Friday, 5 February 2021

जेष्ठ संपादक कांतीलाल कडू यांना पुरोगामी पत्रकार संघाचा 'महाराष्ट्र जीवन गौरव' पुरस्कार घोषित ! "रविवारी खोपोलीत श्रीमंत रोहित राजे देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार प्रदान"

जेष्ठ संपादक कांतीलाल कडू यांना पुरोगामी पत्रकार 
संघाचा 'महाराष्ट्र जीवन गौरव' पुरस्कार घोषित !


"रविवारी खोपोलीत श्रीमंत रोहित राजे देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार प्रदान"

       बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : खोपोली समाजात जगल्याची भूमिका यशस्वीपणे वठवत समाज प्रबोधनातून दूरदृष्टी देणारे ज्येष्ठ संपादक, कवी, सामजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांना पुरोगामी पत्रकार संघाने यावर्षीचा 'महाराष्ट्र जीवन गौरव' पुरस्कार घोषित केला आहे. रविवारी (7) दुपारी 11 वाजता खोपोलीत आयोजित केलेल्या सोहळ्यात पुरस्काराचे वितरण श्रीमंत रोहित राजे देशमुख यांच्या हस्ते होणार आहे, अशी घोषणा पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय सूर्यवंशी यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

गेली तीन दशके पत्रकारितेसह सामाजिक हितासाठी भरीव योगदान देत सामाजिक कार्यकर्ते, कवी, ज्येष्ठ संपादक कांतीलाल कडू यांनी राज्यभर विविध क्षेत्रात अस्तित्व निर्माण केले आहे. त्यांनी आपल्या सिद्धहस्त लेखणीतून विद्येच्या दरबारातून आपल्या अभ्यासपूर्ण, व्यासंगी आणि धाडसी पत्रकारितेतून अनेक प्रकरणांना वाचा फोडली आहे. सहज, साध्या सोप्या शब्दांतून केलेल्या लिखाणातून त्यांनी राज्यभर वाचक वर्ग तयार केला आहे.

प्रारंभी 12 वर्षे साप्ताहिक आणि आता 13 वर्षे दैनिक निर्भीड लेखमधून पत्रकारितेची तत्व जपत पत्रकारिता क्षेत्रातही दमदार मुशाफिरी करत नावलौकिक प्राप्त केला आहे.

सामाजिक कार्याचा सिलसिला रोजच सुरू आहे. जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न बनलेल्या पाणी प्रश्नावर पनवेल महापालिकेवर काढलेला धडक मोर्चा आणि त्यानंतर काही अंशी का होईना सुरळीत झालेला पाणी प्रश्न, महिलांची सुरक्षिता आणि काही कुटुंबांना लेडीज बारच्या विळख्यातून वाचविण्यासाठी केलेले आंदोलनही नागरिक विसरलेले नाहीत.

साहित्यक्षेत्रात त्यांचा वावरही लीलया राहिला आहे. त्यांची आतापर्यंत पाच पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांचा असा एक वाचक वर्ग आहे. मुळत: पिंड कवीचा असल्याने पत्रकारितेतूनही समाजातील समस्यांची अचूक नाडी पकडून संवेदनशीलतेने त्यावर आघात करण्यात आणि समस्यांचा निपटारा करण्यात त्यांना यश येत आहे.

या सर्व बाबींचा सखोल आढावा घेवून पुरोगामी पत्रकार संघाने त्यांना यंदाचा महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्कार प्रदान घोषित केला आहे. सुरगाना घराण्याचे वारस असलेले उच्च शिक्षित युवा नेते श्रीमंत रोहित राजे देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्काराचे खोपोली येथे शानदार कार्यक्रमातून कडू यांचा गौरव करण्यात येईल, असे पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय सूर्यवंशी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून स्पष्ट केले आहे.

रोटरी क्लब चोपडा व दिशा फाउंडेशन आयोजित सेमिनार मध्ये : *जीवन में संतुलन संतुलन लाने के लिए सही दृष्टिकोन को समजना जरुरी है*- श्री जितेंद्र दीक्षित यांचे प्रतिपादन

रोटरी क्लब चोपडा व दिशा फाउंडेशन आयोजित सेमिनार मध्ये :


*जीवन में संतुलन संतुलन लाने के लिए सही दृष्टिकोन को समजना जरुरी है*- श्री जितेंद्र दीक्षित यांचे प्रतिपादन

चोपडा, वार्ताहर :
रोटरी क्लब चोपडा व दिशा फाउंडेशन आयोजित "जीवन में संतुलन कैसे लाये" या विषयावर सोमवारी अमरचंद सभागृह, चोपडा येथे सेमिनार आयोजित करण्यात आले होते, प्रमुख पाहुणे म्हणून जितेंद्र दीक्षित उपस्थित होते, प्रमुख पाहुण्यांचे स्वागत रोटरी अध्यक्ष नितीन अहिरराव यांनी केले. सोबत व्यासपीठावर सचिव रुपेश पाटील, प्रोजेक्ट चेअरमन विपुल छाजेड, भालचंद्र पवार तसेच दिशा फाऊंडेशनचे सचिव निलेश धनगर व उपाध्यक्ष एकनाथ पाटील उपस्थित होते, पॉल हॅरीस यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून व रोटरी प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.
श्री जितेंद्र दीक्षित आपल्या भाषणात म्हणाले की जीवन मे संपूर्णं लाने के लिए सिद्धांत मनुष्य को अपने जीवन मे बनाना चाहिए जैसे "जो भी जिंदगी मे समस्या है या तो समस्याओंसे इस तरह झूंझो की समस्या समस्या ही ना लागे, या तो समस्याओंसे इस तरह झूंझो की समस्या ही आपको जीवन से भागे, या फिर समस्याओंसे इस तरह समझोता करलो की समस्या ही समस्या ही ना लागे" त्यांनी पुढे आपल्या जिंदादिल जीवनशैलीचे रहस्य सांगत सांगितले की लोक लडके भी है और रोते भी रहते है त्यांनी सांगितले याच दुश्मन को हरा दो याचा दुश्मन से दोस्ती करलो घर मे मैने घर में मै बहुत प्यार से रहता हु "मैने तो घर में मेरे बीवी से दोस्ती कर ली है" असं बोलल्यावर सभागृहात एकच हशा पिकला जिंदगी कुछ इस तरह जिवो की काम दोनो का चलता रहै हवा भी चलती रहे और दिया भी चलता रहे. 
जीवन मे हम दुसरो पर उंगली उठाते है जबकि मेरा मानना है छापने के लिए दुनिया मे सबसे बेहतरीन खिडकी है खुद का गिरेबान और रहने के लिए सबसे बडीया कोई नही मकान इसलिये अपने आप में झाकिये
झलक रहे है सब इधर-उधर अपने अन्दर जाके कोण ढोल रहे है दुनिया मे कमिया के अंदर धोंडे कोण जग सुधारे सब्जी ला ये खुद को आज सुधारे कोण हम सुधरीत दुनिया सूत्रे सीधी बात उतारे कोण.
तू जरुरत है अपने अंदर झाकणे की और सहिद जीवन मे सही दृष्टिकोन समझने की !
सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रोटरी क्लबचे एम डब्ल्यू पाटील, संजीव गुजराती, संजय शर्मा, अनिल अग्रवाल, रमेश अग्रवाल, चंद्रशेखर साखरे, विलास को, ईश्वर सौंदांकर, गौरव महाले, नितीन जैन, धीरज अग्रवाल, प्रवीण मिस्त्री, चेतन टाटीया, शिरीष पालीवाल, निखिल सोनावणे, पी बी पाटील यांनी मेहनत घेतली, तर दिशा फाउंडेशनचे सदस्य, चोपडा योगा ग्रुप चे सर्व सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राधेश्याम पाटील यांनी तर आभार प्रदर्शन सचिव रुपेश पाटील यांनी केले.

Thursday, 4 February 2021

तहसिलदार रामदास झळके यांना दिले निवेदन ! "उद्या तहसिल कार्यालयावर अरुणा प्रकल्पग्रस्तांचे लक्षवेधी आमरण उपोषण"

तहसिलदार रामदास झळके यांना दिले निवेदन !

"उद्या तहसिल कार्यालयावर अरुणा प्रकल्पग्रस्तांचे लक्षवेधी आमरण उपोषण"
 

वैभववाडी - कोरोणा महामारीचा फायदा घेऊन प्रकल्प अधिकारी राजन डवरी यांनी धरणाची दुस-या टप्प्याची घळभरणी आणि पिचींग ची कामे पुर्ण केली आहेत. केंद्र आणि राज्यसरकार ने अरुणा प्रकल्पाला अमाप निधी दिलेला आहे. परंतु कायद्या प्रमाणे पुनर्वसन गावठणात देय असलेल्या नागरी सुविधांची कामे पुर्ण पणे ठप्प झालेली आहेत. मग अरुणा प्रकल्पाला मंजुर असलेला निधी गेला कुठे ? असा सवाल उपस्थित करीत
उद्या ५ फेब्रुवारी २०२१ रोजी आखवणे ,नागपवाडी, भोम गावातील धरणात घरे बुडालेले प्रकल्पग्रस्त तहसिलदार वैभववाडी यांच्या कार्यालया समोर आपल्या विविध न्याय मागण्यांच्या पुर्तते साठी लक्षवेधी आमरण उपोषण ला बसणार आहेत. 

लढा संघर्षाचा अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या अस्तित्वाचा संघटनेच्या वतीने १ फेब्रुवारी २०२१ रोजी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना पत्र देऊन आमरण उपोषण करणार असल्याचे कळविले होते. परंतु जिल्हाधिकारी कार्यालया ऐवजी अरुणा प्रकल्पग्रस्तांचे हे उपोषण तहसिलदार वैभववाडी यांच्या कार्यालया समोर होणार आहे. 

या बाबात प्रकल्पग्स्तांच्या शिष्टमंडळाने तहसिलदार रामदास झळके यांची आज दिनाक ४ फेब्रुवारी २०२१ रोजी भेट देऊन चर्चा केली. या शिष्टमंडळात लढा संघर्षाचा अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या अस्थित्वाचा संघटनेचे अध्यक्ष तानाजी कांबळे, प्रकाश सावंत, संघटनेचे सेक्रेटरी अजय नागप ,खजीनदार विलास कदम,याच्या सह सुरेश नागप, पांडुरंग जाधव, मुकेश कदम श्रीकांत बांद्रे ,वामन बांद्रे, जयराम कदम राजा कांबळे आदिंचा समावेश होता. 

गेली पावणे दोन वर्ष अरुणा प्रकल्पग्रस्तांची सुमारे १३० घरे धरणाच्या पाण्यात बुडालेली आहेत २०१३ च्या नव्या भुसंपादन कायद्यास पात्र असताना अरुणा प्रकल्पग्रस्तांना १८९४ च्या कायद्यांने तुटपुंजा मोबदला देण्यात आलेला आहे. त्रुटीच्या नावाखाली बुवा सह गावातील तिन पुढा-यानी आपल्या नातेवाईकांची घरे भरली आहेत. मात्र गरिब प्रकल्पग्रस्तांच्या त्रुटी अद्याप नोंदविण्यात आल्या नाहीत. पुनर्वसन गावठणातील प्रकल्पग्रस्तांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. पुनर्वसन गावठणे मरनासन्न आहेत. अनेक प्रकल्पग्रस्त पात्र असुनही त्यांना अद्याप निवासी भुखंड देण्यात आलेले नाहीत. अनेक प्रकल्पग्रस्तांना भुखंडाच्या ताबा पावत्याच देण्यात आलेल्या नाहीत. प्रकल्पाची पाण्यात घरे बुडाल्या नंतर काही बेघर प्रकल्पग्रस्तांना रुपये १५०००/- घर भाड्यासाठी तातडीची रक्कम वाटप करण्यात आली. परंतु अनेक बेघर प्रकल्पग्रस्तांचे घरभाडे प्रलंबीत आहे. अरुणा प्रकल्पग्रस्तांची पर्यायी शेतजमीनीच्या बाबतीत फसवणुक करण्यात आलेली आहे. गावातील बुवासह तिन दलालांचे बंगले ऊभे राहीले आहेत परंतु गरिब प्रकल्पग्रस्तांकडे आज घर बांधायला ही पैसा नाही. या सर्व प्रकाराला कंटाळुन अरुणा प्रकल्पातील प्रकल्पग्रस्त शांताराम नागप यांनी विष प्राशन करुन आत्महत्या केली आहे. 

अरुणा प्रकल्पग्रस्तांचे हे व इतर प्रशन सोडवण्यासाठी व शासनाचे लक्ष वेधुन घेण्यासाठी ५ फेब्रुवारी २०२१ रोजी अरुणा प्रकल्पग्रस्तांचे लक्षवेधी आंदोलन होणार आहे. 

विशेष म्हणजे नरडवे धरण ग्रस्तांचे नेते सुरेश ढवळ, दिवाकर राणे, जगदीश पवार श्री. डीसोजा तसेच अरुणा प्रकल्प संघटनेचे मुबई पदाधीकारी सुर्यकांत नागप, रामचंद्र नागप, मनोहर तळेकर, अशोक नागप, राजु नागप आदी पदाधीकारी अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या लक्षवेधी आंदोलनाला उपस्थित रहाणार आहेत.

पोटधरून हसवणारा अभिनेता सागर कांरडे कल्याण करांना अंतर्मुख करायला लावणार 'इशारो इशारोंमे'!

पोटधरून हसवणारा अभिनेता सागर कांरडे कल्याण करांना अंतर्मुख करायला लावणार 'इशारो इशारोंमे'!


कल्याण (संजय कांबळे) :@ काही नावे समोर येताच पोटधरून हसायला होते. त्यातच झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय शो चला हवा येवू द्या मधून विनोदी अभिनेता म्हणून घराघरात पोहोचलेला, आपल्या सहज सुंदर शब्द फेक व बाॅडी लाॅगवेज ने लोकांना पोटधरून हसवणारा अभिनेता सागर कांरडे आता मात्र हसवता हसवता अंतर्मुख करायला लावणार आहे, तेही 'इशारो इशारोंमे, या नाटकातून कल्याणातील आचार्य अत्रे रंगमंदिरात येत्या रविवारी!
झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय चला हवा येवू द्या या शोमधून विनोद वीर म्हणून घराघरात पोहोचलेला अभिनेता सागर कांरडे हा आपल्या सहज सुंदर अभिनय आणि अचूक टाईमिंग साधत शब्द फेक यामुळे निर्माण होणारा विनोद आणि त्याला मिळणारा उंदड प्रतिसाद, खळखळून पोटधरून हसवणारा कलारसिक दिसला म्हणजे तीच त्या अभिनेत्यासाठी पोहच पावती मानली जाते. त्यामुळे अभिनेता सागर कांरडे यांचा एक वेगळा रसिक प्रेक्षक वर्ग समाजात निर्माण झाला आहे. तो आहे म्हणजे विनोद आलाच अशी काहीशी प्रतिमा त्यांची निर्माण झाली असून विनोदी अभिनेता म्हणून तो  परिचित आहे
मात्र या पारंपारिक प्रतिमेला बगल देत इशारो इशारोंमे या वेगळ्या ढंगाच्या हसवता हसवता अंतर्मुख करायला लावणा-या नाटकांमधून सागर कांरडे कलारसिकासमोर येत आहे. नवरा बायकोचं एकमेकांवर निस्सीम प्रेम आहे उभयतांचा संसार छान, सुखाचा चालू आहे. त्याच्यात काही प्राॅब्लेम्स नाही. असं असताना यांना घटस्फोट हवा असेल तर? तुम्ही काय म्हणाल? अतिशय सुंदर कथानक असलेले हे इशारों इशारोंमे नाटक सुरुवातीला हसवता हसवता गंभीरतेकडे वळते व अंतर्मुख करायला लावते.
सई एण्टरटेन्मेंट प्रस्तुत सरगम क्रिएशन निर्मित इशारो इशारोंमे हे नाटकाची मुळ संकल्पना जय कापडिया यांची असून सहिंतेतल नाटक अचूक हेरल आहे आणि प्रयोगात ते केंद्रस्थानी राहिल यांची दिग्दर्शन करताना पुरेपूर काळजी घेतली आहे. कौन्सिलचे आॅफिस, कॅफे शाॅप आणि संजयचे घर अशी लवचिक नेपथ्य रचना अजय पुजारे यांनी योजली आहे राहूल रानडे यांनी संगीतातून नाटकात अपेक्षित सरगम आणली आहे. गुरु ठाकुर यांच्या रचनेला गायक अवधूत गुप्ते आणि शाल्मली सुखटणकर यांनी रंगत आणली आहे. ईशा कापडिया (वेशभूषा) व राजेश परब (रंगभूषा) यांनी आपली कामे चोख केली आहेत.
निर्माता अजय कासुर्डे यांच्या इशारो इशारोंमे मध्ये सागर कांरडे यांनी ब-याच कालावधीनंतर आपल्यातील संवेदनशील अभिनेत्याला आव्हान देणारी भूमिका यात साकारली आहे. त्याच्या बरोबर संजना हिंदुपूर, उमेश जगताप, शशिकांत गंगावणे, प्रिती भरडिया यांनी ही आपल्या भूमिकांना न्याय दिला आहे.
कोरोनाच्या संकटामुळे कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचे आचार्य अत्रे नाट्यगृह मार्च २०२० रोजी बंद करण्यात आले होते. ते आता ११डिंसेबर २०२० ला उघडण्यात आले. इतक्या कालावधीनंतर या नाट्य गृहात पोटधरून हसवता हसवता अंतर्मुख करायला लावणारा तेही 'इशारो इशारोंमे' येत्या रविवारी ७ फेब्रुवारी ला येत आहे. एक वेगळा अनुभव देणारा आणि या नाटकाला प्रेक्षकांची मिळणारी पंसती, ठाणे, वाशी, पार्ले डोंबिवली येथील प्रेक्षकांचा चढता आलेख पाहता कल्याण करांनीही हे नाटक एकदा पाह्यला हवे ऐवढे नक्की! 

Wednesday, 3 February 2021

नाका बांधकाम,कामगारांना स्मार्ट कार्डाचे वितरण !

नाका बांधकाम,कामगारांना स्मार्ट कार्डाचे वितरण !


कल्याण, प्रतिनिधी : असंघटीत कष्टकरी कामगार संघटना, आयोजित अधिकार बैठकीत शेकडो नाका बांधकाम,कामगारां महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणी करण्यात आले आहेत... 


नाका व बांधकाम कामगारांची 1996 च्या कायद्या अंतर्गत नोंदणी तात्काळ व्हावी... नोंदणीकृत कामगारांना योजना चा लाभ मिळावा.आणि एकूणच कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी या मागणीला घेऊन  संघटना मागील 10 वर्षांपासून काम करत आहे... आज आपण उल्हासनगर प्रभाग समिती म्हरळगांव ग्रामपंचायत तें कामगार कल्याण आयुक्त कार्यालय ता कल्याण जिल्हा ठाणे यांच्या सोबत पाठपुरावा करून कामगारांना स्मार्ट कार्ड मिळवून दिले आहेत हा नाका कामगारांच्या एकजूट संघर्षाचा विजय आहे... मात्र एवढं काम पूरेस नाही तर जो पर्यंत शेवटच्या नाका बांधकाम कामगारांची नोंदणी करून त्याला सुविधा मिळत नाही तो पर्यंत संघटना काम करत राहणार आहे...अशी माहिती असंघटीत कष्टकरी कामगार संघटनेचे सुनील अहिरे यांनी दिली.

महाविद्यालये 15 फेब्रुवारीपासून सुरू !! "उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची घोषणा"

महाविद्यालये 15 फेब्रुवारीपासून सुरू !!
 
"उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची घोषणा"

          मुंबई, दि. 3 : राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयातील नियमित वर्ग दि. 15 फेब्रुवारी, 2021 पासून सुरु होणार असल्याची घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत केली.
            उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. महाविद्यालये सुरु करण्यात यावी अशी मागणी विविध क्षेत्रातून होत होती. याबाबत दि.1 फेब्रुवारी रोजी सर्व कुलगुरुंशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून विद्यापीठातील अभ्यासक्रम, परीक्षेचे नियोजन, वसतीगृह यासंदर्भात मानक कार्यप्रणाली (एसओपी) विद्यापीठांनी तयार करावी. अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या होत्या.
            विद्यापीठ अनुदान आयोगाच्या दि.5 नोव्हेंबर, 2020 रोजीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जागेची उपलब्धता पाहून, 50 टक्क्यांपर्यंत विद्यार्थ्यांना रोटेशन पद्धतीने वर्गात प्रवेश देण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेण्यात आला असल्याचे श्री.सामंत यांनी सांगितले.
            राज्यातील प्रतिबंधित प्रक्षेत्रातील विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालये ही ज्या आयुक्त, महानगरपालिका/नगरपालिका किंवा जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या अंतर्गत येतात, त्यांच्याशी संबंधित विद्यापीठाने विचारविनिमय करावा. कोविड-१९ च्या आजाराचा स्थानिक पातळीवरील प्रादुर्भाव व स्थानिक परिस्थिती व आरोग्यविषयक पायाभूत सुविधांची उपलब्धता या बाबी विचारात घेऊन, विद्यापीठे व महाविद्यालये सुरु करुन नियमित वर्ग घेण्याकरिता आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत संबंधित विद्यापीठे व महाविद्यालयांनी आवश्यक ती कार्यवाही करावी. संबंधित विद्यापीठांनी स्थानिक प्राधिकरणांची सहमती घेऊन महाविद्यालये सुरु करावीत, अशा सूचना देण्यात आल्या असल्याचे श्री.सामंत यांनी सांगितले.

            महाविद्यालये सुरु करताना कोविड-१९ बाबत केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात यावे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित आणि आरोग्याची काळजी घेऊन विद्यापीठाच्या नियमानुसार विद्यार्थ्यांची उपस्थिती 75 टक्के बंधनकारक न करता उपस्थितीसंदर्भात ऑफ लाईन/ऑन लाईन दोन्ही पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन द्यावे, असेही श्री.सामंत यांनी सांगितले.  

            वसतीगृह टप्प्याटप्प्याने सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना तयार करुन वसतीगृहाचे इलेक्ट्रिक व सेफ्टी ऑडिट करुन घेण्यात यावे, असेही विद्यापीठांना सूचित करण्यात आले आहे. परिक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना ऑन लाईन आणि ऑफ लाईन दोन्ही पर्याय उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत, असेही श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.

अरुणा प्रकल्पग्रस्तांनी घेतली वैभववाडी पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांची भेट !!

अरुणा प्रकल्पग्रस्तांनी घेतली वैभववाडी पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांची भेट !!


"अन्याय झालेल्या प्रकल्पग्रस्तांकडे सहाणुभुती पुर्वक सहकार्य करा अन्यथा जेलभरो"

सिंधुदुर्ग, - वैभववाडी पोलीस ठाण्याचे नवनिर्वाचित पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांची अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या वतीने लढा संघर्षाचा अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या अस्तित्वाचा संघटनेचे अध्यक्ष तानाजी कांबळे, मुंबई अध्यक्ष प्रकाश सावंत, सेक्रेटरी अजय नागप, उपाध्यक्ष संतोष चव्हाण पांडुरंग जाधव, मुकेश कदम, राजा कांबळे, महिला आघाडीच्या अध्यक्ष सुचिता चव्हाण, सचिव आरती कांबळे, तसेच सामाजिक कार्यकर्ते भालचंद्र जाधव, डि.के सुतार, अशोक राणे यांच्या शिष्टमंडळाने  2 जाने 2021 रोजी भेट घेवून अरुण प्रकल्पग्रस्तांवर झालेल्या अन्यायाची चर्चा केली.

'मोबदला नाही, भुखंड नाही. पुनर्वसनाचा पत्ता नाही. कालवे तयार नसताना अरुणा प्रकल्पाची बेकायदेशीर घरभरणी करून प्रकल्पात पाणीसाठा केल्याने अरुणा प्रकल्पग्रस्तांची सुमारे 130 घरे प्रकल्पाच्या पाण्यात बुडालेली आहेत.'

सध्या पाण्याचा विसर्ग सुरू केलेला होता आणखी दोन दिवस पाणी सुरू राहिले असते तर गावातील अनेक घरे पाण्याची पातळी कमी झाल्याने दिसायला लागली असती परंतु ज्या अधिकाऱ्यांनी हे पाप केलेले आहे ते आपल्या अंगलट येईल म्हणून 2 जाने 2021 रोजी पाण्याचा विसर्ग तातडीने बंद करण्यात आला आहे.

ही सर्व माहिती वैभववाडी तालुक्याचे नूतन पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांना देण्यात आली. अरुणा" प्रकल्पग्रस्तांवर" मोबदला वाटपात अन्याय झालेला आहे. पुनर्वसन गावठाणातील विकास कामे प्रलंबित आहेत. धरणाच्या पाण्यात बुडालेल्या घरांचा निर्णय होत नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्त अस्वस्थ आहेत. दुर्दैवाने एका प्रकल्पग्रस्तांने अलीकडेच आत्महत्या केलेली आहे. आदी बाबत तानाजी कांबळे, प्रकाश सावंत, अजय नागप यांनी वैभववाडी पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्याशी चर्चा केली. 

अशा परिस्थितीत प्रकल्प अधिकाऱ्यांनी जाणून-बुजून पाण्याचा विसर्ग बंद केल्याने अरुणा प्रकल्पग्रस्तांनी धरणाच्या पिचिंग चे काम बंद केलेले आहे. पोलिसानी मानवतेच्या दृष्टिकोनातून अन्याय झालेल्या अरुणा प्रकल्पग्रस्तांचे कडे पहावे परंतु बळाचा वापर करून अरुणा प्रकल्पग्रस्तांना पुन्हा एकदा हुसकावण्याचा प्रयत्न झाल्यास अरुणा प्रकल्पग्रस्त एक तर जेल भरो आंदोलन अथवा पोलीस ठाण्यासमोर अमरण उपोषण करतील असा इशारा प्रकल्प ग्रस्तांनी या वेळी दिला आहे. 

आमची आंदोलने लोकशाही तसेच कायदेशीर मागाँने होतील. कुठेही शांतता भंग होणार नाही असे तानाजी कांबळे, प्रकाश सावंत, अजय नागप, यांनी सांगितले.

पोलीस निरीक्षक अतुल जाधव आणि पोलीस उप निरीक्षक देसाई यांनी कायदा-सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी प्रकल्पग्रस्तांनी घ्यावी अशा  सूचना त्यांनी प्रकल्प ग्रस्ताचा यावेळी दिल्या.

प्रकल्पग्रस्तांशी सहाणुभुतीपुर्वक चर्चा केल्याने पोलिस निरीक्षक अतुल जाधव, उप पोलिस निरीक्षक देसाई यांच्या विषयी समाधान व्यक्त केले.

गप्पी मासे पाळा, हिवताप टाळा..! चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी जनजागृतीपर आरोग्य शिबीर ....

गप्पी मासे पाळा, हिवताप टाळा..! चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी जनजागृतीपर आरोग्य शिबीर .... *चाळीसगाव, दि. ११ सप्टेंबर २०२६ :* ...