Wednesday, 29 March 2023

महाविकास आघाडीच्या विराट जाहीर सभेस हजारोच्या संख्येने उपस्थित रहा जालना येथे 'शिवसेना नेते चंद्रकांत खैरे' यांचे आवाहन !

महाविकास आघाडीच्या विराट जाहीर सभेस हजारोच्या संख्येने उपस्थित रहा जालना येथे 'शिवसेना नेते चंद्रकांत खैरे' यांचे आवाहन !

जालना, अखलाख देशमुख, दि २९ : २ एप्रिल रोजी औरंगाबाद येथे होणार्‍या महाविकास आघाडीच्या वज्रमूठ महाविकास आघाडीची या विराट जाहीर सभेस हजारोच्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन शिवसेना नेते (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चंद्रकांत खैरे यांनी केले. 

जालना येथील शिवसेना भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनेच्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत चंद्रकांत खैरे यांनी आवाहन केले. यावेळी व्यासपीठावर मराठवाडा सचिव पटवर्धन, शिवसेना उपनेते लक्ष्मणराव वडले, जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर, ए.जे. बोराडे, माजी आमदार संतोष सांबरे, जिल्हा संघटक भानुदास घुगे,  उपजिल्हाप्रमुख रमेश गव्हाड, मनीष श्रीवास्तव, रावसाहेब राऊत, प्रा. गोपालसिंह बछिरे, भगवान कदम, बाबुराव पवार, परमेश्वर जगताप, अशोक आघाव, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उत्तमराव वानखेडे, मुरलीधर शेजूळ, जिल्हा युवा अधिकारी शिवाजी शेजूळ आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. 
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे म्हणाले की, शिवसेना फोडण्याचे अत्यंत पातक शिवसेना पक्षातील फुटिरांनी केले असून, त्यांच्या विषयी प्रचंड रोष आज सर्वसामान्य जनतेत पाहावयास मिळत आहे. राज्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या होणार्‍या सभा या अत्यंत विराट स्वरूपात होत असून, नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने या फुटिरांच्या पायाखालीची वाळू सरकली आहे. छत्रपती संभाजीनगर येथे होणारी सभाही ‘अशीच ना भूतो, ना भविष्यती अशी’ यशस्वी करायची असल्याचे ते म्हणाले. या करिता जालना जिल्ह्यातील सर्व शिवसेना पदाधिकार्‍यांनी गावो-गावी जाऊन येथील सामान्य शेतकरी व नागरिकांना या सभेस हजारोच्या संख्येने सहभागी करावे. आगामी काळात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आपणास भक्कमपणे उभे राहायचे असून, या सर्व फुटिरांना गाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे ते म्हणाले. 

यावेळी उपनेते लक्ष्मण वडले यांनी सभेस प्रचंड संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले. जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर व ए. जे. बोराडे यांनी जालना जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या प्रत्येक गणातून सामान्य नागरिक, शेतकरी, महिला हजारोच्या संख्येने महाविकास आघाडीच्या सभेत सहभागी होणार असल्याचे सांगितले. प्रास्ताविक जिल्हाप्रमुख ए.जे.बोराडे यांनी केले. सूत्रसंचालन व आभार जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी केले. 

यावेळी तालुकाप्रमुख हरिहर शिंदे, जयप्रकाश चव्हाण, अशोक बर्डे, हरिभाऊ पोहेकर, उद्धव मरकड, कुंडलिक मुठ्ठे, अजय अवचार, सुदर्शन सोळुंके, भरत सांबरे, उद्धव भुतेकर, बाबुराव कायंदे, सखाराम गिराम, प्रभाकर उगले, शहरप्रमुख बाला परदेशी, घनश्याम खाकीवाले, दुर्गेश काठोठीवाले, युवासेनेचे मंगेश गव्हाड, माजी जि.प. सदस्य कैलास चव्हाण, बबनराव खरात, गणेश डोळस, खालेक कुरेशी, माजी सभापती भगवान शिंदे, भरत मदन, अरुण डोळसे, डॉ. राजेश राऊत, प्रभाकर घडलिग, श्रीरंग खरात, संदीप नाईकवाडे, बबनराव मिसाळ, गंगूबाई वानखेडे, किशोर नरवडे, अनिल अंभोरे, अंकुश राजेजाधव, प्रमोद फदाट, विदूर जईद, देविदास पैठणे, शीतल मुरकुटे, प्रिया जाधव, रामेश्वर कुरिल, विठ्ठलराव खरात, गजानन मुळे, योगेश शर्मा, संदीप मगर, गजानन बनकर, नंदकिशोर पुंड, शंकर जाधव, दीपक कदम, ज्ञानेश्वर गोरे, अरुण डोंगरे, परमेश्वर डोंगरे, जीवन खंडागळे, भगवत घोडके, शेख रफीक, बबन काजळे, भगवान काकडे, विमोचन बोरसे, संदीप गोरे, जनार्धन गिराम,  सुदर्शन चौधरी आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 

*स्त्रीविषयी अवमानकारक वक्तव्य करणार्‍या आमदार संजय शिरसाट यांचा निषेध*

दरम्यान बैठकीच्या समारोपानंतर सर्व शिवसेना नेते व पदाधिकार्‍यांनी नुकतेच स्त्रीविषयी अवमानकारक वक्तव्य करणार्‍या आमदार संजय शिरसाट यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करीत तीव्र निषेध केला.

आर्यारवी एंटरटेनमेंट चा पहिलावहिला राष्ट्रीय लघुचित्रपट पुरस्कार वितरण सोहळा थाटात संपन्न !

आर्यारवी एंटरटेनमेंट चा पहिलावहिला राष्ट्रीय लघुचित्रपट पुरस्कार वितरण सोहळा थाटात संपन्न !

मुंबई (शांताराम गुडेकर ) :
                 आर्यारवी एंटरटेनमेंटचे निर्माते महेश्वर भिकाजी तेटांंबे यांनी आयोजित केलेल्या राष्ट्रीय लघुपट स्पर्धेचा "पुरस्कार वितरण सोहळा" नुकताच शिरोडकर हायस्कूल शिशुविकास, परेल येथे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. कुटुंब रंगलंय काव्यात फेम प्रा. विसुभाऊ बापट यांनी शिरोडकर शाळेचे संस्थापक कै. डॉ. शिरोडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून, छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करुन दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात पुण्याहून निमंत्रित केलेल्या सौ.लक्ष्मी लांबे-कुडाळकर (प्रसिद्ध ढोलकीपटू) व सौ. गौरी वायचळ-वनारसे (प्रसिद्ध संबळ वादक) यांच्या जुगलबंदीने झाली. प्रमुख संयोजक महेश्वर तेटांबे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून आपलं प्रास्ताविक पर मनोगत व्यक्त केले. 

            या कार्यक्रमाला कुटुंब रंगलय काव्यात चे श्री. विसुभाऊ बापट, प्रसिद्ध उद्योगपती आणि समाजसेवक खलीलजी शिरगांवकर, माजी कार्यसम्राट आमदार मधु चव्हाण (भाजप), पराग चव्हाण (उपविभाग प्रमुख शिवडी विधानसभा मतदार संघ), सुप्रसिध्द अभिनेते संजय खापरे, मकरंद पाध्ये, बाळा चौकेकर, चला हवा येवू द्या फेम अंकुर वाढवे, रात्रीस खेळ चाले फेम संजीवनी पाटील, प्राजक्ता वाडये, सिध्दी कामथ, फिल्म क्राफ्ट फेडरेशनचे सरचिटणीस श्री. दिलीपजी दळवी, निर्मिती फिल्म क्लबचे अध्यक्ष अनिल म्हमाने, पत्रकार एन. डी. खान, गुरुनाथ तिरपणकर, राहूल खरात, रघुनाथ ढोक, प्रसाद कडव, दिग्दर्शक सुहास कर्णेकर, संदिप रावजी जाधव, समाजसेवक विजयभाऊ पाटील व इतर नामवंत मंडळीसुध्दा उपस्थित होते.
                निवेदनाची बाजू लिमका बुक आँफ रेकाँर्ड फेम फणी आणि गाणी चे सुप्रसिध्द कलाकार श्री.शशिकांत खानविलकर यांनी उत्तमरीत्या सांभाळली.या पारितोषिक वितरण सोहळ्यात सर्व लघुपट निर्माते, कलाकार व तंत्रज्ञांनी आपली बहुसंख्येने उपस्थिती दर्शवली होती. मान्यवरांचे सत्कार, त्यांची भाषणे व विसुभाऊंच्या खुसखूषित कवितांनी सगळे वातावरण उल्हासित झाले. 

             या सोहळ्यात सर्व प्रथम "उकिरड्याचं घरटं", द्वितीय "बकरु", तृतीय "कडू साखर". स्पेश्यल ज्युरी "बत्ती". शिवाय उत्कृष्ट अभिनय मानसी बांगर (बत्ती), विजय गीते (आरंभ), उत्कृष्ट दिग्दर्शक दिपक पवार (उकिरड्याचं घरटं), उत्कृष्ट कथा/पटकथा दिपक पवार (उकिरड्याचं घरटं), उत्कृष्ट संवाद भरत शिरसाट (बत्ती), उत्कृष्ट छायाचित्रण कपिल अडोले (आरंभ), उत्कृष्ट पार्श्वसंगीत नवीन मोरे (आरंभ), उत्कृष्ट बालकलाकार संस्कार पवार (उकिरड्याचं घरटं), उत्तेजनार्थ लघुपट "ओटू" (सँप प्रोडक्शन) व "कारा" (ऊग्वी कलारंग), जागतिक महिला दिन स्पेशल पारितोषिक विजेत्या ठरल्या सुषमा सिनोलकर (आँक्सिजन फाँर लाईफ) व स्नेहा हरीदास (अयानम, मल्याळी लघुपट), ऊत्कृष्ट प्रेमकथा लघुपट ठरला "फर्स्ट लव्ह", ऊत्कृष्ट भयपट ठरला "ल्युडो क्वीन", ह्रुदयस्पर्शी लघुपट ठरले "मेरी सायकल" व "मिरा", विशेष ऊल्लेखनीय लघुपट ठरला "चावी द की" व ऊत्कृष्ट माहितीपट ठरला "मुंबई माफिया" या शिवाय अभिनयासाठी ऊत्तेजनार्थ पारितोषिक विजेते ठरले श्री. राहुल चवरे(दोन तास), बबन जोशी (कडू साखर), सायली रौंदळ (वारं), संजीवनी जाधव (गजाली), प्रणाली निमजे(कारा), आनंद जाधव (अवलीया), दत्तात्रय तिटकरे (वणवा), कु.आदित्य म्हमाने (मुजरा), प्रशस्ती जाखेडकर(पतंग), श्रध्दा दोंदे(मिरा), त्रिशा पवार (कडू साखर), अमर पारखे - क्रियेटिव दिग्दर्शक (ओटू). या राष्ट्रीय लघुपटासाठी लेखक, दिग्दर्शक व अभिनेता अनंत सुतार, अभिनेता, निर्माता सुरेश डाळे व ग्राफीक डिझायनर समाजसेवक मनिष व्हटकर यांनी विशेष मेहनत घेतली. 

            शिरोडकर हायस्कुलच्या शिशुविकास मध्ये सादर झालेला दिमाखदार व नेत्रदिपक असा पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी शिरोडकर हायस्कुलच्या १९८८ च्या दुपार अधिवेशनाच्या मित्रपरिवारांचे विशेष योगदान लाभले. अशा तऱ्हेने आर्यारवी एंटरटेनमेंटचा हा पहिलावहिला राष्ट्रीय लघुचित्रपट पुरस्कार वितरण सोहळा प्रसिद्ध कलावंतांच्या उपस्थितीत थाटात संपन्न झाला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा डी.वाय. पाटील विद्यापीठाच्या डी.लिट. पदवीने सन्मान !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा डी.वाय. पाटील विद्यापीठाच्या डी.लिट. पदवीने सन्मान !

नवी मुंबई, प्रतिनिधी : प्राचीन भारत जागतिक दर्जाच्या शिक्षणासाठी प्रसिद्ध होता. आपल्याकडे नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला, वल्लभी, ओदंतपुरी आणि सोमपुरा अशी प्रसिद्ध विद्यापीठे होती. जिथे हजारो वर्षांपासून जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक शिक्षणासाठी येत असत. आजचे उच्च शिक्षण त्या विद्यापीठांच्या उंचीवर नेऊ शकतो का, याचा विचार करायला हवा, असे प्रतिपादन महामहिम राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे व्यक्त केले.

नेरुळ येथील डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाच्या १७ व्या दीक्षांत समारंभ आज झाला. यावेळी राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, लोकमत ग्रुपचे चेअरमन विजय दर्डा, डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती तथा अध्यक्ष डॉ. विजय पाटील, प्र कुलपती शिवानी पाटील, कुलगुरू वंदना मिश्रा चतुर्वेदी, आदी यावेळी उपस्थित होते. 

सामाजिक, वैद्यकीय सेवा व आपत्कालीन व्यवस्थापन क्षेत्रातील सेवेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तसेच सामाजिक कार्यासाठी श्री. दर्डा यांना राज्यपाल महोदयांच्या हस्ते मानद डॉक्टरेट (डी. लिट) देण्यात आली. या कार्यक्रमास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्री महोदयांचे वडील श्री. संभाजीराव शिंदे, पत्नी लता शिंदे, विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर आदी उपस्थित होते. 
राज्याचे मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे व श्री. दर्डा यांना डी. लिट. पदवी मिळाल्याबद्दल राज्यपालांनी दोघांचे अभिनंदन केले. 

"डी.लिट. पदवी राज्यातील सर्वसामान्य जनतेला व विद्यार्थ्यांना अर्पण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे"

डी वाय पाटील विद्यापीठाने यापूर्वी अनेक महान व्यक्तींना मानद डॉक्टरेटने सन्मानित केले आहे. त्यांच्या यादीत आज माझ्यासारखा कार्यकर्ता सामील झाला, ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे, अशा भावना मुख्यमंत्री महोदयांनी व्यक्त केल्या.

यावेळी विजय दर्डा म्हणाले की, मला मिळालेला डिलीट पदवीचा हा सन्मान प्रतिष्ठतेचा व प्रेरणादायी आहे. समाजासाठी काम करण्याची प्रेरणा बाबूजींमुळे मिळाली. त्यामुळे या महत्वाच्या प्रसंगी त्यांची आठवण येत आहे. समाजाच्या विकासासाठी काम करण्याची तसेच समाज

Tuesday, 28 March 2023

रायते, कल्याण येथील रायते ग्रामस्थ मंडळाचे वतीने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन !

रायते, कल्याण येथील रायते ग्रामस्थ मंडळाचे वतीने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन !

कल्याण, नारायण सुरोशी : रायते, कल्याण येथील रायते ग्रामस्थ मंडळाचे वतीने दरवर्षी प्रमाणे हनुमान मंदिरात चैत्र शुद्ध नवमी ३० मार्च ते चैत्र शुद्ध प्रतिपदा ७ एप्रिल या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

या हरिनाम सप्ताहात सायकांळी ५.३० ते ६.३० या वेळेत ३० मार्च ते ५ एप्रिल या काळात प्रवचन आयोजित केले आहे यात ह.भ.प.श्री वामन महाराज चिराटे (कल्याण),. ह.भ.प.श्री दिनेश महाराज तारमाळे (उशिद), ह.भ.प.श्री भालचंद्र महाराज सरनोबत (मांडा), ह.भ.प.श्री ताकदिर महाराज सुतार (सांगोडे), ह.भ.प.श्री धानाजी महाराज बोंबले (पोटगाव), ह.भ.प.श्री उमेश महाराज पावशे (पावशेपाडा), ह.भ.प.श्री महादू महाराज झाटे (पोई) तर रात्रौ ९ ते ११ या वेळेत ३० मार्च ते ६ एप्रिल या काळात ह.भ.प.श्रई विकास महाराज बोराडे (आळंदी), ह.भ.प.श्री आरतीताई खाटेघरे (खाटेघर, मुरबाड), ह.भ.प.श्री उत्तरेश्वर महाराज जाधव (माजलगाव, बीड), ह.भ.प.श्री महेंद्र महाराज भोईर (पहारे), ह.भ.प.श्री भारतीताई गाडेकर (वैजापूर), ह.भ.प.श्री विश्वनाथ महाराज वारिंगे (पालेगाव, अंबरनाथ), ह.भ.प.श्री योगेश‌ महाराज घरत (आळंदी), ह.भ.प.श्री माधव महाराज खापरे (म्हारळ) तसेच रात्रौ ११ नंतर हरिजागर हनुमान प्रासादिक भजन मंडळ, रायते व पालखी सोहळा यांच्याकडून करण्यात येईल, ७ एप्रिल ला काल्याचे कीर्तन विक्रांत महाराज पोडेकर (आळंदी) यानंतर सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत आभार व महाप्रसाद आयोजित केला असून दरवर्षी प्रमाणे हजारो भाविक या हरिनाम सप्ताहास उपस्थित राहतील असे आयोजक रायते ग्रामस्थ मंडळ, रायते यांनी सांगितले.

महिलांच्या स्वावलंबनासाठी सर्व घटकांचा सहयोग आवश्यक - जिल्हाधिकारी निमा अरोरा

महिलांच्या स्वावलंबनासाठी सर्व घटकांचा सहयोग आवश्यक - जिल्हाधिकारी निमा अरोरा

अकोला, अखलाख देशमुख, दि.२८ : - महिलांची प्रगती व स्वावलंबनासाठी अद्यापही खूप काम करण्याची गरज आहे. त्यासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढे यावे व सर्वांच्या सहयोगाने हे कार्य पुढे न्यावे,असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज येथे केले.

महिला व बालविकास विभागातर्फे  पुण्यश्लोक अहिल्यादेवी  होळकर पुरस्काराचे वितरण आज जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते करण्यात आले.  लोकशाही सभागृहात पार पडलेल्या सोहळ्यास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  सौरभ कटीयार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने,  जिल्हा परिविक्षा अधिकारी गिरीश पुसदकर आदी मान्यवर उपस्थित होते. 

या पुरस्कार वितरण सोहळ्यात डॉ. निर्मला पुंडलिक भामोदे,  खुशबु महादेव चोपडा,  ॲड. मनिषा नरेंद्र धुत, स्नेहा चक्रधर राऊत यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यात सन २०१३-१४ ते २०१८-१९ या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्यात  दहा हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह व शाल श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

जिल्हाधिकारी श्रीमती अरोरा म्हणाल्या की, महिलांच्या स्वावलंबनासाठी अद्यापही खूप कार्य करण्याची गरज आहे. त्यासाठी महिलांनीच पुढे यावे. महिलांसाठी वेगवेगळ्या क्षेत्रात खूप संधी आहेत. त्यासाठी महिलांनी स्वतःला सक्षम व समर्थ बनवावे,असे त्यांनी सांगितले. सौरभ कटियार यांनी पुरस्कार प्राप्त महिलांचे अभिनंदन केले. प्रास्ताविक गिरीश  पुसदकर यांनी केले. तर विलास मरसाळे यांनी आभार मानले.

विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी केली कचरा डेपो; नेहरु पार्क जवळील अपघातप्रवण स्थळाची पाहणी !

विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी केली कचरा डेपो; नेहरु पार्क जवळील अपघातप्रवण स्थळाची पाहणी !

अकोला, अखलाख देशमुख, दि.२८ :-  विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी आज अकोला मनपाच्या नायगाव येथील घन कचरा व्यवस्थापन प्रकल्प व कचरा डेपोची तसेच शहरातील नेहरू पार्क जवळ अपघातप्रवण स्थळाची पाहणी केली. 

अमरावती विभागीय आयुक्त डॉ. श्रीमती निधी पाण्डेय या आज अकोला दौऱ्यावर आल्या होत्या. त्यांनी अकोला महानगरपालिकेच्या  नायगाव येथील कचरा व्यवस्थापन प्रकल्प तसेच कचरा डेपो येथे भेट दिली. त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी निमा अरोरा, मनपा आयुक्त कविता द्विवेदी, मनपाचे कार्यकारी अभियंता अजय गुजर,  कनिष्ठ अभियंता प्रतिक कोकाटे, स्वच्छता निरीक्षक प्रवीण खांबोरकर आदी उपस्थित होते. 

नायगाव येथील घनकचरा प्रकल्पाचे स्थलांतर भोळ येथे लवकरात लवकर करता यावे यासाठी गतिने कामे पूर्ण करा, असे निर्देश डॉ. पाण्डेय यांनी यावेळी दिले. भोळ येथे  मनपाच्या घनकचऱ्यावर प्रक्रिया प्रकल्पावर शहरात दररोज निर्माण होणाऱ्या २३० टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण झाले असून यंत्रसामुग्रीही दाखल होत आहे. संकलित होणाऱ्या घनकचऱ्यातून ६० टक्के खत निर्माण होणार आहे. ४५.३५ कोटी रुपये खर्च करुन घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची उभारणी सुरु आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

त्यानंतर डॉ. पाण्डेय यांनी शहरातील नेहरु पार्क जवळील अपघातप्रवण स्थळाची पाहणी केली. तेथे अपघात टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत त्यांनी माहिती घेतली. यावेळी जिल्हाधिकारी निमा अरोरा,सार्वजनिक बांधकाम विभाग अकोला मंडळाचे अधीक्षक अभियंता अविनाश धोंडगे हे ही उपस्थित होते. रहदारीची कोंडी न होता अपघात शक्यतांचे निर्मूलन व्हावे, यासाठी तातडीच्या व दीर्घकालीन उपाययोजना याबाबत आयुक्तांना माहिती देण्यात आली. 

प्राणी क्लेष प्रतिबंधक समितीचे प्राणी उपचार केंद्र येथेही डॉ.पाण्डेय यांनी भेट दिली. तेथे पाळीव जखमी प्राणी. पक्षी यांच्यावर सेवाभावी संस्थेमार्फत मोफत उपचार व देखभाल केली जाते. या केंद्रास भेट देऊन त्यांनी या उपक्रमाचे कौतूक केले.

पक्षाने निर्देश दिलेल्या कार्यक्रमास गैरहजर राहणार्‍या पदाधिकार्‍यांवर होणार कारवाई !

पक्षाने निर्देश दिलेल्या कार्यक्रमास गैरहजर राहणार्‍या पदाधिकार्‍यांवर होणार कारवाई !

मुंबई, अखलाख देशमुख : अखिल भारतीय काँग्रेस कमिटी तसेच महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या माध्यमातून जनतेच्या समस्या, प्रश्न तसेच राजकीय मुद्द्यांवर विविध आंदोलने, मोर्चे, उपोषण अथवा सत्याग्रह असे कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश वेळोवेळी दिले जात असतात. पक्षीय कार्यक्रम असो वा जनतेच्या समस्यांसाठी घेतलेला कार्यक्रम असो जिल्हास्तरावर सर्वच सन्माननीय पक्ष पदाधिकारी यांनी स्वतः सहभागी होत आपल्याबरोबर इतर कार्यकर्ते यांचा सहभागही जास्तीत जास्त संख्येने करणे अपेक्षित आहे. परंतु प्रदेश काँग्रेसच्या असे लक्षात आले आहे की, अनेक पदाधिकारी अशा पद्धतीच्या आंदोलन, मोर्चात सहभागी होत नाहीत, हा प्रकार चिंताजनक आहे. यासंदर्भात मा. प्रांताध्यक्ष महोदयांनी दि. २६ मार्च रोजीच्या झूम मीटिंग मध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अपवादात्मक परिस्थिती वगळता पक्षाच्या सर्वच कार्यक्रमात पदाधिकार्‍यांनी कार्यकर्त्यांसह उपस्थित राहिले पाहिजे. पक्षाने आपल्यावर जबाबदारी दिलेली आहे त्यानुसार त्याचे उचित पालन होणे अपेक्षित आहे. मात्र, प्रदेश / जिल्हा व ब्लॉक स्तरावरील अनेक पदाधिकारी संघटनात्मक पद घेऊनही पक्षाचे काम करत नसतील तर त्यांच्या जागी इतरांना संधी देता येईल. पक्षाच्या कार्यक्रमात वारंवार गैरहजर राहणार्‍या पदाधिकार्‍यांची माहिती प्रदेश कार्यालयाकडे तातडीने पाठविण्याची जबाबदारी जिल्हाध्यक्षांची असेल. प्रदेश स्तरावरून दिलेल्या कार्यक्रमाची माहिती सर्व सन्मा. नेते, आजी माजी खासदार / आमदार, प्रदेश / जिल्हा व ब्लॉक स्तरावरील पदाधिकारी, आघाडी संघटना- विभाग व सेलचे पदाधिकारी यांच्यासह सहकार व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकार्‍यांना देण्याची खबरदारी जिल्हा काँग्रेस कमिटीने घ्यावी.

प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी स्पष्ट निर्देश दिले आहे की, यापुढे होणार्‍या प्रत्येक कार्यक्रमात, आंदोलनात अथवा मोर्च्यात प्रदेश पदाधिकार्‍यांनी किमान ४० कार्यकर्ते, जिल्हा पदाधिकारी २० तर ब्लॉक स्तरावरील पदाधिकारी यांनी १० कार्यकर्ते सोबत आणावे. जे पदाधिकारी दिलेल्या उद्दिष्टानुसार आपल्या सोबत कार्यकर्ते आणणार नाही अशांची माहिती प्रदेश कार्यालयास तातडीने देण्यात यावी, जेणे करून अशा पदाधिकार्‍यांवर उचित कार्यवाही करता येईल.

नवतरुण मित्र मंडळ पाणजेच्या वतीने वृक्षारोपण व स्वच्छता अभियान उत्साहात संपन्न !!

नवतरुण मित्र मंडळ पाणजेच्या वतीने वृक्षारोपण व स्वच्छता अभियान उत्साहात संपन्न !! ४२ वर्षे परंपरा जोपसणारे मित्र मंडळ. उरण दि २८...