Friday, 3 November 2023

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने मराठा आरक्षणाला पाठिंबा !!

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने मराठा आरक्षणाला पाठिंबा !!

डोंबिवली - मिनल पवार 
डोंबिवली येथील सकल मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांना मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी इंदिरा चौकात सांगली उपोषण गुरुवारी करण्यात आले होते. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यात आला. रिपाइंचे जिल्हा अध्यक्ष प्रल्हाद जाधव यांनी सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना पाठिंबा बाबतचे पत्र दिले. रिपाईचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव यांच्या हस्ते पत्र उपोषणकर्त्यांना देण्यात आले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष किशोर मगरे, जिल्हा सचिव सिध्दार्थ रणपिसे महासचिव रमेश बर्वे, संघटक वसंत टेकाळे, तुकाराम पवार, महिला जिल्हा संघटक अपेक्षा दळवी, रिपाइंचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

रोनक सिटी, कल्याण (पश्चिम) येथील कामाचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते उद्घाटन !!

रोनक सिटी, कल्याण (पश्चिम) येथील कामाचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते उद्घाटन !!

कल्याण , सचिन बुटाला : कल्याण शहरातील नविन कल्याण म्हणून नावलौकीक मिळवलेल्या रोनक सिटी परिसरातील रस्त्यांच्या डांबरीकरण कामाला प्रारंभ झाला. कल्याण पश्चिमेचे आमदार श्री.विश्वनाथ भोईर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत या महत्त्वाच्या कामाला आजपासून सुरुवात करण्यात आली.
 

कल्याण पश्चिमेच्या रोनक सिटी परिसरातील ओम रेसिडेन्सी ते रोनक सिटी पर्यंतच्या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली होती. हा रस्ता तातडीने डागडुजी करून दिलासा देण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी मा.नगरसेवक जयवंत भोईर आणि प्रभुनाथ भोईर यांच्याकडे केली होती. त्यानुसार आमदार श्री.विश्वनाथ भोईर साहेब यांच्या उपस्थितीत या कामाचा प्रारंभ करण्यात आला. त्यामुळे या भागातील हजारो नागरिकांना लवकरच आता दिलासा मिळणार आहे. 

याउदघाटन प्रसंगी शहरप्रमुख रवी पाटील, विधानसभा संघटक/मा. नगरसेवक प्रभुनाथ भोईर, मा.नगरसेवक जयवंत भोईर, विभागप्रमुख रामदास कारभारी, डॉ.धीरज पाटील, उपविभाग प्रमुख सिकंदर  मढवी, महाराष्ट्र राज्य विस्तराक शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आनंद चिराग, भरत राठोड तसेच शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक, महिला आघाडी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

डोंबिवलीत स्थानिक मासेविक्रेत्यांचा बाहेरील मासे विक्रेत्यांना विरोध !! *मासे विक्रेत्यांममधील वाद विकोप्याला*

डोंबिवलीत स्थानिक मासेविक्रेत्यांचा बाहेरील मासे विक्रेत्यांना विरोध !! *मासे विक्रेत्यांममधील वाद विकोप्याला*

*डोंबिवलीत आज सकाळ पासून  स्थानिक मासे विक्रेत्यांचे आंदोलन मासे विक्री बंद*

डोंबिवली - मिनल पवार

डोंबिवलीत स्थानिक मासेविक्रेता आणि बाहेरून येणाऱ्या मासे विक्रेत्यांमधील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. शुक्रवारी मोठ्या संख्येने डोंबिवली येथील मासे विक्रेते बाहेरुन येणाऱ्या मासे विक्रेत्यांना विरोध करण्यासाठी डोंबिवली पश्चिमेतील उमेश नगर मधील  रस्त्यावर उतरले होते. 

वसईहून मासे विक्रेते डोंबिवलीत येऊन मासे विक्री करतात त्यामुळे स्थानिक मासे विक्रेत्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला असून उपासमार सुरू असल्याचा आरोप डोंबिवलीतील स्थानिक मासे विक्रेत्यांनी केला.वसईहून डोंबिवलीत येणाऱ्या मासे विक्रेत्यांनी वसईतच मासे विक्री करावी त्यांनी डोंबिवलीत येऊ नये अशी मागणी स्थानिक मासे विक्रेत्या महिलांनी केली, गेल्या अनेक वर्षांपासून ही मागणी करत असूनही काहीच तोडगांना निघाल्याने आज डोंबिवलीचे स्थानिक मासे विक्रेत्यांनी या निषेधार्थ डोंबिवलीतील मच्छी मार्केट बंद ठेवलं होतं. याबाबत पोलिसांनी मध्यस्थी करत याबाबत तोडगा काढन्यत येईल असे सांगितले. ऐन शुक्रवारी डोंबिवलीतील मासे विक्रेत्यांनी मासे विक्री बंद केल्याने मासे खाणाऱ्यांची मात्र चांगलीच पंचाईत झाली.मात्र वसई विरार येणार वरुन येणारे मासे विक्रेते हे मराठी असल्याने त्यांना विरोध करणे
चुकीचे असल्याचे मत डोंबिवली येथील एक माजी नगरसेवकाने व्यक्त केले.राजकारणी डोंबिवलीतील मासे विक्रेत्यांना सहकार्य करत नसल्याबद्दल मासे विक्रेत्या महिलांनी नाराजी व्यक्त केली.बाहेरुन येणारे मासे विक्रेते बंद न झाल्यास आम्ही तिव्र आंदोलन छेडून असा इशारा महिलांनी दिला.डोंबिवली विष्णू नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रल्हाद खंदारे यांनी मध्यस्थी करून दोन्हीही मच्छीमार संघटनांशी तोडगा काढण्यात येईल असे सांगितले.

Thursday, 2 November 2023

भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्हा महिला मोर्चा कार्यकारिणीची बैठक !!

भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्हा महिला मोर्चा कार्यकारिणीची बैठक !! 

कल्याण, सचिन बुटाला : भाजपा महिला जिल्हा मोर्च्याच्या अध्यक्षस्थानी मा. नगरसेविका रेखा राजन चौधरी यांची नियुक्ती झाल्यानंतर आज दि. ०२ नोव्हेंबर रोजी जिल्हा कार्यकारिणीच्या प्रथम बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. भाजपा कल्याण जिल्हा महिला मोर्चाची नवीन कार्यकारिणी नुकतीच घोषित करण्यात आली आहे. 

सदर बैठकीत आज जिल्हा महिला मोर्चाची उपाध्यक्ष व सचिव यांना मंडळ स्तरावर समन्वयक व सह-समन्वयक यांची नेमणूक करून त्यांना पत्रक देऊन जवाबदारी दिली. यावेळी अनेक नवीन सदस्य महिलांची जिल्हा स्तरावर नियुक्ती केली. प्रकोष्ठ सयोजकांना त्यांची जवाबदारी मा .रेखाताईनी समजून सांगितली. 

या वेळेस श्री आशिषजी पावसकर यांनी देखील आगामी काळासाठी महिलांना बूथ ते जिल्हा यासाठी प्रत्येक महिलांनी सज्ज राहावे व पॉलिटिकली अलर्ट राहून आपले सहकार्य व वेळ पक्षा साठी द्यावे असे सांगितले.‌ आजच्या प्रथम बैठकी साठी संपूर्ण महिला मोर्चाच्या सदस्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

मोदी सरकारची गच्छंती 2024 ला अटळ, शेतमजूर वर्गाने संघटित व्हावें - नितीश कुमार

मोदी सरकारची गच्छंती 2024 ला अटळ, शेतमजूर वर्गाने संघटित व्हावें - नितीश कुमार  

*खेतमजदुर युनियन रॅलीत आवाहन*

पाटणा, प्रतिनिधी.. येथे भारतीय खेत मजदूर युनियन चे पंधरावे राष्ट्रीय अधिवेशन 2 नोव्हेंबर ते 5 नोव्हेंबर कालावधीत घेण्यात येत आहे. त्या निमित्ताने बिहार खेत मजदुर युनियन तर्फे प्रचंड रॅली काढण्यात आली. त्यावेळी जनता दल यू कार्यालय शेजारी बेली हायस्कूल ग्राउंड वर प्रचंड जाहीर सभा घेण्यात आली. या जाहीर सभेत प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार म्हणाले की, येत्या 2024 मध्ये मोदी सरकारची गच्छंती निश्चित असून ते इंडिया आघाडीमुळे धास्तीत आलेले आहेत, या सभेला उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव ही हजार होते ते म्हणाले की, या देशात जाती धर्माच्या नावाने झगडे चालवून देणार नाही. बेरोजगारांना नोकरी व महागाई मुद्द्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल. बिहार राज्यांमध्ये सर्व जाती धर्मांचा डाटा उपलब्ध असल्यामुळे त्या डाटावर आता आम्हाला विकासाचे नियोजन करावे लागणार आहे. देशात ही ओबीसी चे जनगणना करण्याची गरज आहे. 

या सभेत भाकपचे राष्ट्रीय महा सचिव कॉ. डी. राजा यांचे प्रमुख मार्गदर्शनपर भाषण झाले ते आपल्या भाषणात म्हणाले की, मोदी सरकार हे कामगार कष्टकरी गरीब लोकांचे सरकार नाही 2024 मध्ये त्यांना सत्तेवरून काढून टाकले पाहिजे, मोदी सरकार फक्त दोन उद्योगपतींचे सरकार असून देशाचे उद्योगधंदे खाजगी करण्याच्या पाठीमागे लागले आहेत. शेतकऱ्यांच्या एकजुट व 700 शेतकरी आंदोलकांच्या हौतात्म्या मुळे त्यांना काळे शेतकरी कायदे मागे घ्यावे लागले. 2024 ला भाजपा हटाव देश बचाओ.. घोषणा महत्वाची  राहणार आहे. बिहारच्या काँग्रेस राष्ट्रीय जनता दल जनता दल  कम्युनिस्ट पार्टी, कमुनिस्ट पार्टी एम एल, आदी पक्षांनी इंडिया आघाडीची या पहिल्या सभाचे नियोजन बिहारमध्ये भाकप चे केले त्याबद्दल त्यांनी कौतुक केले.. या रॅलीत इंडिया आघाडीतील घटक पक्षांची आवर्जून उपस्थिती होती. या रॅलीत बिहार मधील सर्व जिल्ह्यांमधून लाखो शेतमजूर लाल झेंडे हाती घेऊन आलेले होते. सायंकाळी लायब्ररी पटांगणा त अधिवेशनाची स्वागताध्यक्ष आमदार सूर्यकांत पासवान यांच्या भाषणाने सुरुवात झाली अधिवेशनात महाराष्ट्राचे 40 प्रतिनिधी राज्याध्यक्ष कॉ. नामदेव चव्हाण व शिवकुमार गणवीर यांचेसह 40 प्रतिनिधी उपस्थित आहेतअसे पटण्याहून शेतमजुर युनियनचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड लक्ष्मण शिंदे व कॉ. अमृत महाजन यांनी कळविले आहे

विहार लेक पवई येथील वासनेचा बाजार मांडलेली सर्व हॉटेल्स बंद करा - डॉ. राजन माकणीकर

विहार लेक पवई येथील वासनेचा बाजार मांडलेली सर्व हॉटेल्स बंद करा - डॉ. राजन माकणीकर

मुंबई दि (प्रतिनिधी) : भारतीय संस्कृतीला काळिंबा फासणारे विहार लेक पवई येथील वासनेचा खुलेआम बाजार मांडणारे सर्व हॉटेल्स तात्काळ बंद करावेत अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा विद्रोही पत्रकार पॅन्थर डॉ. राजन माकणीकर यांनी दिला आहे.

या परिसरात के. अशोक राय यांच्या टुरिस्ट हॉटेल सह एक्स प्रेस हॉटेल आणि स्टुडिओ, हॉटेल ग्रीन वूड, हॉटेल ग्रीन व्हील, हॉटेल कॅफे विहार तसेच हॉटेल हील विव नावांची हॉटेल्स असून केवळ आणि केवळ "चमडी पे दमडी" या उक्तीप्रमाणे वासनेचा बाजार मांडला गेला आहे. प्रेमियुगल आपली शारीरिक भूक भागविण्यास तोंडाला रुमाल बांधून या ठिकाणी येतात. आणि दुस्कृत्य करतात हे भविष्यात जोडप्यांना अवघड होऊन बिकट परिस्तिथीला तोंड द्यावं लागत.

हॉटेलच्या बाजूला मुंबईला पाणी पुरवठा करणारे विहार लेक तलाव आहे. या तलावात या हॉटेलात येणाऱ्या एखाद्या पर्यटकाने काही टाकले तर पूर्ण मुंबई मृत्युंच्या दारावर पोहोचू शकते. त्यामुळे अश्या ठिकाणी हॉटेल्स ना ठेवणे कधीही श्रेयस्कर ठरेलं असेही डॉ. माकणीकर म्हणाले.

पुढे बोलताना डॉ. माकणीकर म्हणाले की, विस्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहिती नुसार या हॉटेल्स मध्ये अल्पवयीन प्रेमियुगलांना सरळ प्रवेश मिळतो. हॉटेल्सच्या वतीनेही इच्छुकांना व पैसे मोजणाऱ्यांना वेगळी व्यबस्था करवून त्यांना सहवासासाठी मुली पूर्वील्या जातात. या गोष्टींची खबर पोलिसांना असून सुद्धा ते न्यायलाय्याने शारीरिक संबंधांना परवानगी दिली असं सांगून हॉटेलच्या वासनेच्या बाजाराला सकारात्मक आणि कायदेशीर रूप देतात.

आंबेडकरी ऍक्टिव्हिस्ट व समजभूषण डॉ. राजन माकणीकर यांनी या सर्व हॉटेल चे ऑडिट तपासावे, अग्निशमन दल व पालिकेच्या परवानग्या तपासव्यात, येणारे जाणारे कॉल लॉग, सी.सी टी वी कॅमेऱ्यांचे सर्व फुटेज तपासावे. जमा केलेली कागदपत्र व नोंदी घेतलेले रजिस्टर तपासावे. अशी मागणी करुंन सरसकट वासनेचा बाजार बंद करण्याची मागणी केली आहे. अन्यथा दि ५ नोव्हेंबर रोजी राजभवन समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

शहरातील विविध समस्यांबाबत आमदार राजू पाटील यांनी आयुक्तांची घेतली भेट !!

शहरातील विविध समस्यांबाबत आमदार राजू पाटील यांनी आयुक्तांची घेतली भेट !!

कल्याण, सचिन बुटाला दि.०२ : आमदार राजू पाटील यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त भाऊसाहेब दांडगे यांची भेट घेऊन पलावा येथील रहिवाशांना मालमत्ता करत ६६ टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आयुक्तांचे अभिनंदन केले तसेच या परिसरातील नागरिकांना टॅक्स कसा लावण्यात येईल, त्यांना टॅक्स कसा येईल याबाबत जनजागृती शिबिर घेण्याचे मागणी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. मानकोली पुलाची अलाइनमेंट चुकली, तांत्रिक कारणामुळे हा पूल पुढे उतरवण्यात आला आहे त्याचं नियोजन कसं करणार, ठाकुर्लीच्या रखडलेल्या पुलाबाबत पुढे काय करणार याबाबत चर्चा केली. 

डोंबिवली पश्चिम येथे जवळपास एक लाखांच्या आसपास घर आहेत. मात्र या ठिकाणी महावितरणाचे सब स्टेशन नाही. त्यामुळे महापालिकेने महावितरणच्या सबस्टेशनसाठी डोंबिवली पश्चिममध्ये भूखंड उपलब्ध करून द्यावा, महानगरपालिकेत फेरीवाल्यांचा प्रश्न गंभीर झाला आहे त्याकडे आयुक्तांचे लक्ष वेधले, कल्याण, डोंबिवली स्टेशन परिसरात तसेच लोढा व इतर परिसरात फेरीवाल्यांनी बस्तान बसवले आहे,  यात सर्वच फेरीवाले हे गरजवंत किंवा गरीब नसून यात अनेक असामाजिक तत्वं आहेत. जे खरेच फेरीवाले आहेत त्यांना जागा द्या, जे अधिकाऱ्यांवर हल्ले करतात किंवा जे असामाजिक आहेत यांच्यावर कठोर कारवाई करावी व क्रिमिनल केसेस दाखल कराव्यात अशी मागणी केली.

आयुक्तांनी माणकोली पुलासंदर्भात एमएमआरडीए अधिकाऱ्यांसोबत पुन्हा बैठक घेणार असून, ठाकुर्ली पुलाबाबत लाभार्थ्यांना मोबदला देण्याचे व फेरीवाल्यांचे निश्चित धोरण आखण्याचे आश्वासन दिले, यावेळी आमदार राजू पाटील यांच्या सोबत डोंबिवली मनसेचे शहर प्रमुख राहुल कामत उपस्थित होते.

मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन सुरू; मागण्या अमान्य केल्याने आंदोलन तीव्र !!

मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन सुरू; मागण्या अमान्य केल्याने आंदोलन तीव्र !! *स्थानिकांना रोजगार आणि प्रकल्पग्रस्तांना स...