वडवली शिरढोण या १२ ग्रामपंचायतीचां समावेश आहे. उर्वरित दहिवली, गुरवली, वसत शेलवली, काकडपाडा, दहागाव, वाहोली, रुदे आंबिवली, नांदप, मामणोली, कोसले, केळणी कोलम आणि जांभूळ या ग्रामपंचायती अराखीव ठेवण्यात आल्या.

  "पहिल्यांदा आणि चुरस";
आज झालेल्या कल्याण तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीत वरप ग्रामपंचायतीची स्थापना झाल्यापासून पहिल्यांदाच ही ग्रामपंचायत बिनविरोध झाली तर या ग्रामपंचायतीवर पहिल्यांदाच एक मागासवर्गीय महिला सरपंच म्हणून बसणार आहे. त्यामुळे या समाजामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
तर तालुक्यातील सर्वात मोठ्या व श्रीमंत असलेल्या म्हारळ ग्रामपंचायतीचे सरपंच पद हे नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी राखीव झाल्याने व येथे कोणालाही बहुमत नसल्याने याठिकाणी खरेदी विक्री, कोलांट्या उड्या, पळवा पळवी, आदी सर्व प्रकारचे लोक मनोरंजन होणार आहे. तर बेहरे, खोणी, वडवली शिरढोण येथील सरपंच पद खुला महिलांसाठी राखीव असल्याने येथे असे काहीसे प्रकार घडू शकतात. त्यामुळे हे रामायण व महाभारत येत्या ८ व १० फेब्रुवारी पर्यंत पाह्यला मिळणार आहे.
आजच्या या सरपंच आरक्षण सोडतीकरीता कल्याण तहसीलदार दिपक आकडे, नायब तहसीलदार संजय भालेराव, लिपिक सुनील कोलते पाटील, खेत्रे, तलाठी सुर्यवंशी आदी उपस्थित होते. तसेच सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वारकरी सेवा फाऊंडेशनच्या घाटकोपर उपाध्यक्ष पदी ह.भ.प प्रतिक केसरकर यांची निवड !!

वारकरी सेवा फाऊंडेशनच्या घाटकोपर उपाध्यक्ष पदी ह.भ.प प्रतिक केसरकर यांची निवड !!


मुंबई (शांत्ताराम गुडेकर) : 

         वारकरी सेवा फाऊंडेशनच्या घाटकोपर उपाध्यक्ष पदी हभप प्रतिक सहदेव केसरकर यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. वारकरी सेवा फाऊंडेशन माध्यमातून राज्यभर धार्मिक, सामाजिक उपक्रम होत असुन वारकरी सांप्रदाय विश्व सांप्रदाय करण्याचं कार्य या फाऊंडेशनच्या माध्यमातून होत आहे. हभप प्रतिक सहदेव केसरकर लहानपणापासून वारकरी सांप्रदायात सक्रिय सहभाग घेऊन दिंडी, कीर्तन, प्रवचन, भजन आदी धार्मिक कार्यक्रमात भाग घेऊन वारकरी परंपरा जपण्याच कार्य करत आहेत. गुरुवर्य संतोष महाराज राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी वारकरी सेवेचे धडे गिरवले असून त्यांचे वारकरी सांप्रदायातील कार्य पाहून फाऊंडेशनचे अध्यक्ष पांडुरंग महाराज शितोळे यांनी त्यांना नियुक्तीपत्रक दिले आहे.

डॉ. श्री. संजय जाधव अध्यक्ष (एन. के. जाधव. एज्युकेशन अँड चॅरिटेबल ट्रस्ट) च्या वतीने कोरोना योद्धा सन्मान व सलाम वसई सेवा संघ यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिरसह मोफत आरोग्य शिबीर संपन्न !!

डॉ. श्री. संजय जाधव अध्यक्ष (एन. के. जाधव. एज्युकेशन अँड चॅरिटेबल ट्रस्ट) च्या वतीने कोरोना योद्धा सन्मान व सलाम वसई सेवा संघ यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिरसह  मोफत आरोग्य शिबीर संपन्न !!


नालासोपारा (दिपक मांडवकर/ शांत्ताराम गुडेकर ) :

             नालासोपारा येथे  जिजाईनगर मोरगाव येथे वाड नं. ३९ चे बहुज  विकास आघाडीचे संपर्क प्रमुख डॉ. संजय जाधव एन. के. जाधव. एज्युकेशन अँड चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने कोरोना योद्धा सन्मान व सलाम वसई सेवा संघ यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिरसह मोफत आरोग्य शिबीर व मोफत डोळे तपासणी शिबिर पार पडले. या कार्यक्रमात मान्यवर म्हणून वसई विरार महानगरपालिका प्रथम महापौर राजीवजी पाटील साहेब, माजी. महापौर रुपेश जाधवजी, सभापती मकवानाजी, नगरसेवक किसन मामा बंदगळेजी, अरुण जधाव, निलेश चौधरी, भूटो समानी, ब्रिजेश यादव, संजय कदम, रमेश चव्हाण, सौ.किरण तिवारी, विनय तिवारी आदी मान्यवर उपस्थिती होते. तर एन. के. जाधव एज्युकेशन अँड चॅरिटेबल ट्रस्ट च्या सदस्य सौ. नंदा संजय जाधव, राजेश जाधव, डॉ. रिया संजय जाधव यांनी मान्यवरांचे आभार मानले. या कार्यक्रमात शिवसेना पक्षातील ५ माजी शाखा प्रमुखानी वसई विरार महानगरपालिकेचे प्रथम महापौर राजीव पाटील यांच्या उपस्थितीत बहुजन विकास आघाडी पक्षा मध्ये पक्ष प्रवेश केला.

          कोरोना योद्धा म्हणून २६० योद्धा सहभागी झाले होते, त्यात प्रथम डॉक्टर, नर्स, पोलीस, सफाई दूत, पत्रकार, नगरसेवक, विद्युत मंडळ कर्माची, गॅस कर्मचारी, आशा वर्कर्स, समाज सेवक यांना कोरोना योद्धा पुरस्कार देऊन सन्मानित केले. तर महारक्तदान शिबिरा साठी ८१ रक्त दातांनी आपले सहयोद दिले. व मोफत आरोग्य व डोळे तपासणी मध्ये १६५ नागरिकांनी सहभाग घेतला. हा कार्यक्रम नियोजन मंडळाचे सदस्य सोमा गुडेकर, अप्पा सुतार, प्रकाश नाडकर, दीपक हरयाणा, संजय कदम, राजन तळेकर, सागर फाळके, शरद रिंगे, विश्वानाथ रेवाळे, विक्रम राऊत, केतन मांजरेकर, गणपत पवार, संजय वारंग, संतोष नाईक, मनोज शिवतारकर, विलास वारिसे, एकनाथ चौगुले, पत्रकार दीपक मांडवकर यांनी योग्यरित्या पार पाडले. व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अप्पा सुतार, प्रकाश नाडकर, दिपक मांडवकर यांनी केले. शेवटी आभारप्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

अखिल महाराष्ट्र सकुळ साळी समाज संस्था. महिला मंडळ व युवक मंडळ यांच्यामार्फत महिला सबलीकरण सक्षमीकरण योजनेअंतर्गत आत्मनिर्भर उद्योजकता उपकरणे वाटप समारंभ संपन्न !!

अखिल महाराष्ट्र सकुळ साळी समाज संस्था. महिला मंडळ व युवक मंडळ यांच्यामार्फत महिला सबलीकरण सक्षमीकरण योजनेअंतर्गत आत्मनिर्भर उद्योजकता उपकरणे वाटप समारंभ संपन्न !!


मुंबई, (शांत्ताराम गुडेकर/ श्रीराम वैद्य) :

        अखिल महाराष्ट्र सकुळ साळी समाज संस्था. महिला मंडळ व युवक मंडळ यांच्यामार्फत महिला सबलीकरण सक्षमीकरण योजनेअंतर्गत आत्मनिर्भर उद्योजकता उपकरणे वाटप समारंभ कालिदास मॅरेज हॉल मुलुंड पश्चिम याठिकाणी संपन्न झाला. यशवंत जाधव (अध्यक्ष स्थायी समिती बृहन्मुंबई महानगरपालिका) यांच्या मदतीमुळे ज्येष्ठ समाजसेवक भरत मते व सौ अश्विनी ताई भरत मते यांच्या अथक प्रयत्नातून मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील अत्यंत गरजू महिलांना त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी सात शिलाई मशीने व दोन घरघंटी तसेच एक एम्ब्रोईडरी मशीन (प्रत्येक जिल्ह्यासाठी फिरते )असे एकूण मिळून ३७ साधने मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात  आली. यशवंत जाधव (अध्यक्ष-स्थायी  समिती बृहन्मुंबई महानगरपालिका) व  साै.यामिनी जाधव, विधानसभा सदस्य महाराष्ट्र विधानमंडळ यांचे सुपुत्र निखिल जाधव (सिनेट सदस्य,मुंबई विद्यापीठ) यांच्या हस्ते.

तसेच ज्येष्ठ समाजसेवक भरत मते, कवी- साहित्यिक अरुण म्हात्रे, साै.गीता हरवंदे, प्रकाश पोळ यांच्या हस्ते व अध्यक्ष अखिल महाराष्ट्र स्वकुळ साळी समाज संस्था अशोक दांडेकर, अध्यक्षा, अखिल महाराष्ट्र स्वकुळ साळी समाज महिला मंडळ साै. अश्विनीताई मते, युवा अध्यक्ष विक्रम पाठक, श्रीकांत बडे, तामिळनाडू राज्य महिला अध्यक्षा श्रीमती-विजया एकबोटे, अ.म.स्व.सा.स.संस्था विभागीय उपाध्यक्षा श्रीमती कल्पना शिपुरकर अ.म.स्व.सा.स.संस्था उपाध्यक्षा, साै.शैलजा कासटकर , व विभागीय उपाध्यक्षा, साै.किर्ती दळवी तसेच बहुसंख्य समाज बंधू भगिनींच्या साक्षीने साहित्याचे वाटप करण्यात आले.शिलाई मशीन वाटप दरम्यान लाभार्थी महिलांच्या डोळ्यात कृतज्ञतेचे भाव दिसत होते. काही भगिनींनी आपले मनोगत व्यक्त करुन श्री व सौ अश्विनी भरत मते कुटुंबीयांचे आभार मानले व आपण-सर्वांसाठी समाज कार्य करण्यासाठी दीर्घायुष्यी होण्यासाठी श्री भगवान जिव्हेश्वर चरणी  प्रार्थना केली.

साै.अश्विनीताई भरत मते यांनी आपल्या भाषणाची सुरुवात हिंदू हृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना स्मरुण केली व आपल्या भाषणामध्ये सदैव आपले पतिराज भरत मते त्यांचा नेहमी मला पाठिंबा होता आणि या त्यांच्या पाठिंब्यामुळेच मी महिला सक्षमीकरण कार्यक्रमाची ऊर्जा  त्यांच्याकडून घेतली आणि हा कार्यक्रम मला यशस्वी या ठिकाणी करता आला असे निक्षुन सांगितले.यशवंत जाधव यांनी जी मदत देऊ केली त्याबद्दल जाहीर आभार मानले. अखिल महाराष्ट्र सकुळ साळी समाज संस्था, अध्यक्ष श्री अशोकजी दांडेकर यांनी आपल्या भाषणामध्ये सर्वात प्रथम श्री मते यांनी जी महिला सबली करणाची कल्पना मांडली त्या कल्पनेचा विचार करून अखिल महाराष्ट्र साळी समाज संस्थेच्या माध्यमातून सदर कार्यक्रम करण्याचे ठरवण्यात आले. यापूर्वी पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीने आपल्या समाज बांधवांचे अनुदान नुकसान झाले होते त्यासाठी अखिल महाराष्ट्रातर्फे तीन ते चार लाखाचा निधी हा गोळा करून वाटण्यात आला तसेच कोकणात देखील अनेक घराचे छप्पर उडून गेले त्यांच्यासाठी अखिल महाराष्ट्र साळी समाज संस्थेच्या मदतीने पाच ते सहा लाखांचा निधी हा कोकणामध्ये वाटण्यात आला. त्याचप्रमाणे कोरोनामुळे अनेकांचे व्यवसाय गेलेत अनेक लोक बेरोजगार झाले त्यांना मदत मिळावी म्हणून अत्यंत गरजू महिलांना त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी श्री व सौ मते यांच्या अथक प्रयत्नाने मिळालेल्या मदतीमुळे गरजू महिलांना निश्चितच मदत होईल असे सांगून आपले भाषण संपविले.हा कार्यक्रम न भूतो न भविष्यति असा होता. एक नव्हे तब्बल ३७ वस्तूंचे वाटप करण्यात आले व गरिबांचा संसार थाटण्याचा एक प्रयत्न यशस्वी करण्यात आला. ज्येष्ठ समाजसेवक मते यांनी आपल्या भाषणात कार्यक्रमासाठी भविष्यात जर श्री जिव्हेश्वर कृपेने आणखी मदत मिळाली तर समस्त अखिल महाराष्ट्रात साधने / शिलाई मशीन गरीब, गरजू महिलांना देण्याचा प्रयत्न केला जाईल याची ग्वाही दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हाध्यक्ष रायगड अविनाश साळी व पदाधिकारी, ठाणे जिल्हा अध्यक्ष विनोद सजगुले व पदाधिकारी तसेच स्थानिक अध्यक्ष, मुंबई विभागीय अध्यक्ष भास्कर चौधरी व पदाधिकारी, रत्नागिरी अध्यक्ष विजय वैद्य व पदाधिकारी रायगड व रत्नागिरी जिल्हा महिला अध्यक्षा, महिला विभागीय उपाध्यक्ष श्रीमती- कल्पना शिपुरकर, यांची मोलाची मदत झाली.

 तसेच श्री चंद्रकांत हावरे, श्री अजित साळी व श्री उदयकुमार साळी यांची विशेष मोलाची मदत या कार्यक्रमात झाली. या कार्यक्रमासाठी श्री.गोपाळराव गायकवाड सहचिटणीस, अ.म.स्व.सा.स. संस्था, रायगड महिला अध्यक्षा साै.श्वेता अंबुर्ले व रत्नागिरी महिला अध्यक्षा साै.स्नेहलता गोंधळेकर व आजी माजी जिल्हा अध्यक्ष आवर्जुन उपस्थित होते. आलेल्या प्रमुख पाहुण्यांचा फुलगुच्छ,शाल व स्मृती चिन्ह देऊन  यथोचित सत्कार अ.म.स्व.सा.स. संस्था व अ.म.स्व.सा.स. महिला मंडळ पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला. महाराष्ट्र स्वकुळ साळी समाज संस्थेचे सरचिटणीस श्रीयुत भालचंद्र साळी यांनी सरतेशेवटी उपस्थितांचे व देणगीदारांचे आभार मानले. तर कार्यक्रमाचा चोख हिशोब कोषाध्यक्ष श्री. संतोष अंबुर्ले यांनी ठेवला.कार्यक्रमाची सुरुवात उल्हासनगरच्या भगिनी कुमारी श्रृती मोहन केंदुळे यांच्या स्वागत गीताने व कार्यक्रमाची प्रस्तावना साै. कल्पना शिपुरकर यांनी केली तर कार्यक्रमाची सांगता सौ संगीताताई अविनाश साळी यांच्या पसायदानाने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अगदी खुमास शैलीत व शिस्तबद्ध पध्दतीने डॉ. प्रतिक्षा बोर्डे व सौ.मेघना कांबळी यांनी केले.

   

अरूणा प्रकल्प ग्रस्तांच्या न्याय हक्कासाठी लढणारे सामाजिक कार्यकर्ते तानाजी कांबळे यांना पोलिस संरक्षण द्या- !!

अरूणा प्रकल्प ग्रस्तांच्या न्याय हक्कासाठी लढणारे सामाजिक कार्यकर्ते तानाजी कांबळे यांना पोलिस संरक्षण द्या- !!


"समाजभूषण सो. ना. कांबळे यांची मागणी"


मुंबई- तानाजी कांबळे हे आमच्या रिपब्लिकन पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हा निरिक्षक आहेत. ते अरुणा प्रकल्पात घरे बुडालेल्या प्रकल्प ग्रस्तांना न्याय मिळावा म्हणून योध्दासारखे काम करीत आहेत. सरकारी अधिकारी, ठेकेदार, आणि धरणाची घळभरणी करु देणारे गावातील पुढारी यांच्यापासून कांबळे यांच्या जीवितास धोका आहे. पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष असतांना यापुवीँ त्यांच्यावर जीवघेणा प्राणघातक हल्ला झालेला आहे. त्यांच्या जीवाला आजही धोका कायम आहे. ही पार्श्वभूमी लक्षात घेवून सिंधुदुर्ग पोलीसांनी सामाजिक कार्यकर्ते तानाजी कांबळे यांना पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार प्राप्त सन्मानित सो.ना.कांबळे यांनी केली आहे. 

तानाजी कांबळे हे आंबेडकरी चळवळीतील बेधडक, लढावू कार्यकतेँ आहेत. ते तत्वाशी तडजोड करीत नाहीत त्यांचे हे कार्य अनेकांना खुपत आहे. परंतु परिणामांची पर्वा न करता ते सिंधुदुर्ग सारख्या अविकसित ग्रामीण भागातील जनतेच्या प्रश्नांवर प्रामाणिक पणे काम करीत आहेत.

पुनर्वसन कायद्या प्रमाणे प्रकल्प ग्रस्तांना देय असलेल्या सोई सुविधा न देता या प्रकल्पाची बेकायदेशीर घळभरणी करुन अरुणा प्रकल्पग्रस्तांची 130 घरे धरणाच्या पाण्यात बुडालेली आहेत. गरिबांची घरे बुडविण्याचा अधिकार कोणत्याही कायद्याने कुणालाही दिलेला नाही. असे ही समाजभुषण सो.ना. कांबळे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. 

ते पुढे म्हणाले अरुणा प्रकल्पग्रस्तांची एकजूट अनेकांना नको आहे. परंतु प्रकल्पग्रस्तांनी गेली दोन वर्षे ठेकेदार, प्रशासनातील अधिकारी आणि गावातील पुढा-यांनी प्रकल्पात संगनमताने केलेल्या भ्रष्टाचाच्या विरोधात तानाजी कांबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रणशिंग फुंकले आहे. हे सर्वजन आज ना उद्या अडचणीत येणार आहेत. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते तानाजी कांबळे यांचा लढा संवणिण्यासाठी त्यांच्यावर पुन्हा एकदा हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार तानाजी कांबळे यांना पोलिस संरक्षण द्यावे अशी मागणी "रिपाईचे समाजभुषण, उपाध्यक्ष - मुंबई प्रदेश, सो.ना.कांबळे" ( मो. नं. 9702992626) यांनी केली आहे.


Tuesday, 2 February 2021

आदर्श शिक्षक पुरस्कार विजेत्या प्रियांका राजेंद्र भोसले सेवानिवृत्त !

आदर्श शिक्षक पुरस्कार विजेत्या प्रियांका राजेंद्र भोसले सेवानिवृत्त !


कल्याण, प्रतिनिधी - ठाणे येथील गावदेवी ट्रस्ट कडून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या शिक्षिका सौ. प्रियांका राजेंद्र भोसले या ३१ जानेवारी,२०२१ रोजी सेवानिवृत्त झाल्या आहेत. सन १९८८ रोजी ठाण्याच्या मनपा शाळेत रुजू झाल्यानंतर त्यांचा प्रवास मानपाडा, नौपाडा, कोपरी असा होऊन शेवटी डायघर येथून त्या सेवानिवृत्त झालेल्या असून त्या निमित्त कल्याणच्या चिंतामणी सभागृहात त्यांचा भव्य सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
आपल्या शिक्षकी कार्यकाळात त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना घडविले आहे यामध्ये औरंगाबाद येथील सोनल गायकवाड यांची तलाठी म्हणून नेमणूक झालेली आहे तसेच राष्ट्रीय पातळीवर कबड्डीपटू म्हणून माधुरी गवंडी यांना नावलौकिक मिळवून दिला व सामाजिक विषयावर भाष्य असणारं लिंगभेदावर आधारित नाट्यकृतीस प्रथम क्रमांकांचे बक्षीस मिळवून दिले.
  मुलांचा सर्वांगीण विकास किंवा त्यांचे समाजातील आचरण, संस्कार हे फक्त आईच करते असं नाहीय, त्यामध्ये मुलांना सक्षम घडविण्यासाठी शिक्षकांचा देखील हातभार व मोलाची साथ असते असे गौरवादगार मनसे जिल्हाध्यक्षा सौ. स्वाती कदम यांनी काढले तसेच अनेक शिक्षकांनी सौ. प्रियांका भोसले यांचे तोंडभरून कौतुक केले.
   या कार्यक्रमाला गटाधिकारी अस्लम कुंगले, गटप्रमुख पूजा चव्हाण, महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटना अध्यक्षा प्राजक्त झावरे, ठाणे जिल्हा शिक्षक सेना व ठाणे मनपा प्राथमिक शिक्षक संघटना अध्यक्ष सुनील फापाळे, अध्यक्ष तथा संचालक ठाणे व पालघर जिल्हा प्राथ. शिक्षक पतपेढी अध्यक्ष बाबाजी फापाळे, मनसे जिल्हाध्यक्षा स्वाती कदम, गटप्रमुख राजेंद्र परदेशी, विषयतज्ञ वनिता वंजारी, वृषाली सावंत, आप्तेष्ट, प्रियजन, सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व इतर शिक्षकवर्ग उपस्थित होते.

गप्पी मासे पाळा, हिवताप टाळा..! चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी जनजागृतीपर आरोग्य शिबीर ....

गप्पी मासे पाळा, हिवताप टाळा..! चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी जनजागृतीपर आरोग्य शिबीर .... *चाळीसगाव, दि. ११ सप्टेंबर २०२६ :* ...